Blog Views

॥ अर्गलास्तोत्रम् ॥

🌹 *॥ अर्गलास्तोत्रम् ॥* 🌹

*( अर्थासह )*

*॥ श्री॥*

*।। श्रीचण्डिकाध्यानम् ।।*

*ॐ बन्धूककुसुमाभासां पञ्चमुण्डाधिवासिनीम् ।*
*स्फुरच्चन्द्रकलारत्नमुकुटां मुण्डमालिनीम् ॥*
*त्रिनेत्रां रक्तवसनां पीनोन्नतघटस्तनीम् ।*
*पुस्तकं चाक्षमालां च वरं चाभयकं क्रमात् ॥*
*दधतीं संस्मरेन्नित्यमुत्तराम्नायमानिताम् ।*

*या चण्डी मधुकैटभादिदैत्यदलनी या माहिषोन्मूलिनी*
*या धूम्रेक्षणचण्डमुण्डमथनी या रक्तबीजाशनी ।*
*शक्तिः शुम्भनिशुम्भदैत्यदलनी या सिद्धिदात्री परा*
*सा देवी नवकोटिमूर्तिसहिता मां पातु विश्वेश्वरी ॥*

*।। अथ अर्गलास्तोत्रम् ।।*

*ॐ अस्य श्रीअर्गलास्तोत्रमन्त्रस्य विष्णुर्ऋषी:, अनुष्टुप् छन्दः, श्रीमहालक्ष्मीर्देवता, श्रीजगदम्बाप्रीतये सप्तशतिपाठाङ्गत्वेन जपे विनियोगः ।*

ॐ या अर्गला स्तोत्र मंत्राचा विष्णू हा ऋषी आहे, अनुष्टुभ हा छंद आहे. श्रीमहालक्ष्मी ही देवता आहे. श्रीजगदंबेची कृपा व्हावी म्हणून तिच्या प्रीती करिता सप्तशतीचा पाठ करताना त्या पाठाचा एक भाग म्हणून जपामध्ये याचा विनियोग व्हावा.

*ॐ नमश्वण्डिकायै । मार्कण्डेय उवाच ।*

चंडिकादेवीला नमस्कार असो. मार्कंडेय ऋषी म्हणाले.

*जयन्ती मङ्गला काली भद्रकाली कपालिनी ।*
*दुर्गा शिवा क्षमा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तु ते ॥१॥*

ॐ जयन्ती, मङ्गला, काली, भद्रकाली, कपालिनी, दुर्गा, शिवा, क्षमा, धात्री,
स्वाहा आणि स्वधा या नावांनी प्रसिद्ध असणा-या जगदंबे तुला नमस्कार असो.

*ॐ जय त्वं देवि चामुण्डे जय भूतापहारिणि ।*
*जय सर्वगते देवि कालरात्रि नमोऽस्तु ते ॥२॥*

देवी चामुंडे देवी! तू सर्व प्राणिमात्रांची पीडा हरण करणारी, सर्वत्र व्याप्त असणारी, कालरात्री स्वरुपिणी अशी आहेस. तुझा जयजयकार! तुला नमस्कार असो.

*मधुकैटभविध्वंसि विधातृवरदे नमः ।*
*रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ ३॥*

हे मधुकैटभ दैत्यांना मारणा-या आणि ब्रह्मदेवाला वरदान देणा-या देवी! तुला नमस्कार असो. तू मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रुचा नाश कर.

*महिषासुरनिर्नाशि भक्तानां सुखदे नमः ।*
*रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ ४॥*

हे महिषासुराचा नाश करणा-या आणि चंड-मुंड दैत्यांचा विनाश करणा-या देवी! तू मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रुचा नाश कर.

*धूम्रनेत्रवधे देवि धर्मकामार्थदायिनि ।*
*रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ ५॥*

धुम्रनेत्र राक्षसाचा वध करणा-या; धर्म, अर्थ आणि काम हे पुरुषार्थ देणा-या हे देवी! तू मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रुचा नाश कर.

*रक्तबीजवधे देवि चण्डमुण्डविनाशिनि ।*
*रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ ६॥*

हे रक्तबीज दैत्याचा वध आणि चंड-मुंड दैत्यांचा विनाश करणा-या देवी! तू मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रुचा नाश कर.

*शुंभस्यैव निशुम्भस्य धूम्राक्षस्य च मर्दिनि ।*
*रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ ७॥*

हे शुंभ, निशुंभ आणि धुम्रलोचनाचे मर्दन करणा-या देवी! तू मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रुचा नाश कर.

*वन्दिताङ्घ्रियुगे देवि सर्वसौभाग्यदायिनि ।*
*रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ ८॥*

हे देवी! सर्वांकडुन तुझे चरणकमल वंदन केले जातात, तसेच तू सर्व सौभाग्यदायिनी आहेस. तू मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रुचा नाश कर.

*अचिन्त्यरूपचरिते सर्वशत्रुविनाशिनि ।*
*रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ ९॥*

हे देवी! तुझे रुप आणि चरित्र अचिंत्य(अंदाज करता येणार नाही असे) आहे, तसेच तू शत्रूचा विनाश करणारी आहेस. तू मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रुचा नाश कर.

