आरती श्री स्वामी समर्थांची (चाल : आरती ज्ञानराजा)
आरती स्वामिराजा । कोटी आदित्य तेजा।
तूं गुरू, मायबाप । प्रभो आजानुभुजा ध्रु.॥
पूर्ण ब्रह्म नारायण । देव स्वामी समर्थ ।
कलीयुगी
अक्कलकोरटीं । आले वैकुंठनाथ ॥१॥
लीलया उद्धरीले। भोळे भाबडे जन ।
बहु तीव्र साधकांसी
। केले आपुल्यासमान ॥२॥
अखंड प्रेम राहो । नामी ध्यानी दयाळा । '
सत्यदेव सरस्वती' म्हणे आम्हा साभाळा ।।
आरती स्वामिराजा ॥३॥