Blog Views

विश्वप्रार्थना

आतां विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञे तोषावें ।
तोषोनि मज द्यावें । पसायदान हे ।।१।।
जे खळांची व्यंकटी सांडो। तया सत्कर्मी रती वाढी ।।
भूता परस्परें पडो । मैत्र जीवांचे ।। २।।
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्ये पाहो ।
जो जे वांछील तो ते लाहो । प्राणिजात ।।३।।
वर्षत सकळमंगळ। ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।।
अनवरत भूमंडळी । भेटतू भुंता ।।४।।
चला कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणीचे गांव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥५॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥६॥
किंबहना सर्वसुख । पूर्ण होऊनी तिहीं लोकीं ।।
भजिजो आदिपुरूर्ख । अखंडित ||७||
आणि ग्रंथोपजीविये । विशेषी लोकीं इयें ।
दृष्टादृष्टविजयें । होआर्वे जी ॥८॥
येथ म्हणे श्रीविश्वेशरावो । हा होईल दानपसावो ।
येणें वरे ज्ञानदेवो । सुखिया झाला ।।९।।

श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs