Blog Views

*गणपतीला २१ दुर्वा वाहतांनाचा मंत्र*

🌹 *गणपतीला २१ दुर्वा वाहतांनाचा मंत्र* 🌹

*एकाविंशति दूर्वाम् गृहीत्वा तन्मध्यतो गंध पुष्पाक्षतैर्युतं युग्मं एकैकनाम समर्प्य,* *अवशिष्यासेकां दूर्वा इलोकद्वयेन समर्पयेत् ।*

हा मंत्र म्हणून २१ दूर्वांना गंध अक्षता लावून हातात घ्याव्यात आणि पुढील मंत्र म्हणून एकेकी नांवानंतर प्रत्येकी २ दूर्वा वहाव्यात.

नांवे अशी

*गणाधिपाय नमः ।*
*उमापुत्राय नमः ।*
*अघनाशनाय नमः ।*
*विनायकाय नमः ।*
*ईशपुत्राय नमः ।*
*सर्वसिद्धिविनायकाय नमः ।*
*एकदंताय नमः ।*
*इभवक्ताय नमः ।*
*आखुवाहनाय नमः ।*
*कुमार गुरवे नमः ।*

अशा प्रकारे प्रत्येकी २ दुर्वा वाहल्यानंतर १ दुर्वा शिल्लक रहाते, ती दुर्वा खालील मंत्र म्हणून वाहावी.

*गणाधिप नमस्तेस्तु उमापुत्राघनाशत।*
*एकदन्ते भवकत्रेति तथा मूषकवाहन ।*
*विनायकेश पुत्रेति सर्व सिद्धि प्रदायक ।*
*कुमार गुरूवे नित्यं पूजनीयः प्रयन्ततः ॥*
*श्री सिद्धीविनायक नमः । दूर्वामेकां समर्पयामि ।*

असे म्हणून इरलेली १ दूर्वा गणपतीला वाहावी.

*अशोककाका कुलकर्णी*

श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs