जय
भवानी आरती
जय
जय भवानी मनरमणी माता पुरवासिनी
चौदा
भुवनांची स्वामिनी महिशासुरमर्दीनी
नेसुनी
पाटवा पिवळा हार शोभे गळा
हाती
घेऊनीया त्रिशुळा भाळी कुमकुम टीळा ॥धृ॥
जय
जय भवानी ..........................
अंगी
ल्यालीसे काचोळी वर मोत्याची जाळी
बिजली
चमकली पिवळी गळा हो गळसरी ॥१॥
जय
जय भवानी ..........................
पायी
घागरीया घुळघुळ नाकी मुक्ताफ़ळं
माथा
शोभते कुरवळ नयनी हे काजळं ॥२॥
जय
जय भवानी ..........................
सिंहावरी
तु बैसोनी मारती पानं-दानं
तुजला
आलो मी शरण गोसावी नंदन ॥३॥
जय
जय भवानी..........................