Blog Views

श्रीरामचंद्राची आरती (उत्कट साधुनि)

श्रीरामचंद्राची आरती 

उत्कट साधुनि शिळा सेतू बांधोनी।
लिंगदेह-लंकापुरि विध्वंसूनी ॥
कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी ।
देह-अहंभाव रावण निवटोनी ॥ १ ॥

जय एव जय देव निजबोधा रामा।
परमार्थे आरती सदभावें आरती परिपूर्णकामा ॥ धृ० ॥

प्रथम सीताशुद्धी हनुमंत गेला ।
लंका दहन करुनी अखया मारिला ॥
मारिला जंबूमाळी बुवनीं त्राहाटीला।
आनंदाची गुढी घेउनियां अला ॥ जय० ॥ २ ॥

निजबळे निजशक्ति सोडविली सीता।
म्हणुनी येणे झालें आयोध्यें रघुनाथा ॥
आनंदे वोसंडे वैराग्य भरता।
आरती घेउनी आली कौसल्या माता ॥ जय० ॥ ३ ॥

अनुहतवादित्रध्वनि गर्जति अपार।
अठरा पदमे वानर करिती भुभुःकार ॥
अयोध्येसी आले दशरथकुमार।
नगरी होत आहे आनंद थोर ॥ जय० ॥ ४ ॥

सहज सिंहासनीं राजा रघुवीर ।
सोहंभावें तया पूजा उपचार ॥
सहजांची आरती वाद्यांचा गजर ।
माधवदासा स्वामी आठवे ना विसर ॥ जय० ॥ ५ ॥

श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs