Blog Views

!!श्री आरती परशुरामाची!!



!!श्री आरती परशुरामाची!!

जय जयाजी परशुरामा ! तुज आरती ओवाळी नेई मज निजधामा !!धृ!!

पाप कर्म करोनी! राज्य करीत असे या वनी!!
ऋषी मुनी त्रासले! विनवित असे नारायणी!!
विनवनी केली प्रथम! शंकरा रक्ष आम्हा मनी!!
शंकरे अवतारी धरनी! रुप असे जमद्गग्नी!!
जय जयाजी परशुरामा ! तुज आरती ओवाळी नेई मज निजधामा !!१!!

शंकरे अर्धांगीनी! अवतारे नामे रेणुका जणनी!!
विप्र कुले जन्मती दोन्ही! दुष्टांच्या नाश असे यांचे मनी!!
दुष्टा वधोनी! विप्रा रक्षी प्रार्थीतसे नारायणी!!
वेळ असे अधर्मा शिक्षोनी! धर्मा स रक्षोनी!!
जय जयाजी परशुरामा ! तुज आरती ओवाळी नेई मज निजधामा !!२!!

घेई सहावा अवतार नारायणी! माता असे रेणुका जननी!!
माता पीता आनंदोनी! रामभद्र नाम ठेओनी!!
पाठवि कैलास वसोनी! शिक्षा प्राप्त करोनी!!
गणेश देई परशु नाम! प्रसीद्ध होई परशुरामी!!
जय जयाजी परशुरामा ! तुज आरती ओवाळी नेई मज निजधामा !!३!!

क्रतुविर-राकावती पुत्र! कार्तवीर्याजुन त्रासे  विप्रोनी!!
कार्तवीर्याजुना असे! आर्शीवाद दत्त कृपोनी!!
सहस्रहस्त असे! सहर्स्राजुना नामे म्हणनोनी!!
सहर्स्राुजुना त्रास देत असे! विप्र ऋषी मुनी!!
जय जयाजी परशुरामा ! तुज आरती ओवाळी नेई मज निजधामा !!४!!

वधिता सहर्स्राजुन रक्षोनी! विप्र ऋषी मुनी!!
एकविस समयी! निक्षेत्रीय पृथ्वी करोनी!!
उद्धरीले जग धन्य झालो मी! विप्र कुळे जन्मोनी!!
पुरुषोत्तम भट्ट असे! रज सदैव तुज चरणी!!
जय जयाजी परशुरामा ! तुज आरती ओवाळी नेई मज निजधामा !!५!!


पुरुषोत्तम भट्ट संभाजीनगर


श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs