शनिदेवाची वैशिष्ट्ये
अ. परिवार
अ १. आई आणि वडील
: सूर्यदेव आणि छायादेवी.
अ २. कुटुंबीय :
तापी आणि यमुना या दोन बहिणी अन् यमदेव हा मोठा भाऊ.
आ. स्थान
आ १. जन्मस्थान :
भारतातील सौराष्ट्रात वैशाख अमावास्येला मध्यान्ही शनैश्चराचा जन्म झाला; म्हणून या दिवशी शनैश्चर जयंती साजरी करतात.
आ २.
कार्यस्थान/कार्यक्षेत्र : महाराष्ट्रातील शनिशिंगणापूर येथे शनीची काळी मोठी शिळा
असून तेथे शनिदेवाची शक्ती कार्यरत आहे. त्यामुळे शनिशिंगणापूर हे शनीचे
कार्यक्षेत्र आहे. शनैश्चर जयंतीला शनिशिंगणापूर येथे जत्रा भरते आणि शनिदेवाचा
उत्सव साजरा होतो.
इ. शनिदेवाची अन्य
नावे
सूर्यसूत, बभ्रुरूप, कृष्ण, रौद्रदेह,
अंतक (हे यमाचे नाव आहे), यमसंज्ञ, सौर्य, मंदसंज्ञ, शनैश्चर,
बिभीषण, छायासूत, निभ:श्रुती,
संवर्तक, ग्रहराज, रविनंदन,
मंदगती, नीलस्य, कोटराक्ष,
सूर्यपुत्र, आदित्यनंदन, नक्षत्रगणनायक, नीलांजन, कृतान्तो,
धनप्रदाता, क्रूरकर्मविधाता, सर्वकर्मावरोधक, कामरूप, महाकाय,
महाबल, कालात्मा, छायामार्तंड
इत्यादी शनीची नावे प्रचलित आहेत.
ई. शनिलोक
ग्रहमालिकेत शनिग्रह
सूर्यापासून पुष्कळ अंतर दूर आहे. त्याप्रमाणे सूक्ष्मातील शनिलोकही
सूर्यलोकापासून पुष्कळ दूर आहे. शनिलोकात सूर्यकिरणांचा अभाव असल्यामुळे तेथे
पुष्कळ अंधार असतो. शनीचा अपमान करणार्या पापी लोकांना शनिलोकात नेऊन तेथे शनिदेव
दंडित करतो.
उ. संबंधित लिंग
शनी नपुंसक आहे.
ऊ. संबंधित रंग –
काळा किंवा गडद निळा
तमप्रधान कर्माचा लय
करण्यासाठी जिवांना कठोरपणे दंडित करण्यासाठी शनिदेवाने उग्र रूप घेतले. त्याचे
द्योतक काळा किंवा गडद निळा हा रंग आहे.
ए. संबंधित वस्त्राचा
रंग – काळा
काळ्या रंगातून शनितत्त्व
कार्यरत होते. नवग्रहमंडलातील संबंधित देवतांसाठी वापरलेले तांदूळ आणि वस्त्र
यांचा रंग त्या त्या देवतांच्या रंगाशी (वर्णाशी) संबंधित आहे; म्हणून धार्मिक विधीच्या ठिकाणी नवग्रहमंडलाची स्थापना करतांना त्या त्या
रंगाची वस्त्रे, अक्षता, पुष्प इत्यादी
वापरली जातात.
ऐ. चातुर्वर्णातील
वर्ण
शनिदेवाचा वर्ण अंत्यज, म्हणजे लयकारी आहे. त्याच्याकडून पुष्कळ प्रमाणात मारक शक्तीचे प्रक्षेपण
होते. त्यामुळे त्याचे स्वरूप उग्र जाणवते.
ओ. संबंधित तत्त्व
शनीचा संबंध वायूतत्त्वाशी
आहे.
औ. संबंधित गुण
शनीचा जन्म सूर्याच्या
लयकारी शक्तीपासून झाल्यामुळे त्याच्यामध्ये तमोगुण प्रबळ आहे.
अं. संबंधित रस
शनीला तुरट चव किंवा रस
प्रिय आहे.
क. प्रिय पुष्प
शनीला शनितत्त्व आकृष्ट
करणारे जांभळ्या किंवा गडद निळ्या रंगाची पुष्पे प्रिय आहेत.
ख. संबंधित धातु
शनीचा संबंध लोह या धातूशी
आहे. शनीला प्रसन्न करण्यासाठी काही ठिकाणी शनीच्या लोहप्रतिमांची स्थापना केली
जाते आणि शनीला लोह अर्पण केले जाते.
ग. संबंधित कालबल
शनीची शक्ती रात्रीच्या
वेळी अधिक प्रमाणात कार्यरत असते.
घ. संबंधित कालांश
शनीचा कार्यकाळ वर्षाशी
संबंधित आहे.
च. संबंधित तिथी
आणि वार
शनिदेवाला त्रयोदशी तिथी
प्रिय आहे. सप्ताहातील शनिवार शनीशी संबंधित आहे.
छ. संबंधित दिशा
शनीचा संबंध पश्चिम
दिशेशी आहे.
ज. संबंधित देवता
ज १. अधिपति :
ब्रह्मदेव शनीचा अधिपति आहे.
ज २. अधिदेवता
(डाव्या बाजूची देवता) यम : यम कर्मप्रधान देवता म्हणून कार्यरत असतांना पापी
लोकांना दंडित करण्यासाठी तो शनीला प्रेरणा देतो.
ज ३.
प्रत्यधिदेवता (उजव्या बाजूची देवता) प्रजापति : शनीची उग्रता न्यून करून त्याला
शांत करण्यासाठी प्रजापतीची तारक शक्ती कार्यरत असते.
झ. संबंधित
शस्त्रे
धनुष्य, बाण आणि शूल (सूळ) ही शस्त्रे शनीशी संबंधित आहेत. वक्रमार्गाने चालणार्यांवर
लक्ष ठेवून शनीने शरसंधान केल्याचे द्योतक धनुष्याकृती आहे. पूजनाच्या ठिकाणी
चौरंगावर नवग्रहमंडलदेवतांची स्थापना करतांना काळ्या रंगाच्या अक्षतांनी
शनिमंडलाचे प्रतीक असणारी धनुष्याकृती चौरंगाच्या पश्चिम दिशेला सिद्ध केली जाते.
ट. मनुष्याचा
देहाशी संबंधित
शनीचा संबंध मनुष्याच्या
देहातील स्नायूंशी आहे.
ठ. शुभाशुभ फळ
शनीचा कोप झाला, तर मनुष्याला अशुभ फळाची प्राप्ती होते; परंतु शनीची
मनुष्यावर कृपा झाली, तर त्याला पुत्रवान, धनवान आणि श्रीमान होण्याचे भाग्य लाभते.
ड. रत्न
शनीशी संबंधित रत्न नील
आहे.
ढ. अक्षरे,
देवता आणि फल
अक्षरांचे अ, क, च, ट, त, प, य आणि श या आठ वर्गांत विभाजन
केले आहे. प्रत्येक वर्गाची विशिष्ट देवता आहे. विशिष्ट वर्गाच्या पद्यरचनेची
विशिष्ट फलप्राप्ती होते. शनैश्चराचा संबंध प या वर्गाशी असून त्याची फलप्राप्ती
मंदत्व आहे. याचा अर्थ दुष्कर्म करण्याची गती मंदावते.
ण. हविष्य द्रव्य
नवग्रह यज्ञामध्ये शनीला
दूर्वा किंवा शमी यांची आहुती दिली जाते. दूर्वा किंवा शमी यांमध्ये कार्यरत
असणार्या गणेशतत्त्वाची शक्ती शनीला सृजनशील कार्य करण्यासाठी प्रेरक असते.
शनिदेवाला दूर्वा किंवा शमी यांची आहुती दिल्यामुळे उपासकाचे पापक्षालन होऊन
त्याला उत्तम आरोग्याची प्राप्ती होते.
त. जपसंख्या
शनीची जपसंख्या तेवीस
सहस्र आहे.
थ. शनीशी संबंधित
स्तोत्रे
१. शनिस्तोत्र
२. शनैश्चरकवचस्तोत्र
३. शनिमहात्म्य
साभार.....
– कु. मधुरा भोसले