Blog Views

स्वामी प्रार्थना



गुलाब पुष्यासम गौरकांती। आजानुबाहू अशी दिव्य मूर्ती।॥ 

कृपापूर्ण ती नेत्र दीप्ती सत्य। नसे मानवी देह हा स्वामिराज॥१॥

 

प्रत्यक्ष नृसिंह सरस्वती चे। जे रुप श्रीपाद श्रीवल्लभांचे॥ 

अवधूत मूर्ती अवतार झाला। नमो सद्गुरू दत्त स्वामी पदाला।।२॥

 

जयाच्या पुढे काही नम्र आहे। अशा स्वामीच्या मी पदी बाळ आहे॥ 

समर्था तुझे पोर ना दीन व्हावे। चरणी तुझ्या ते सदा लीन व्हावे॥३॥

 

अनन्य भावे घडे स्वामी भक्ति। करिती तया संतही साहा प्रीती। 

ग्रहांची नसे त्या प्रतिकूल भीती। कुलदेवता ही अनुकूल होती।॥४॥

 

पदी भक्त आले कृपापात्र झाले। बहु सिद्ध केले किती उद्धरिले। 

असामान्य तुमची असे किर्तीगाथा॥ म्हणोनिच हा ठेविला पाया माथा ।।५।।

 

नसे पात्र मी स्वामी तुमच्या कृपेसी। नको सोडु माले तरी या मुलासी॥ 

मला संपदा ही तुझे पाय दोन्ही। तुझ्याविण माझे जगी नाही कोणी ॥६॥

 

फळाली कृपा संत देवादिकांची। मिळाली मला जोड स्वामी पदांची॥ 

हृदयी ठेव जीवा घरी धट्ट पाया। तयासारखी न करी कोण माया॥७॥

 

मातेची माया पित्याचीच छाया। दया मूर्तीच्या या नको सोडू पाया। 

मना भार ठेवी अरे याच ठाया। मिळेना कुठेही अशी स्वामी माया॥८॥

 

सदा स्वामी सिद्ध ऐसे करावे। तुम्ही साह्यकारी नहीं है उसने ।। 

जाज्वल्य तुमचा अभिमान राहो। भयाचा मला लेश ना स्पर्श होवो ॥९॥

 

समर्थ जाणोनि आलो मी पाया। तुम्हीच माझे सर्वस्व व्हाया। 

कृपेचे जरी अल्प देशी निधान । जीवासारखे भी तयासी जपेन।।१०॥

 

पदी हट्ट ऐसा धरिला असे मी। ध्यानी दिसावे मला याच जन्मी॥ 

मी स्वामिचा स्वामी सर्वस्व माझे। असे प्रेम वाढो गुरुमाय तुझे ॥११॥

 

मला स्वामिराजा तुमचीच छाया। तुम्हाविण देवा करी कोण माया। 

स्वामी समर्थ गर्जूनि गावो। या जीवनाचा महायज्ञ होवो॥१२॥

 

आधार नाही तुम्हावीण कोणी। नसे अन्नदाता तुम्हावीण कोणी।। 

माता पिता सद्गुरु एक स्वामी। जवळी मला घ्या करी प्रार्थना मी॥१३॥

 

स्वामी करावे इतके करावे। हाती धरावे मला त्यजावे।।

होईन मी पात्र तुमच्या कृपेने। अशातळमळीवीण मी काही नेणे।।१४॥

 

प्रभो मी न माझा तुमचाची होवो। त्वविच्छे प्रमाणे हरी वृत्ति राहो। 

असे हो कृपाळा तुम्हा वाहिलो मी। चरणारविंद अर्पणमस्तु स्वामी ॥१५॥


इति ॥

 

 

 


श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs