Blog Views

श्री वासुदेवानंदसरस्वती रचित श्रीखंडेरायाची दोन ध्याने

श्रीखंडेरायाची दोन ध्याने प.प. वासुदेवानंदसरस्वती
स्वामीमहाराजांच्या हस्ताक्षरांत लिहिलेली आहेत     
|| अश्वारूढं शिवं साक्षान्मणिमल्लारिमर्दनं ||
|| महालसापतिं देवं खंडराजं नमाम्यहं ||१||
|| भूभारोत्तारणार्थाय अवतीर्ण स्वयं शिवम ||
|| वन्दे महालसाकान्तं मणिमल्लारिमीश्वरं ||२||

|| इति श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचितं
  श्री खंडोबाचा अभंग ||
।।देव खंडेराव महालसाधव ।जेजोरीचा देव भावलभ्य ।।१।।
।।लभ्य नसे योगा तो हा भक्तियोगा । गम्य घे अभंगा अंगा देव ।।२।।
।।देव दुःखहारी मणि मल्लारी । निजभक्तां तारी वारी क्लेश ।।३।।
।।महालसाकांत हर मूर्तिमंत । खंडोबा महंत ख्यात देवीं ।।४।।

जो इंद्रचंद्रसूर्यमुखसुरासुरार्चित । खंडेश्वर परिहरि दर धर सुतांचित ।।ध्रु ।।
जो एक लोकशोकदुखःहारक । हरि ज्याचें यश नाकेशकेशवादिक ।।
गाती दिनरात दीनहीनतारक । तो हा स्मरहा पुरहा सुरवरेश्वर ।।१।।
जेजोरी गिरिशिखरीं नित्य वसतसे । नच दुसरे स्थान बरें दिसतसें ।।
तेथें भव साक्षाच्छिव इष्ट देतसे । भावें जावें गावें तारितो हर ।।२।।
त्या सांबा खंडोबा पाहुं जाति जे । त्यांचे काम पूर्ण होति चित्तिं असति जे ।।
न कदापी येत मनीं आणि जे दुजें । परिसा ऐसा सहसा वरद हा हर ।।३।।

श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs