श्री
गजानन महाराजांची आरती
जय जय सतचितस्वरूपा स्वामी गणराया।
अवतरलासी भूवर जड़-मूढ ताराया ll
जयदेव जयदेव ll धृ.॥
अवतरलासी भूवर जड़-मूढ ताराया ll
जयदेव जयदेव ll धृ.॥
निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी।
तें तूं तत्त्व खरोखर नि:संशय अससी।
लीलामात्रे धरिले मानवदेहासी ll१ll
तें तूं तत्त्व खरोखर नि:संशय अससी।
लीलामात्रे धरिले मानवदेहासी ll१ll
होऊ न देशी त्याची जाणिव तू कवणा ।
करुनि 'गणि गण गणात बोते' या भजना।
धाता नरहरि गुरुवार तूची सुखसदना।
जिकडे पाहावे तिकडे तू दिससी नयना ll२ll
करुनि 'गणि गण गणात बोते' या भजना।
धाता नरहरि गुरुवार तूची सुखसदना।
जिकडे पाहावे तिकडे तू दिससी नयना ll२ll
लीला अनंत केल्या बंकटसदनास।
पेटविले त्या अग्नीवाचुनि चिलमेस।
क्षणात आणिले जीवन निर्जल वापीस।
केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश ll ३ll
पेटविले त्या अग्नीवाचुनि चिलमेस।
क्षणात आणिले जीवन निर्जल वापीस।
केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश ll ३ll