|| श्री गणेशाय: नमः ||
|| श्री गुरुचरणारविंदां भ्याम नमः ||
|| अथ श्री गणपती स्तोत्र प्रारंभ ||
जय जयाजी गणपती |
मज द्यावी विपुल मती |
कारवाया तुमची स्तुती |
स्पुर्ती द्यावी मज अपार || ०१ ||
तुझे नाम मंगलमूर्ती |
तुज इंद्र चंद्रा ध्याती |
विष्णू शंकर तुज पूजिती |
अव्यया ध्याती नित्य काळी || ०२ ||
तुझे नाव विनायक |
गजवदना तू मंगल दायक |
सकल नाम कलिमलदाहक |
नाम-स्मरणे भस्म होती || ०३ ||
मी तव चरणांचा अंकित |
तव चरणा माझे प्रणिपात |
देवधी-देवा तू एकदंत |
परिसे विज्ञापना माझी || ०४ ||
माझा लडिवाळ तुज करणे |
सर्वापरी तू मज सांभाळणे |
संकटामाझारी रक्षिणे |
सर्व करणे तुज स्वामी || ०५ ||
गौरी पुत्र तू गणपती |
परिसावी सेवकाची विनंती |
मी तुमचा अनन्यार्थी |
रक्षिणे सर्वार्थेची स्वामिया || ०६ ||
तूच माझा माय बाप |
तूच माझा देवराय |
तूच माझी करिशी सोय |
अनाथ नाथा गणपती || ०७ ||
गजवदना श्री लम्बोदरा |
सिद्धीविनायका भालचंद्रा |
हेरंभा शिव पुत्रा |
विघ्नेश्वरा अनाथ बंधू || ०८ ||
भक्त पालका करि करुणा |
वरद मूर्ती गजानना |
परशुहस्ता सिंदुरवर्णा |
विघ्ननाशना मंगलमूर्ती || ०९ ||
विश्ववदना विघ्नेश्वरा |
मंगलाधीषा परशुधरा |
पाप मोचन सर्वेश्वरा |
दिन बंधो नाम तुझे ||१० ||
नमन माझे श्री गणनाथा |
नमन माझे विघ्नहरता |
नमन माझे एकदंता |
दीनबंधू नमन माझे || ११ ||
नमन माझे शंभूतनया |
नमन माझे करुणांलया |
नमन माझे गणराया |
तुज स्वामिया नमन माझे || १२ ||
नमन माझे देवराया |
नमन माझे गौरीतनया |
भालचंद्रा मोरया |
तुझे चरणी नमन माझे || १३ ||
नाही आशा स्तुतीची |
नाही आशा तव भक्तीची |
सर्व प्रकारे तुझिया दर्शनाची |
आशा मनी उपजली || १४ ||
मी मूढ केवल अज्ञान |
ध्यानी सदा तुझे चरण |
लंबोदरा मज देई दर्शन |
कृपा करि जगदीशा || १५ ||
मती मंद मी बालक |
तूच सर्वांचा चालक |
भक्तजनांचा पालक |
गजमुखा तू होशी || १६ ||
मी दरिद्री अभागी स्वामी |
चित्त जडावे तुझिया नामी |
अनन्य शरण तुजला मी |
दर्शन देई कृपाळुवा || १७ ||
हे गणपती स्तोत्र जो करि पठण |
त्यासी स्वामी देईल अपार धन |
विद्या सिद्धी चे अगाध ज्ञान |
सिंदूरवदन देईल पै || १८ ||
त्यासी पिशाच भूत प्रेत |
न बाधिती कदा काळात |
स्वामीची पूजा करोनी यथास्थित |
स्तुती स्तोत्र हे जपावे || १९ ||
होईल सिद्धी षड्मास हे जपता |
नव्हे कदा असत्य वार्ता |
गणपती चरणी माथा |
दिवाकरे ठेविला || २० ||
|| इति श्री गणपती स्तोत्र संपूर्ण ||
गणेश अंगारकी श्लोक
गणेशाय नमस्तुभ्यं , सर्व सिद्धि प्रदायक ।
संकष्ट हरमे देवं , गृहाणार्घ्यम् नमोऽस्तुते ॥
कृष्णपक्षे चतुर्थ्यातु , सम्पूजितं विधूदये।
क्षिप्रं प्रसीद देवेश, अंगारकाय नमोऽस्तुते ॥