Blog Views

आरती दासबोधाची


|| आरती दासबोधाची ||

वेदांत संमतीचा  काव्यसिंधु  भरला ।
श्रुति शास्त्रग्रंथ गीता साक्ष संगम केला ।
महानुभाव संतजनी अनुभव चाखीला ।
अज्ञान जड जीवा मार्ग सुगम जाला  ॥ १ ॥
जय जय  दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा ।
आरती वोवाळीन विमळज्ञान बाळबोध ॥ धृ॥
नवविधा भक्तिपंथे  रामरुप अनुभवी 
चातुर्यनिधी  मोठा  मायाचक्र  उगवी ।
हरिहरहृदयींचें  गुह्य  प्रगट  दावी   
बद्धचि सिद्ध जाले असंख्यात मानवी  ॥ २ ॥
वीसहि  दशकींचा  अनुभव जो पाहे 
नित्यनेम विवरितां स्वयें ब्रह्मचि होये 
अपार पुण्य गांठी तरी श्रवण  लाहे 
कल्याण  लेखकाचें  भावगर्भ  हृदयी 



श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs