---------------------------------------
*॥ धार्मिक कार्यात नेहमी लागणारी माहिती ॥*
--------------------------------------
*1) पंचामृत :-*
दूध, दही, तूप, मध, साखर.
*2) पंचगव्य:-*
गोमुत्र, गोमय(गाईचे शेण) दूध, दही, तूप.
*3) पंचखाद्य:-*
खोबरे, खारीक, डाळ, पोहे, लाह्या.
*4) पंचरत्न:-*
सुवर्ण, चांदी, मोती, पोवळे, राजावर्त(हिरा).
*5) पंचरंग:-*
रांगोळी- पांढरी, लाल, पिवळी, हिरवी, काळी.
*6) पंचपल्लव:-*
डहाळे(टाळे) वड, पिंपळ, उंबर, पायर, आंबा.
*7) पंचत्वचा:-*
झाडाच्या साली:- वड, पिंपळ, जांभूळ, आंबा, पायर.
------------------
*सप्तमृत्तिका:-*
--------------------
*१) गजस्थान –*
हत्तीच्या पायाखालील माती.
*२) अश्वशाला:-*
घोडे जेथे ठेवण्याची जागा असते तेथील माती.
*३) चवाठा :-*
चार रस्ते जेथे एकत्र येतात तेथील माती.
*४) संगम :-*
दोन नद्यांचा संगम जेथे होतो तेथील माती.
*५) वारूळ :-*
मुंग्या जेथे राहतात त्या वारूळातील माती.
*६) डोह :-*
एखाद्या ठिकाणी भरपूर पाणी साठते(नैसर्गिक)तेथील माती.
*७) गोठा :-*
गाई, म्हौस बांधण्याची जागा तेथील माती.
*सप्तधान्य :-*
सातू, गहू, तीळ, कांग, सावे, चणे, साळी.
*समिधा:-*
रुई, पळस, खैर, आघाडा, पिंपळ, उंबर, शमी, दूर्वा, दर्भ.
-----------------------
*पूजेचे साहित्य —*
-------------------------
अक्षता, हळद, कुंकू, गंध, फुले, तुळशी, दूर्व, बेल, उदबत्ती, निरांजन, कापूर,वस्त्र,फळं,नारळ, विडा, नैवेद्य व पंचामृत (दूध, दही, तूप, मध आणि साखर, मध नसेल तर थोडा गूळ)
*वापरती भांडी –*
तांब्या, भांडे,(पंचपात्र),पळी ताम्हण, अभिषेकपात्र,निरांजन, समई ( विषेश प्रसंगी ) घंटा.
--------------------------------------
*पूजेचे साहित्य कसे असावे ?*
----------------------------------------
सर्व पूजेची भांडी तांब्या , पितळेची – शक्य तर चांदीची असावी. स्टेनलेस स्टीलची अथवा प्लॅस्टिकची नसावी.
*गंध –*
चंदनाचे उगाळतात. त्यात कधी केशर घालतात. करंगळी जवळच्या बोटाने (अनामिकेने) देवाला गंध लावावे.
सहाणेवर गंध उगाळून तो प्रथम दुसऱ्या तबकडीत घेऊन गंध लावावा . देवासाठी गंध हातावर उगाळू नये .
*अक्षता –*
धुतलेल्या अखंड तांदुळांना थोडेसेच कुंकु लावून त्या अक्षता वाहाव्या.
शाळिग्राम आणि शंख यांना अक्षता वाहू नयेत.
शंख नेहमी पाण्याने भरून ठेवावा , दुसऱ्या दिवशी ते पाणी कृष्णावर / देवांवर स्नान म्हणून अर्पण करावे .
*हळद –*
कुंकू याखेरीज गुलाल आणि बुक्काही (काळा/ पांढरा अबीर ) पूजा साहित्यात असावा.
गणपतीला शेंदूर, विठ्ठलाला बुक्का (काळा अबीर ) वाहण्याची वहिवाट आहे.
*फुले –*
ऋतुकालोद्भभव पुष्पे म्हणजे त्या त्या ऋतूत येणारी ताजी आणि सुवासिक फुले देवाला वाहावी.
जाई, जूई, कण्हेर, मोगरा, जास्वंदी चाफा, कमळे, पारिजातक, बकुळ, तर वगैरे फुले सर्व देवांना चालतात.
*विष्णुला –*
चाफा, मोगरा, जाई, कुंद वगैरे फुले आवडतात.
*शंकराला –*
पांढरा कण्हेर, कुंद, धोतरा इ. पांढरी फुले वाहतात.
*गणपतीला –*
गुलाब, जास्वंद वगैरे तांबडी फुले प्रिय असतात. गणपतीला दूर्वा वाहातात. गणपतीला तुळस वाहण्याची प्रथा नाही.
गणपतीला रक्तचंदनाचे गंध आणि शेंदूर प्रिय असतो.
देवीला सर्व सुवासिक फुले चालतात.
*पाने –*
विष्णु, विठ्ठल, शाळिग्राम या देवतांना तुळस, शंकराला बेल तर गणपतीला दूर्वा वाहातात.
*धूप –*
देवाला उदबत्ती ओवाळून तिचा धूप देवावर दरवळेल अशी ठेवावी. सुगंध दरवळावा.
अगरबत्ती देव्हाऱ्याच्या आत मध्ये ठेवू नये , बाहेर बाजूला ठेवावी .
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