Blog Views

||गणेशवंदना||

||गणेशवंदना||

प्रारंभी विनंती करु गणपति विद्यादयासागरा|
अज्ञानत्व हरुनि बुध्दी मती दे आराध्य मोरेश्वरा || 
चिंता क्लेश दारिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी | 
हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी | 

मोरया मोरया गोड हे नाम तुझे , कृपा सागरा हेचि माहेर माझे | 
तुझी सोंड बा वाकुडी ऐकदंता, मला बुध्दी दे मोरया गुणवंता| 
गणपती म्हणे वरेण्या दृष्टांच्या संगती न लागावे | 
ज्याला मोक्षपदाची इच्छा त्याने सदा मला ध्यावे || 

मोरया मोरया मी बाळ तान्हे, तुझी मी सेवा करुकाय जाणे | 
अन्याय माझे कोट्यानुकोटी, मोरेश्वरा बा तु घाल पोटी॥

नेत्री दोन हीरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे | 
माथा शेंदुर पाझरे , वरी खरे बरे दुर्वांकुराचे तुरे || 
माझे चित्त विरे, मनोरथ पुरे ,देखोनि चिंता हरे| 
गोसावी सुत वासुदेव कवि रे त्या मोरयाला स्मरे||

श्री गणपती स्थापना प्राणप्रतिष्ठा पूजाविधी अभिषेक सह

🟠🚩पुजा साहित्य यादी : हळद, कुंकु, गुलाल, शेंदूर, गूळ-खोबरे, समई, नीरंजन, अष्टगंध, अक्षदा, रांगोळी, फुलवात वात, तेलवात, काडे पेटी, पळी भांड...

Popular Blogs