Blog Views

श्रीस्वामी समर्थध्यानाष्टक

'श्रीस्वामी समर्थध्यानाष्टक'

भव्यमूर्ती कसा शोभे उंच धिप्पाड साजरा
मोद होई जना लागी मुखडा पाहता बरा||१||

विशाल नेत्र कैसे ते कर्ण खांद्यास लागती
गौरकांती जयाचे ते बाहू जानुस टेकती||२||

लंबोदर पहा त्याचे गजास्या परी भासते
वक्षस्थल तसे मोठे नास अव्यंग शोभते||३||

रेशमासारखे ऐसे पाद ज्याचे अति मृदू
ब्रह्मादि जाहले मुग्ध काय मी त्या मुखे वदू||४||

एक रुद्राक्ष कंठी तो कौस्तुभापरी भासतो
मोतियाच्या कुंडलाने कर्णही बहु शोभतो||६||

तुलसिकाष्ठमाला ती वैजयंतीच दुसरी
पहा ती योगीरायाची ज्ञानमुद्रा तशी बरी||७||

कपाळी केशरी गंध कस्तुरीचा टिळा तसा
कटी कौपिन लेवोनी स्वामिनाथ दिसे कसा||८||

पूर्णावतार विष्णूचा बुद्धिग्रामासी पातला
भक्त तारावया लागी यतीचा वेष घेतला||९||

स्तोत्र हे स्वामिदासाचे नित्य कोणीही वाचील
शीघ्र त्या स्वामिनाथाचा कृपावर्षाव होईल||१०||

श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs