पैल आले हरि । शंख चक्र शोभे करीं ॥१॥
गरुड येतो फडत्कारे । नाभी नाभी म्हणे त्वरे ॥२॥
मुगुट कुंडलांच्या दीप्ति । तेजे लोपला गभस्ति ॥३॥
मेघश्याम वर्ण हरि । मूर्ति डोळस साजिरी ॥४॥
चतुर्भुज वैजयंती । गळा माळ हे रुळती ॥५॥
पीतांबर- झळके कैसा । उजळल्या दाही दिशा ॥६॥