*🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩*
*ॐ नमो व्यंकटेश्वराय नम :🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩*
*🌺 ..श्री. व्यंकटेश विजय ..🌺*
__________🔺___________
अध्याय :- १२..( अंतिम अध्याय)
मागील अकराव्या अध्यायात राजा तोंडमान याने भगवंतांना मंदिर बांधून देऊन तेथे राहविले ही हकीकत येऊन गेली आहे. राजा तोंडमान न्यायनीतीने उत्तम प्रकारे राज्य करीत होता. त्याच्या राज्यात प्रजा सुखी होते. या प्रकारे काही दिवस गेल्यावर एक आश्चर्यकारक घटना त्याच्या राज्यात घडली ती अशी-
एके दिवशी एक ब्राह्मण आपली पत्नी एक पुत्र यांना राजाकडे घेऊन आला व म्हणाला "राजा मी यात्रेस निघालो आहे. माझा मुलगा लहान असून पत्नी गरोदर पाच महिन्यांची आहे. तिला मजबरोबर चालवणे अशक्य असल्याने तू त्यांना आपल्याकडे ठेवून घे "राजाने ब्राह्मणांच्या म्हणण्यास मान्यता देऊन एका व्यवस्थित बंद जागेत चार सहा महिन्यांची शिधा सामग्री देऊन त्यांना ठेवून घेतले. ब्राह्मण यात्रेस गेला. राजास त्याने धन्यवाद दिले.
पुढे ती ब्राह्मणपत्नी प्रसूत झाली. तिला मुलगी झाली. राजा आपल्या राज्यकारभाराच्या कामात ही गोष्ट विसरून गेला चार सहा महिन्यांची अन्नधान्य सामग्री संपल्यावर ते ब्राह्मण कुटुंब अन्नपाण्याविना तडफडून मरून गेले त्यांच्या अस्थि शिल्लक राहिल्या.
ब्राह्मण यात्रेत रमल्यामुळे त्याला येण्यास २ वर्षे काळ लोटला. परत आल्यावर तो राजास भेटून म्हणाला, "आमचे कुटुंब कोठे आहे? पत्नी प्रसूत झाली काय? तिला काय झाले आहे? कन्या की पुत्र ?" इ. याप्रमाणे राजा भानावर आला. त्याने आपणास सावरून म्हटले. तुम्हास कन्यारत्न झाले. सर्व मंडळी ठीक आहेत. आताच ते देवदर्शनास गेले आहेत. आपण आपले आन्हिक आटोपून यावे. ब्राह्मण गेल्यावर राजाने ब्राह्मण कुटुंबाची सेवकाकडून चौकशी करविताच त्याला तेथे फक्त अस्थि आढळून आल्या. राजा घाबरला. त्याने भगवंताकडे धाव घेतली. घडलेला सर्व इतिहास सांगितला व आपणास यातून वाचवावे अशी प्रार्थना केली.
भगवंतांनी त्या अस्थि आणवल्या व आपल्या करुणापूर्ण अमृतमयी दिव्य दृष्टीने त्यांचे अवलोकन करताच ते तिघेही पुर्ववत सजीव झाले. राजास आनंद झाला भगवंतांनी ही गोष्ट कोठेही न सांगावी असे सांगून तेव्हापासून ते गुप्त होऊन राहिले आहेत. हे कलियुग आहे अधर्म फार माजणार असा इशारा भगवंतांनी दिला आहे.
पुढे ब्राह्मणास कन्यापुत्र वगैरे भेटले. त्यांनी कोठे गेला होता असे विचारता आपण भगवंताच्या उदरात सर्वविश्व पाहिले असे सांगताच ब्राह्मणास आपल्या विद्वतेबद्दल पश्चात्ताप झाला. त्याने भक्तीची प्रशंसा केली. आपले कन्या पुत्र घेऊन तो राजास भेटून आपल्या गावी गेला.
राजा तोंडमान याने आपल्यावर देवांनी अनंत उपकार केले व आपणास मोठ्या संकटातून वाचविले याबद्दल एकदा सोन्याच्या सहस्त्र तुळशी घेऊन भगवंत दर्शनास आला. त्याने भगवंताच्या चरणी मातीच्या तुळशी पाहिल्या. त्याने देवास विचारताच देवांनी आपला एक कुंभार भक्त आहे त्याने वाहिल्याचे व सर्व भक्तांवर आपली सारखी दृष्टी असल्याचे सांगितले. आपला एक भीम नावा कुलाल भक्त आहे तो उत्तरेस राहतो हे ऐकून राजा त्या गावास गेला इतक्यात देवही तेथे आले. त्याने उभयतांचा सत्कार केला.
श्रीवेंकटेशांनी कुंभारास सायुज्य मुक्ति दिली व तोंडमानाच्या योग्यतेप्रमाणे त्या सरूपता मुक्ति देवांनी दिली.
*इति वेंकटेशविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत पुराण भविष्योत्तर ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ द्वादशाध्याय गोड हा ॥१७७॥*
(एकंदर ओविसंख्या ॥२१००॥)
*|| श्रीकृष्णार्पणमस्तू ||*
〰〰〰〰🌺〰〰〰〰
*सं :- श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच ग्रुप*