*नतेभ्यः सर्वदा भक्त्या चापर्णे दुरितापहे ।*
*रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ १०॥*

हे चंडिके! तू भक्तीने नम्र झालेल्या भक्तांचे पाप दूर करणारी आहेस. तू मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रुचा नाश कर.

*स्तुवद्भ्यो भक्तिपूर्वं त्वां चण्डिके व्याधिनाशिनि ।*
*रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ ११॥*

हे चंडिके! तू व्याधींचा नाश करणारी आहेस. जे तुझी भक्तीने स्तुती करतात त्यांना तू रूप दे, जय दे, यश दे आणि त्यांच्या शत्रुचा नाश कर.

*चण्डिके सततं ये त्वामर्चयन्तीह भक्तित:।*
*रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ १२॥*

हे चंडिके! या लोकी जे भक्तीने तुझी अर्चना करतात त्यांना तू रूप दे, जय दे, तू यश दे आणि त्यांच्या शत्रुचा नाश कर.

*देहि सौभाग्यमारोग्यं देहि देवि परं सुखम् ।*
*रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ १३॥*

हे देवी! तू मला सौभाग्य दे, आरोग्य आणि परम सुख दे. तू मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रुचा नाश कर.

*विधेहि देवि कल्याणं विधेहि विपुलां श्रियम् ।*
*रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ १४॥*

हे देवी! माझे कल्याण कर, मला उत्तम संपत्ती(वैभव) दे. मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रुचा नाश कर.

*विधेहि द्विषतां नाशं विधेहि बलमुच्चकैः ।*
*रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ १५॥*

हे देवी! माझा द्वेष करणा-या शत्रुंचा नाश कर. माझे बल वाढव. मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रुचा नाश कर.

*सुरासुरशिरोरत्ननिघृष्टचरणेऽम्बिके ।*
*रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ १६॥*

हे चंडिके! देव आणि राक्षसांच्या मस्तकावरिल रत्ने तुझ्या चरणावर घासतात, अर्थात देव आणि राक्षस तुझ्या चरणावर लिन असतात, नतमस्तक असतात. मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रुचा नाश कर.

*विद्यावन्तं यशस्वन्तं लक्ष्मीवन्तं जनं कुरु ।*
*रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ १७॥*

हे देवी! तू लोकांना विद्वान, यशस्वी आणि लक्ष्मीवंत कर. मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रुचा नाश कर.

*प्रचण्डदैत्यदर्पघ्ने चण्डिके प्रणताय मे ।*
*रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ १८॥*

हे चंडिके! तू प्रचंड दैत्याचा गर्व(उन्मत्तपणा) नष्ट करणारी आहेस. तुला नमन करणा-या, शरणागत असणा-या मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रुचा नाश कर.

*चतुर्भुजे चतुर्वक्त्रसंसुते परमेश्वरि ।*
*रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ १९॥*

हे चतुर्मुख ब्रह्मा कडून प्रशंसित, चार भुजा असणा-या परमेश्वरी! तू मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रुचा नाश कर.

*कृष्णेन संस्तुते देवि शश्वद्भक्त्या सदाम्बिके ।*
*रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ २०॥*

भगवान श्रीकृष्णाकडून भक्तीपूर्वक नित्य प्रशंसित अशा अंबिके! तू मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रुचा नाश कर.

*हिमाचलसुतानाथ संस्तुते परमेश्वरि ।*
*रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ २१॥*

हिमाचलसुतानाथ अर्थात भगवान शंकरांकडुन प्रशंसित अशा अंबिके! तू मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रुचा नाश कर.

*इन्द्राणीपतिसद्भावपूजिते परमेश्वरि ।*
*रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ २२॥*

इन्द्राणीपति अर्थात इंद्रदेवाकडुन सद्भावाने पूजिल्या जाणा-या अशा परमेश्वरी तू मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रुचा नाश कर.

*देविप्रचण्डदोर्दंड दैत्यदर्पविनाशिनी ।*
*रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ २३॥*

हे अंबिके! तू प्रचंड भुजा असणा-या दैत्यांचा गर्वहरण करणारी आहेस. तू मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रुचा नाश कर.

*देवि भक्तजनोद्दामदत्तानन्दोदयेऽम्बिके ।*
*रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ २४॥*

हे अंबिके! तू भक्तजनांना परम आनंद प्रदान करणारी आहेस. मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रुचा नाश कर.

*भार्यां मनोरमां देहि मनोवृत्तानुसारिणीम् ।*
*तारिणि दुर्गसंसारसागरस्याचलोद्भवे ।।२५।।*

हे देवी! तू मला माझ्या मनासारखी वागणारी, उत्तम कुळातली आणि दुर्लभ्य अशा संसाररुपी सागरात तारुन नेणारी असावी. रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रुचा नाश कर.

*इदं स्तोत्रं पठित्वा तु महास्तोत्रं पठेन्नरः ।*
*सप्तशतीं समाराध्य वरमाप्नोति दुर्लभम् ॥ २६॥*

जो हे स्तोत्रठपण करुन, सप्तशतीरुपी महावस्त्राचे पठण करतो त्याला सातशे संख्ये इतकी किंवा त्यापेक्षा जास्त संपत्ती प्राप्त होते.
॥ इति श्रीमार्कण्डेयपुराणे अर्गलास्तोत्रं समाप्तम् ॥

श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs