कोणत्या देवाच्या मंत्राचा जप केल्यावर काय प्राप्त होते...
सूर्यमंत्र -
ऊँ सूर्याय नमः | या मंत्राचा जप
केल्याने आरोग्य, दीर्घायुष्य, बाल व
तेजाची प्राप्ती होते. या मंत्राने शरीर व डोळ्यांचे सर्व रोग दूर होतात. याच्या
जपामुळे शत्रू कोणतीही हानी करू शकत नाही.
सरस्वती मंत्र -
ऊँ श्री सरस्वत्यै नमः | या मंत्राचा जप केल्याने ज्ञान व प्रखर बुद्धी प्राप्त होते.
लक्ष्मीमंत्र -
ऊँ श्री महालक्ष्म्यै नमः| या मंत्राच्या जपाने धनसंपत्ती लाभते आणि दारिद्र्याचे निवारण होते.
श्री हनुमानमंत्र -
ऊँ श्री हनुमते नमः | या मंत्राच्या जपाने बल व यशप्राप्ती होते.
गणेशमंत्र -
(१) ऊँ श्री गणेशाय नमः | (२) ऊँ
श्री महागणपतये नमः | (३) ऊँ गं गणपतये नमः | या मंत्राचा जप केल्याने कोणत्याही कार्याच्या संपादनातील बाधेचे निवारण
होते.
मोक्षमंत्र -
(१) ऊँ (२) ऊँ सोहम (३) शिवोहम (४) अहं ब्रह्मास्मि |
हे मोक्षमंत्र आहेत. हे आत्मसाक्षात्कारात मदत करतात.
सुब्रह्मण्य मंत्र -
ऊँ श्री शरणभवाय नमः| या मंत्राचा जप केल्याने कार्यामध्ये यश मिळते. हा मंत्र
प्रेतात्म्यांच्या कुप्रभावालाही दूर करतो.
सगुण मंत्र -
-(१) ऊँ श्री रामाय नमः | (२) ऊँ
नमो भगवते वासुदेवाय | (३) ऊँ नमः शिवाय | हे सगुण मंत्र आहेत.जे प्रथम सगुण साक्षात्कार प्रदान करतात आणि शेवटी
निर्गुण साक्षात्कार.