॥
आरती श्री समर्थांची ॥
आरती रामदासा । सद्गुरु सर्वेशा ।
कायावाचा
मनोभावें । वोवाळूं परेशा ॥ १ ॥
रामदास
मूर्तिमंत । रामचंद्र अवतार ।
कलियुगीं
अवतरोनी । केला भक्तांचा उद्धार ॥ २ ॥
वैराग्य
भक्ति ज्ञान । शांति क्षमा विरक्ती ।
विवेक
सालंकृत । क्षमा दया सर्वभूतीं ॥ ३ ॥
सच्चिदानंदघन
। रामदास केवळ ।
दिनकर
कृपायोगें । ’रामचंद्र’ निर्मळ ॥ ४ ॥
॥
श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥
॥
जय जय रघुवीर समर्थ ॥