ब्राह्मण असण्याचे संस्कार जर आपली आधीची पिढी काही कारणाने विसरली असेल तर महत्त्वाचे संस्कार करून घेणे हे आपले कर्तव्य नाही का ??
श्रावणी म्हणजे आपले जाणावे मंतरुन घेणे. जानवे म्हणजे वाण्याच्या दुकानातून आणलेला दोरा अशी समजून आजकाल रूढ होत आहे. पण जानवे म्हणजे यज्ञोपवीत, हे किती परमपवित्र असते, त्यावर कोणते संस्कार करावे लागतात हे जाणणे, तसेच सोयर, सुतक, स्मशानात भेट अश्या घटनांच्या नंतर ते बदलणे आवश्यक का असते ? हे आपण स्वतः त्यावर संस्कार केले तरच कळते.
यासाठी आपण त्यासंदर्भात केलेली व्यवस्था समजून घेण्यासाठी सर्व बंधू व विशेष करून भगिनींनी खालील लेख लक्ष देऊन वाचावा.
मंदार संत
================≠=============
Mani Shidhore यांच्या सौजन्याने
श्रावणी :
स्वाध्यायेन व्रतैर्होमैस्त्रैविद्येनेज्यया सुतैः
महायज्ञैश्च यज्ञैश्चब्राह्मीयं क्रियते तनुः
( वेदाध्ययन, यमनियमादि व्रते, होम, पुत्रसंतती , पंचमहायज्ञ ,श्रौत व स्मार्त यज्ञ, या सर्वांनी हे शरीर मोक्ष मिळविण्यास योग्य होते. )
मनुस्मृतिः २ - २८
ज्या पौर्णिमेस श्रवण नक्षत्र चंद्रासमीप असते , ती ‘ श्रावणी ’ पौर्णिमा ; व त्या पौर्णिमेस करावयाचे (वर्षा ऋतुतील म्हणून ) वार्षिक धर्मकृत्य ‘ श्रावणी ’ म्हणून प्रसिद्ध आहे . हीच श्रावणी नागपंचमी ला सुद्धा करण्याचा शास्त्रसंमत प्रघात आहे. याचे पारिभाषिक नाव ‘ उपाकर्म ’ असे आहे व याचा अर्थ संस्कारपूर्वक वेदाच्या अध्ययनास सुरवात करणे असा आहे . हा विधी श्रावणी पौर्णिमेशिवाय पंचमी (नागपंचमी ) तसेच हस्त नक्षत्रावरही करतात . सहा महिने असे अध्ययन केल्यावर माघी पौर्णिमेस ‘उत्सर्जन’ म्हणजे वेदाध्ययन बंद ठेउन उपग्रंथ व शास्त्रांचे अध्ययन करायचे असते . सध्या हे दोनही विधी एकाच दिवशी म्हणजे श्रावणीसच करण्याची पद्धत आहे .
सांप्रत ब्राह्मणवर्गाचे व विशेषतः तरूणवर्गाचे वेदाध्ययनाकडे दुर्लक्ष झाल्याने ब्रह्मतेजाची उणीव त्यामुळे नेतृत्वहीन समाज व परिणामी परकीयांची गुलामगिरी अशा विचित्र अवस्थेत बहुतांश ब्राह्मणवर्ग आहे .स्नानसंध्यादि नित्यकर्म , श्रावणी श्राद्धादि नैमित्तिक कर्मे हि जरी एखाद्या ब्राह्मणाने केली नाहित तरीहि समाजात त्याला ब्राह्मण म्हणूनच ओळखतात ; याउलट हे ब्रह्मकर्म करीत नाही म्हणून त्यास ब्राह्मणेतरांच्या सवलती , सरकारी मान मिळतो असेही कोठे दिसत नाही . अशांना ‘नावापुरता ब्राह्मण’ अशी थट्टा मात्र सहन करावी लागते . मग शास्त्रात सांगितलेले धर्मकृत्य करण्यास लाज का वाटावी ? ‘ जाणिजे यज्ञकर्म ’ म्हणत रोज दोन वेळा भोजन करायचे पण हा यज्ञ यज्ञोपवीताशिवाय केल्यास त्याचे फ़ळ कसे मिळणार ?
कुसंगती, खाण्यापिण्यावर बंधने नसणे, अपेयपान, अभक्ष्यभक्षण, परधर्मियांचेविषयी आकर्षण, स्वधर्माचा अभिमान नसणे या आणि अशा अनेक गोष्टिंमुळे तरुण ब्राह्मणवर्ग बहुतांश निस्तेज झाला आहे . कलिमहिमा , कालाय तस्मै नमः, मौनम् सर्वार्थ साधनम् या वचनांचा नकारात्मक (चुकीचा) अर्थ लावून जप करीत राहिल्यास आणखी काय होणार ? पण वेदपुरुषाच्या कृपेनी या स्थितीस सकारात्मक गति दिसू लागली आहे . कुठलीहि वाईटात वाईट परिस्थितीहि बदलू शकते पण यास निमित्त मात्र आपणच झाले पाहिजे. लक्षात ठेवा, ज्या धर्मात धार्मिक, आर्थिक व सामाजिक कार्यात तरूण वर्गाचा सहभाग जास्त असतो, त्या धर्माकडे वाईट नजरेनी बघण्याची कोणाचीहि हिंमत होत नाही.
म्हणूनच ब्राह्मण उपनीत ( ज्यांची मुंज झाली आहे) अशा तरूणांना मनापासून आवाहन करीत आहोत कि ‘श्रावणी’च्या निमित्ताने प्रारंभ करण्याची जी सुवर्णसंधी मिळत आहे त्याचा जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा. आपले प्राचीनतम वाड् मय ऋग्वेद,यजुर्वेद,सामवेद व अथर्ववेद यांच्या शाखासूत्रानुसार श्रावणीच्या प्रयोगात थोडीफ़ार भिन्नता असते. आश्वलायनांच्या (ऋग्वेदियांच्या) श्रावणीत ऋक्संहितेतील प्रत्येक मंडलाच्या आद्य व अंत्य मंत्राने आहुती देतात , दही व सातू भक्षण करतात,नवे जानवे मंत्रवून घालतात, वेदाध्ययनाची उजळणी करतात, देव-ऋषी व पितरांकरिता तर्पण करतात व कृतज्ञता व्यक्त करतात. हा विधी बहुतेक नदीजवळ किंवा जलाशयाजवळ करतात. कारण यात समंत्रक स्नान, भस्मस्नान, मृत्तिकास्नान, गोमयस्नान अशी स्नाने असतात.
दाक्षिणात्य बहुतेक मंदिरातून तसेच उत्तरेकडिल लोकांच्या मंदिरातूनही ह्या श्रावणीविषयी जागरूकता दिसून येते, पण महाराष्ट्रीय ब्राह्मणांमध्ये मात्र उदासीनताच अनुभवास येते. दाक्षिणात्य मंदिरात तर छोटेछोटे बटू , युवक , गृहस्थ व वृद्ध हे सुद्धा आवर्जून श्रावणीस येतात. ब्राह्मण्य टिकविण्यासाठी ज्यांनी ऐहिक सुखांचा त्याग केला असे लोक सांप्रत मिळणे फ़ारच कठीण पण वर्षातून दोन दिवसही ( हल्ली एकच ) देता येउ न शकणे हि अशा ब्राह्मणांची शोकांतिकाच म्हटली पाहिजे.
