🌸संतवाणी🌸
!! श्री नाम महिमाष्ट्क !!
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
प.पु.सद्गुरु श्री स्वामी नारायनानंद सरस्वती (पूर्वाश्रमीचे प.पु.बालयोगी श्रीदत्तानंदजी महाराज ओतुरकर )यांच्या प्रासादिक लेखणीतून आकाराला आलेले "नाममहिमाअष्ट्क " -त्याची रचना श्री समर्थ रामदासांच्या " मनाचे श्लोक " या पद्धतीची असुन हे प्रासादिक नामाष्ट्क नामनिष्ठा वाढविणारे आहे म्हणून भाविकांनी त्याचा नित्यानेमामध्ये त्याचा अवश्य समावेश करावा ...!!
........................................................
🌹!! श्री नाममहिमाष्ट्क !! 🌹
मना नाम घेता जगी झाले शांत !
मना नाम घेता जगी झाले भक्त !
मना नाम घेता जगी झाले मुक्त !
मना नाम घेता जगी झाले ! कृतार्थ !! १ !!
मना नाम घेता तुझे जाती रोग !
मना नाम घेता तुला साधे योग !
मना नाम घेता मिळे संतसंग !
मना नाम घेता मिळे पांडुरंग !! २ !!
मना नाम घेता जळे पाप भारी !
मना नाम घेता मिळे पुण्य भारी !
मना नाम घेता गळे गर्व भारी !
मना नाम घेता मिळे बा श्रीहरी !! ३ !!
मना नाम घेता तुझे दुःख हाटे !
मना नाम घेता तुला सौख्य भेटे !
मना नाम घेता तुला स्थैर्य वाटे !
मना नाम घेता तुला राम भेटे !! ४ !!
मना नाम घेता पळे स्वार्थ बुद्धी !
मना नाम घेता तदर्थी सुबुद्धी !
मना नाम घेता सर्वांग शुद्धी !
मना नाम घेता मिळे ऋद्धीसिद्धी !! ५ !!
मना नाम घेता तू निष्काम होसी !
मना नाम घेता तू निश्चल होसी !
मना नाम घेता तू निर्लिप्त होसी !
मना नाम घेता तू हरिसी पहासी !! ६ !!
मना नाम घेता तुला गोड वाटे !
मना नाम घेता जना प्रेम दाटे !
मना नाम घेता हरिभक्त भेटे !
मना नाम घेता हरिप्रेम साठे !! ७ !!
मना नाम घेता तू नरकी न जाये !
मना नाम घेता तू वैकुंठी राहे !
मना नाम घेता तुझे हित आहे !
मना नाम घेता तदा मुक्त होये !! ८ !!
🌹🌹 🌸🌸🌻🌻🌸🌸🌹🌹
रामकृष्णहरीरामकृष्णहरीरामकृष्णहरी
रामकृष्णहरीरामकृष्णहरीरामकृष्णहरी
रामकृष्णहरीरामकृष्णहरीरामकृष्णहरी
रामकृष्णहरीरामकृष्णहरीरामकृष्णहरी
रामकृष्णहरीरामकृष्णहरीरामकृष्णहरी
संकलन -विठ्ठल बडवर
🎋🌾🍃🍂🌱🎋☘🥀🍂🥀🌹