शुभंकरोती कल्याणम आरोग्यम
धनसंपदा | शत्रूबुद्धि विनाशय दिपज्योती नामोस्तुते |
दिव्या दिव्या दिपत्कार | कानी कुंडल मोती हार | दिव्याला पाहून नमस्कार |
दिवा लावला देवा पाशी | उजेड पडला तुळशीपाशी |
माझा नमस्कार सर्व देवांपाशी |
तिळाचे तेल कापसाची वात | दिवा जळू दे सारी रात | घरातली पीडा बाहेर जाऊदे |
बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे | घरच्या धन्याला
उदंड आयुष्य मिळू दे |
दीप_प्रार्थना------
दीप सूर्याग्नि रूपस्त्वं
तेजसां तेज उत्तमम् | गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव ||
अर्थ-- हे दीपा,तू सूर्यरुप व अग्निरूप आहेस. तेजामध्ये तू उत्तर म तेज आहेस. माझ्या
पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.)