छोटीछोटी जैन मुले त्यांच्या वडिलांबरोबर हौशीने धोतर-उपरणे नेसून जातात.(शिवलेले नाही) मुसलमान मुलेहि नमाजाचे वेळि पारंपरिक टोपी घालून पारंपरिक वेशातच येतात. बहुतेक सर्वच धर्म व पंथातील लोक धार्मिक प्रार्थनांना ठरलेल्या वारी व ठरलेल्या वेळि जबाबदारीने उपस्थित राहतात, पण हिंदूंमध्ये त्यातही विशेषतः ब्राह्मणांतच हा न्यूनगंड प्रकर्षाने आढळतो.धोतर नेसायचे म्हटले की नकोनको चालू होते. सांप्रत कित्येक परधर्मिय पाश्चात्य संस्कृतभाषा शिकतात, उपनिषदे अभ्यासतात पण ते आपली वेशभूषा , केशभूषा, खाणे-पिणे हिंदूंसारखे करीत नाहित (मोजके काहिजण अपवाद असतीलहि); पण आपले युवक-युवती मात्र जरा परदेशवारी करून आले कि सात जन्म परदेशातच घालविलेल्या ख्रिश्चनाप्रमाणेच वागूबोलू लागतात. मुद्दा असा कि आपल्या श्रेष्ठ सनातन वैदिक परंपरेत सागितलेल्या अशा श्रावणीचा योग यावर्षी ज्यांना साधायचा असेल व आत्मकल्याणाकडे वाटचाल सुरु करायची असेल त्यांचेकरीता KvD तर्फे श्रावण महिन्यात १५ ऑगस्ट २०१९ रोजी नारळी पौर्णिमेच्या योगावर श्रावण नक्षत्रावर श्रावणी आयोजित केली आहे. ऋग्वेदी, शुक्ल व कृष्ण यजुर्वेदी या सर्वांसाठी वेगवेगळी व्यवस्था आहे.
पुण्यामध्ये श्रावणीचे स्थान नारद मंदिरात आहे ,श्रावणी साठी प्रत्येकी साधारण २५० रुपयांच्या दरम्यान खर्च येतो . वेळ तसेच येताना स्वतःबरोबर कायकाय साहित्य आणावयाचे, ते संपर्कप्रमुख गुरुजी सांगतीलच. डोंबिवली , बोरीवली , दादर ही मुंबईतील तसेच महाराष्ट्रातील इतर सर्व शहरात वेगवेगळ्या वेळेस श्रावणी आयोजित केलेली आहे , त्या त्या शहरात ज्या ज्या ब्राह्मण बंधूंना जायची इच्छा असेल त्या सर्वांनी खालील लिंक वर
http://tiny.cc/uva98y
दिलेल्या फॉर्म मध्ये आपली माहिती इंग्रजी अथवा मराठी मध्ये व्यवस्थित भरावी. आम्ही त्यासंदर्भात तुम्हाला संपर्क करूच. एकदा अशा विधींमध्ये सहभागी होऊन त्यातील आनंद घ्या म्हणजे पुढल्या वेळि नक्की यालच.
सर्व भगिनींनी आपल्या घरातील, मुलगा, पती, बंधू यांना श्रावणीस जाण्यास उद्युक्त करावे. घरातील स्त्री चे म्हणणे व संस्कार चिरकाल टिकतात त्यामुळे भगिनींनी आग्रही भूमिका घेणे आवश्यक वाटते.
ब्राह्मणांनी संघटित होणे ही काळाची गरज आहे हे ओळखून , 'कोकणस्थ’, ‘कहाडे’, ‘देशस्थ’, ‘देवरुखे’ अशांनी वेगवेगळ्या श्रावणीचा अट्टाहास न धरता एकत्र येउन अशा माध्यमातून समाजसंघटन करावे.आपल्याबरोबर जमल्यास आणखी एकास सुद्धा आणावे म्हणजे एकटे वाटणार नाही.
आपले जे जे क्षत्रिय , सोनार , दैवद्न्य , वाणी आणि शुद्र कुळातील ज्यांचे उपनयन झाले आहे अश्या मित्रांना श्रावणी ला जानवे बदलून घ्यायची व मंत्रून घ्यायची इच्छा असेल त्यांनीही संपर्क करावा . योग्य संख्या जमल्यास त्यांचीही श्रावणी या बरोबरच आयोजित करण्याचा प्रयत्न राहील .