अष्टक श्रीरेणुकेचे
लक्षकोटी चंडकीर्ण सुप्रचंड विलपती ।
अंब चंद्रवदनबिंब दिप्तमाझी लोपती ।
सिंह शिखर अचळवासी मूळपीठनायका ।
धर्म-अर्थ-काम-मोक्ष कल्पवृक्षरेणुका ॥ १ ॥
आकर्ण अरुणवर्ण नेत्र, श्रवणि दिव्य कुंडले ।
डोलताति पुष्पहार भार फार दाटले ।
अष्टदंडि, बाजुबंदि, कंकणादि, मुद्रिका, ।
धर्म-अर्थ-काम-मोक्ष कल्पवृक्षरेणुका ॥ २ ॥
इंद्रनीळ,पद्मराज, पाचू हार वेगळा ।
पायघोळ बोरमाळ, चंद्रहार वेगळ।
पैंजणादि भूषणेंचि लोपल्याति पादुका ।
धर्म-अर्थ-काम-मोक्ष कल्पवृक्षरेणुका ॥ ३ ॥
इंद्र, चंद्र, विष्णु, ब्रह्म, नारदादि वंदिती ।
आदि अंत-ठावहीन आदि शक्ति भगवती ।
प्रचंड चंड मुंड खंड विखंडकारि अंबिका ।
धर्म-अर्थ-काम-मोक्ष कल्पवृक्षरेणुका ॥ ४ ॥
पर्वताग्रहवासि पक्षी 'अंब अंब ' बोलती ।
विशाल शालवृक्ष रानिं भवानि ध्यानि डोलती ।
अवतार-कृत्यसार जड-मुढादि तारका ।
धर्म-अर्थ-काम-मोक्ष कल्पवृक्षरेणुका ॥ ५ ॥
अनंत ब्रह्मांड कोटिं, पूर्वमुखा बैसली ।
अनंत गुण, अनंत शक्ति, विश्वजननी भासली ।
सव्यभागी दत्त, अत्रि, वामभागिं कालिका ।
धर्म-अर्थ-काम-मोक्ष कल्पवृक्षरेणुका ॥ ६ ॥
पवित्र मातृ-क्षेत्र-धन्य वासपुण्य आश्रमी ।
अंब दर्शनासि भक्त-अभक्त येतीं आश्रमी ।
म्हणुनि विष्णुदास नीज लाभ पावला फुका ।
धर्म-अर्थ-काम-मोक्ष कल्पवृक्षरेणुका ॥ ७
आपल्या सनातन वैदिक धर्मामध्ये हजारो वर्षांपासून देव-देवता, ऋषी- मुनी यांनी लोक कल्याणार्थ बरीच स्तोत्र, मंत्र, श्लोक, वेद-पुराणे, आरत्या, विविध व्रत वैकल्ये, पूजा- विधी इत्यादी लिहून ठेवले आहेत. असे नित्योपयोगी लेखन आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. त्याचा आपल्या आराध्य देवते प्रमाणे नित्यपाठ केल्यास आपल्यास इच्छित फलप्राप्ती होते.
Blog Views
अष्टक श्रीरेणुकेचे
श्री स्वामी समर्थ आरती
जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!! छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...
Popular Blogs
-
।। तुळशीच्या लग्नाची मंगलाष्टके ।। स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं , मोरेश्वरं सिद्धिदं । बल्लाळो मुरुडं विनायकमहं , चिन्तामणि स्थेव...
-
आरती नित्यानंदची श्री सचिदानंद सदगुरू साईनाथ महाराज की जय जय जय आरती नित्यानंद राया। सगुणारूपी गोबिंदा।। प्रथमा दत्तघेसी। द्...
-
खंडोबाचे नवरात्र नमोमल्लारि देवाय भक्तानां प्रेमदायिने I म्हाळसापतिं नमस्तुभ्यं मैरालाय नमोनमः II मल्लारिं जगतान्नाथं त्रिपुरा...