॥ पद ॥
सद्गुरुपाय धरी।
मनुजा, सद्गुरुपाय धरी ।। धृ।।
जनन-मरण हे दुःख भोगिता।
उबग मनात धरी ।। मनुजाः ।।१।।
भवसागर हा दुस्तर तरण्या।
कोण सहाय करी ।। मनुजा: ।। २।।
गुरुपदकमला नित सेवुनिया।
निजहित हे विवरी ।। मनुजाः ।।३।।
दास हरी म्हणे सद्गुरुवाचुन।
अन्य कुणा न वरी ।। मनुजा: ।।४ ।।
रचयिता : प. पू. श्री हरिभाऊ निटूरकर जोशी