Blog Views

श्रीशनिमाहात्म्य

श्रीशनिमाहात्म्य

 

श्रीगणेशाय नमः । ॐ नमो जी गणनायका । एकदंता बरदायका । स्वरूपसुंदरा विनायका । करीं कृपा मजवरी ॥ १ ॥ आता नमू ब्रह्मकुमारी । हंसारूढ वागीश्वरी । बिना शोभे दक्षिण करीं । विजय मूर्ति सर्वदा ॥ २ ॥ नमन माझें गुरुवर्या । सुखमूर्ति करुणालया । नमूं संतश्रोतयांच्या पायां । अभेदभेदा करूनी ॥ ३ ॥ आतां नमूं श्रीपांडुरंगा । यावें तुका कथेचिया प्रसंगा । निरसूनि माझिया भवसंगा । करी कृपा मजवरी ॥ ४ । गुजरात भाषेची कथा । नवग्रहांची तत्त्वतां । ही ऐकतां एकचित्ता | संकट व्यथा न बाधती ॥ ५ ॥ आतां उज्जयिनीनाम नगरी । राजा विक्रम राज्य करी । तेथील चरित्राची परी । ऐका चित्त देऊनियां ॥ ६ ॥ कोणी एके दिवशी प्रातःकाळी । बैसली होती सभामंडळी । तेथें महापंडित त्या काळी । लहानथोर बैसले ।। ७ ।। ऐसी सभा बैसली घनदाट । तेथें चर्चा निघाली सुभट | म्हणती नवग्रहांत कोण श्रेष्ठ । सांगावे नीट निवडोनी ।। ८ ॥ कोण्या ग्रहाची कैसी स्थिती । कैसी पूजा कैसी मती | कोण रूप कैसी गती । ऐसें यथार्थ सांगावें ॥ ९ ॥ ऐसें ऐकतांचि उत्तर । पंडित सरसावले समोर । काढोनि पुस्तकांचा संभार । बोलती ते यथामती में ॥ १० ॥ प्रथम एक पंडित बोलिला । रविग्रह तो असे भला | जो लागे त्याच्या उपासनेला । त्यासी ग्रहपीडा न बाधे ।। ११ ॥ रवि तो सूर्यनारायण । जे नर झाले तत्परायण । त्यांचं विघ्ने होतीं निरसन | महासामर्थ्य रवीचें ॥ १२ ॥ आधि व्याधि दरिद्र । स्मरणमात्रेंचि होती दूर | मग उपासना करी जो नर । चिंतिले अर्थ सर्व पुरती ॥ १३ ॥ रवि तो मुख्य दैवत । त्यावीण सर्वही जाणा व्यर्थ । नवग्रह आज्ञा पाळीत । ऐसा श्रेष्ठ ग्रह हा ।। १४ ।। ऐकतां रवीची वार्ता । आणि त्या इतर ग्रहांची कथा । तेणें निवारे सर्व व्यथा । ऐसे नवग्रह समर्थ ॥ १५ ॥ परी रवि असे महाबळी सर्वांमारजी अतुर्बळी प्रत्यक्ष दिसतो नेत्रकमळी । तो हा सूर्यनारायण ॥ १६ ॥ तंव दुसरा पंडित बोलत । सोमासी असे बळ अद्भुत तो माळी असें म्हणवीत | वनस्पती पोषीतसे I १७ ॥ जयाचें आराध्य दैवत । शिव सांब कैलासनाथ | त्याच्या भाळी हा विलसत । म्हणोनि श्रेष्ठ जाणावा ।। १८ ।। चंद्र बर्षे अमृतास । तृप्त करी सर्व देवांस । निशिराज महारूपस । षोडश कळा जयासी ॥ १९ ॥ तो न गांजीच कोणासी । अति सौख्यदाता सर्वांसी । सदासर्वदा निर्मळ मानसीं | धन्य जयाचें पूजन ।॥ २० ॥ मग तिसरा पंडित बोलत । ऐक राया सुनिश्चित । मंगळ तो महासमर्थ । कथा ऐक तयाची ॥ २१ ॥ मंगळग्रह हा महाक्रूर। जैसी कां ते खड्गाची धार । तयाचा न कळे पार । सर्व ग्रामर जि वरिष्ठ हा ॥ २२ ।। मंगळ ग्रह सोनार । क्रूरता जयाची अति थोर । परि तो पूजकांसी कृपाकर मंगल करी सर्वदा ।। २३ । गर्व धरूनि पूजा न करिती । मग तो खबळे उग्रमूर्ती । बिलया जाय संतती संपत्ती । शेवटी नाश करी जीवित्वाचा ॥ २४ ॥ तोचि पूजकांसी सदा प्रसन्न | सर्व अर्थ करी पावन | सर्व दुःख निरसून । अंतर्बाह्य संरक्षी ॥ २५ ॥ तंव बोले चौथा पंडित । बुध असे महाबळवंत । बुधाचा प्रताप अद्भुत । सर्व ग्रहों माजी ॥ २६ ॥ बुध जातीचा असे वाणी । नवग्रहांत शिरोमणी । विघ्ने नासती तयाच्या पूजनीं । सर्वानंद प्राप्त करी ॥ २७ ॥ बुध ज्यावरी कृपा करी। लक्ष्मीकांत त्यासी करी । ऐसा तों महापरोपकारी | बुध ग्रह जाणिजे ॥ २८ ॥ बुधग्रह आहे ज्यास नीट । त्यासी सर्व मार्ग सुचती सुभट । कोणत्या कार्यासही तूट | तो न करी कल्पांतीं ॥ २९ ॥ बुधाची बुद्धि भारी | कोणासी निष्ठुरता तो न करी । संसारचिंता हरी । प्राणिमात्राची सर्वथा ।। ३० ॥ मग बोले पांचवा पंडित । गुरूचे सामर्थ्य असे अद्भुत । गुरु लो श्रेष्ठ सर्वात । इंद्रादिदेवां समस्तां ॥ ३१ । गुरूज्ञानाचा न कळे पार । भाविकांसीं तो करुणाकर । कर्माकर्मांचा करी चूर । भवभयव्यथेसीं ॥ ३२ ॥ दुःख आणि दारिद्र्य, रोग । स्मरण मात्रे होती भंग । नवग्रहांत महायोग्य । ऐसा गुरु जाणिजे ॥ ३३ ॥ गुरु जातीचा असे ब्राह्मण । सर्वांत श्रेष्ठ असे वर्ण | सर्व देव करिती मान्य । गुरुवचनासी ॥ ३४ ॥ गुरु असे ज्ञानाचा पुरा । तयाच्या साम्यासी नसे दुसरा । त्यापुढे नुरेचि थारा | कल्पनेचा कदाही ॥ ३५ ॥ म्हणोनि करितां गुरुसेवा | मग ग्रहांचा कोण केवा गुरु सर्वभावें भजावा । तेणें संतोष सर्व ग्रहांसी ॥ ३६ ॥ शिव करी गुरुपूजनासी । तेथें पाड काय इतरांसी । ऐसा श्रेष्ठ जो सर्वांसी | आगमागम ।। ३७ ॥ तंव सहावा पंडित बोलिला ।। शुक्र ग्रह असे बहु भला । जेणें राक्षसां उपकार केला । संजीवनी मंत्र करोनि ॥ ३८ ॥ शुक्र गुरु दैत्यांचा । त्रिभुवनीं धाक वाहती जयाचा । पार न करें सामर्थ्याचा । म्हणोनि श्रेष्ठ तो । ३९ ॥ शुक्राची शक्ति आहे फार | तो करी कर्माकर्मांचा चूर । विघ्ने पळती दूरच्या दूर शुक्राचें नाम घेतां ॥ ४० ॥ शुक्रपूजनीं जे तत्पर । त्यांच्या शौर्यासी नाहीं पारावार । जो दिव्यदेही निरंतर । एकाक्ष तो ॥ ४१ ॥ आधि, व्याधि दुःख दारिद्र्य । स्मरणमात्रेचि होती दूर । सर्वाभीष्ट परिकर । प्राप्त करी पूजकां ॥ ४२ ॥ नवग्रहांत शिरोमणी । ज्याचा महिमा वर्णिजे पुराणी मान्यता श्रेष्ठ सर्वांहूनी । शुक्राची असें जाण पां ।। ४३ ॥ ऐसे हे सहा ग्रह ऐकोनि राजा । तर्जनी मस्तक डोलवी वोजा । म्हणे उत्तम कथिलें काजा | अखंडित यांतें स्मरावें ।। ४४ ॥ आणिक ग्रह राहिले कोण । सांगा पंडित हो निवडून । कैसे त्यांची नामें खूण | त्या मूर्तीसी बोलिजे ॥ ४५ ।। मग संकेतें बोले पंडित । धातु आणि दुसरा केतु ॥ हे उभयतां अति अद्भुत । दैत्यकुळींचे असती ॥ ४६ ॥ मातंगजातीचे दोन्ही । दुष्ट क्रिया म्हणवोनी । त्यांच्या दर्शनें चंद्रसूर्य गग् । चळाचळां कांपती ॥ ४७ ॥ राहु पीडी चंद्रासी । केतु तो सूर्यासी ॥ ग्रहण बोलिजे तयासी । प्रत्यक्ष दृष्टीसी दिसतसे ॥ ४८ ॥ प्राणिमात्र सर्व जन । त्यांसी न सांडिती पीडेवीण | परी केलिया पूजन-स्मरण । किंचित् पीडा करिताती। ४९ ।। राहु महापीडक अनिवार माया । तद्रूपता केतु जाण राया । उभयतांची एक चर्या । पूजन-स्मरणें संतोषती ॥ ५० ॥ सर्व ग्रहांपरीस अति क्रूर | जनांसी पीडा करिती फार । म्हणोनि पूजन-स्मरण निरंतर । राहुकेतूंचे करावें ॥ ५१ ।। तंव नववा पंडित बोलत । शनिग्रह श्रेष्ठ अवघ्यांत । बलाढ्य होय अति अद्भुत । न कळे कळा तयाची ॥ ५२ ॥ तो ज्यावरी करी कृपा | त्यासी सर्व मार्ग असे सोपा | ग्रहदिक्पाळांवरी छापा । तया शनिग्रहाचा ॥ ५३ ॥ ज्यावरी तो कोपासी चढे । तयावरी नाना विघ्ने येती रोकडें । तयाचा संसार बिघडे । न राहे कल्पांतीं ॥ ५४ ॥ शनिदेव महाक्रोधी । ज्याचा पराजय नोहे युद्धीं । देवदानवां त्रिशुद्धी । दुःखदाता कां भाविक सज्ञान नर । जो या ग्रंथाचा करी आदर ।। पूजन स्मरण निरंतर । त्यावर कृपा करी शनिदेव ॥ ५६ ॥ शनैश्वराची मूर्ति काळी । तो जातीचा होय तेली । चरण पंगु सुरत चांगली । पूजा करी काळभैरवाची ॥ ५७ ॥ त्याची दृष्टि पड़े जबर । करी तयाचा चकनाचूर । अथवा कृपा करी जयावर । तयासी सर्व आनंद प्राप्त होय ।। ५८ ॥ दृष्टीचा ऐका चमत्कार । जन्मला जेव्हां शनैश्चर । तेव्हां दृष्टि पडली पित्यावर । तेणें कुष्ठ भरला सर्वांगीं ॥ ५९ ॥ पित्याच्या रथीं होता जो सारथी । तो पांगुळ झाला निश्चितीं । अश्वांचिया नेत्रांप्रती । अंधत्व आलें तत्क्षणीं ॥ ६० ॥ तेव्हां त्यांनीं उपाय केले फार | तरी गुण न येचि अणुमात्र | जंव दृष्टि फिरवी शनैश्चर । तंव तिघेही आरोग्य जाहले ॥ ६१ ॥ ऐसें ऐकतां राजा विक्रम ।। हांसूनि बोले सप्रेम | म्हणे पुत्र जन्मोनिया काय काम । ऐसा अपवित्र जो ॥ ६२ ॥ तो पुत्र नव्हे केवळ वैरी । जो उपजतांचि ऐसें करी । पुढें तो काय न करीं । सांगा पंडित हो ॥ ६३ ॥ ऐसें बोलिला हांसोन | करी टाळी वाजवी गर्जोन । सभेसी विनोदवचन । म्हणे हा पुत्र कैसा हो ॥ ६४ ॥ ऐसें बोलतां ते अवसरी कैसी वर्तनी नवलपरी । ती ऐकावी आतां चतुरीं । चित्त देऊनियां ॥ ६५ ॥ त्या समयीं शनिदेव विमानीं । जात होते बैसोनी । रायाचें वाक्य ऐकतां तत्क्षणीं विमान खाली उतरलें ॥ ६६ ॥ अकस्मात् येऊनियां सभेत । बैसले तेव्हां विमानासहित ॥ तंव पहाते झाले सभापंडित म्हणती आले शनिदेव ॥ ६ ७ ॥ मग राव उठे झडकरोनी । जाऊनि नमन करी चरणीं । तो तंबू टाकिला झिडकारोनी । शनिदेवाने ॥ ६८ ॥ म्हणे राजा ऐसा मस्त । टवाळी करिसी अद्भुत । याचा चमत्कार क्षणांत । दाबीन पाहें आतांचि ॥ ६९ ॥ तूं फार करितोसी टवाळी । नसतीच चढविली कळी । तरी कन्याराशीस मुळी | तुजला ग्रह मी आलों ॥ ७० ॥ आतां पाहें माझा चमत्कार । तूं नको करू गर्व फार । ऐसें बदोनी अति सत्वर बिमाना रूढ़ पैं झाला ।। ७१ ॥ तब तो रावण लागे चरणांसी । म्हणे कृपा करावी दीनासी । अन्याय घालीं पोटासी | कृपाळुवा शनिदेवा ।। ७२ ॥ तरी तो न मानीच शनिदेव । म्हणे मी तुज दाखवीन अनुभव तेव्हां मनी खिन्न जाहला राव | चिंता मानसीं फार करी ॥ ७३ ॥ मग म्हणतसे पंडितांला आम्हीं महाग्रह उगाचि छळिला ॥ तो आतां कष्टवील आम्हांला । तरी कैसें आतां करावें ॥ ७४ ।। जें जें पुढें होणार म्हणोनि बुद्धि सुचे तदनुसार ॥ तरी तें असेल लिखिताक्षर | तैसें आतां होईल ।। ७५ ॥ राव दिलगीर जाहला मानसीं । विसर्जन करी सभेसी । जाता जाहला मंदिरासी कांहीं अंतर सुचेना ॥ ७६ ॥ कहानियां संध्या स्नान । मग करीतसे भोजन | तदनंतर करिता झाला शयन | नावेक पलंगावरी ॥ ७७ ॥ ऐसें करिता एक मास | जाहला राया विक्रमास | मग काय वर्तलें त्या कथेस । तेंचि आतां ऐकिजे ॥ ७८ ॥ राया बिक्रम से आला शनी । बाबा अति स्थानी । जेणें त्रासिले बहुत प्राणी । अभाविकां क्रूर पीड़ित से ॥ ७९ ॥ तेव्हां पंडित बोलती वाचे । राया पूजन करी शनिग्रहाचें । साडेसात वर्षे नेमाचें । सामर्थ्य आहे जाणिजे ॥ ८॥ तुम्ही विनोद हांसला सीसी । तरी तो कष्टवील तुम्हांसी । जो का गांजितो त्रैलोक्यासी । तोचि हा महाग्रह जाणिजे ॥ ८१ ॥ चित्त कहानियां एकाग्र । अकाबा पूजेचा प्रकार । जेणेंकरोनि शनैश्चर । कृपा करील तुम्हांवरी ।। ८२ ॥ प्रथम करोनि औषधी दान । मग करावें प्रतिमेचे पूजन ॥ अश्वाचा नाल घेऊन | त्याची प्रतिमा करावी ॥ ८३ ॥ शास्त्र विधि पूजा कुंभावर । त्याची स्थापना करावी ॥ ८४ ॥ स्थापना झालिया निर्धार । मग तैलाभिषेक कर । मृत्तिकेच्या जाण | पूगीफल ब्राह्मणासी देऊन । तेवीस सहस्र जप संपूर्ण | यथासांग करावा ॥ ८५ | जपसंख्या जाहलियावरी । चतुर्थांश हवन कर । हवन झालियाउपरी । दान करावीं शनीची ॥ ८६ ।। मग जपकर्ता ब्राह्मणासी शनैश्चररूप मानूनि त्यासी । दक्षिणा देऊनि पूजा से प्रसन्नचि करावें ॥ ८७ ॥ मग करावें ब्राह्मण भोजन । यथाशक्ति द्यावें दान | ब्राह्मण तृप्त होतां पूर्ण संतोष पावे शनिदेव ॥ ८८ ॥ जेवी आरक्षण बाळकासी माता । तैसें रक्षी निजभक्तां । पंडित म्हणती राया समर्था । गोष्टी एवढी ऐकावी ॥ ८९ || राजा म्हणे पंडितांला, शनि न मानीच आम्हांला तोचि मातापिता वहिला । रक्षी तोचि पै जाणा । ९० ॥ मग बोले विक्रम पंडितांसी । तुम्ही जावें आपुल्या गृहासी । जें होणार असेल तें निश्चयेंसीं । घडून येईल न टळेचि ॥ ९१ ॥ ऐसें बोलोनियां उत्तर । काय जाहला चमत्कार | चित्त कहानियां स्थिर । श्रवण करावें सर्वाही ॥ ९२ ॥ असो मग कोणे एके दिवशीं । दोन प्रहरांच्या समयासी | कारवानवे उज्जयिनीसी । घोडे विकावया आले शनिदेव ॥ ९३ ॥ रूप पालटोनि आपुलें । वारु विकावयाआणिले । तंव तेथें गिर्हाईक पातले । रावही आला त्या स्थानीं ॥ ९४ ॥ तेव्हां किंमत पुसतसे रावो । तयासी म्हणे शनिदेवो | वारू फिरवूनि पाहा हो । मग कळेल मोल तयाचे ॥ ९५ ॥ तेव्हां सारंगा वारू राव आणवीत | चाबुकस्वारासी वरी बैसवीत । तेणें घोडा फिरविला चौगगनात । अति उत्तम फिरतसे ॥ ९६ ॥ तंव दुसरा घोडा अबलख । त्याचे मोल रुपये लक्ष एक । तो सोडूनि तात्काळिक । आणिला विक्रमापासीं ॥ ९७ ॥ व त्या सौदागारें काय केलें । राया विक्रमासीच बैसविलें । घोडा फिरवितां रब बोले । अति उत्त फिरतसे || ९८ ॥ तंव त्या घोड्यासी कोरडा मारितां । घोडा उडाला गजपंथा । पवनवेगें वारू जातां । महावनांत ते समयीं ॥ ९९ ॥ अधिक कोरडा मारितां । ते ते अधिक जाय पंथा । थोर अवस्था होय चित्ता । केवी वर्तले म्हणी ॥ १० ॥ दूरदेशी अतिऊजाडी । जेथें घोर वन महाझाडी । तेथें नदीच्या पैलथडी | घोडा जाऊनि उतरला ॥ १ ॥ तेथें राव उतरला खाली । तो नवलपरी बर्तन । वारू नहीं नदी गुप्त झाली । झाडांझुडांसहीत ॥ २ ॥ तेव्हां आश्चर्य वाटलें विक्रमासी । म्हणे ईश्वरी गति न कळे कोणासी । वारू आणि बनी । काय विचार पैं जाहला ॥ ३ ॥ तंब अस्तासी पावला वासरमणी । अंधकार प्रवर्तला रजनीं । पुढें मार्ग न दिसे नयनीं । मग तेथेंचि पहुडला ॥ ४ ॥ चार प्रहर गेलियावरी । उदयासी आला तमारी | मग तो एका नगराचा मार्ग धरी । राजा विक्रम आपण ॥ ५ ॥ तत्व तेथोनि चार योजनें दूरी । तामलिंदा नाम नगरी । तेथें जातां झाला ते अवसरी | हळूहळूपोहोचला ॥ ६ ॥ इकडे उज्जयिनीची कथा राहिली । ती आतां पाहिजे श्रवण केली । नगरजनें वाट पाहिली चार प्रहर रायाची ॥ ७ ॥ तेव्हां सौदागर म्हणे प्रधानासी । वारू द्यावा आमुचा आम्हांसी | कोणीकडे नेलें वारूसी | राया विक्रमाने ॥ ८ ॥ तंव पहाते झाले नगराबाहेर । कोर्सी दो कोर्सी कोस चार | परी कोठे न दिसे राजेश्वर । मग चिंता प्रवर्तली ॥ ९ ॥ तेव्हां सौदागर म्हणे प्रधानासी । सत्वर शोधोनि आणा रायासी । नाहीं तरी आम्हांसी । पैका द्यावा वारूचा ।। ११० । तेव्हां प्रधानासी पडली चिंता । मनीं म्हणे कैसें करावें आतां। रायाचा शोध न लागे तत्त्वतां । सौदागरें अडविलें ॥ ११ ॥ मग प्रधान काय केलें । सौदागरासी बोलावलं। म्हणे वाचें मोल काय वहिलें । तें सांगा आम्हांसी ॥ १२ ॥ तयाने मोल सांगतांचि झडकरी । मग पैका घातला तयाचें पदरी । तेव्हां प्रधानांसी पुसोनि सत्वरी । जातां झाला शनिदेव ॥ १३ ॥ सौदागर गेलियापाठी ॥ मागे काय वर्तली गोष्टी नगरजन सर्व होती कष्टी । देश पट्टणें धुंडिलीं ॥ १४ ॥ नगरीं झाली ऐसी परी इकडे राजा विक्रम काय करी | तया तामलिंदापुर नगरीं । ग्रामामाजी प्रवेशला ॥ १५ ॥ तंव तेथें व्यवहारी सावकार | जातीचा वैश्य धनाढ्य थोर । तेव्हां तयाचे दुकानावर राजा नावेक स्थिरावला ॥ १६ ॥ सावकाराचे दुकानीं । विक्री होतसे द्विगुणी त्यानें भला माणूस जाणोनीं । आदर केला तयाचा ॥ १७ ॥ मग व्यवहारी बोले भावें । तुम्हीं आतां मुखमार्जन करावें । जातीचे कोण आम्हां सांगावे । नाम ग्राम तुमचे पैं ॥ १८ ॥ राजा म्हणे तया वैश्यासी | आम्हीक्षत्रिय असो परियेसीं । आमुचा मुलूख दूर देशीं क्षण एक येथे उतरलों ॥ १९ ॥ मग सावकारे करविला पाक । अति उत्तम षडा सादिक । भात पन्या सांडगे देख करविले बहुत प्रकार । १२० ॥ मग तो वैश्य म्हणे क्षत्रिया । उठा बेगी जेवावया । भोजन करोनि लवलाह्या । मग जाने सुखरूप । २१ ।। मग राव करी संध्यासान | सत्वर सारिता झाला भोजन । उत्तम प्रकारचे पक्वान्न । सेवूनि तृप्ति पावला ॥ २२ ॥ तेव्हां वैश्य म्हणे क्षत्रियासी । सत्य सांगावे आम्हांसी । मग विक्रमें कथिलें तयासी । तेव्हां तो निज अंतरी समजला ॥ २३ ॥ आतां त्या सावकाराची कन्यका नाम तिचें अलोलिका । तिचा पण हाचि देखा इच्छिला वर वरावा ॥ २४ ॥ परि तिसी न मिळे इच्छावर । वैश्य शोध करी निरंतर । तंव हा विक्रमराजा परिकर म्हणे यासी द्यावी कुमारिका ॥ २५ ॥ तेव्हां तो बोले कुमारिकेसी | बाई उत्तम वर आणिला तुजसी । आतां तूं माळ घालीं यासी न करीं अनमान ॥ २६ ॥ हा स्वरूपें आहे सुंदर बत्तीसलक्षणी परिकर | हा भाग्यवंत जाण वर यासी वरीं कुमारिके ॥ २७ ॥ तेव्हां कुमारी बोले पित्यासी । तुम्ही बहुत वर्णिता 'यासी । परी न भरतां मम मानसीं । तंव न वरी त्यासी निर्धारी॥ २८ ॥ आज पाहीन याचे लक्षण । कैसें चातुर्य काय ज्ञान । भाषणावरूनि प्रमाण | सर्व कळों येईल ॥ २९ ॥ ऐसें बदतां जाहली सांज । तंब अस्तासी गेला भानुराज । पित्यासि म्हणे महाराज । पांथिकासी पाठवावें ॥ १३० । मग वैश्य म्हणे क्षत्रियासी । जावें निद्रा करावयासी । अति रम्य चित्रशाळेसी ।तेथे सर्व विदित होईल ॥ ३१ ॥ मग तो विक्रम उठोनि चालिला । जेथें होती चित्रशाळा | तेथें हंस मयूर कोकिळा | नाना प्रकारचे लेपिले ॥ ३२ ॥ चित्र रेखिली बहुकुशलता । बालू आणि गजरथा | चित्रकार चित्र रेखितां । आळस कांही न केला ॥ ३३ ॥ पुढें पाहे राजा नयनीं तंव अपूर्व मंचक देखिला तत्क्षणीं । त्यावरी पासोडा लेप दोन्ही । आंथरुण घातलेसे ॥ ३४ ॥ रत्नखचित सुरंग पलंग | त्यावरी नाना परीचे रंग । जाई जुई पुणे सुरंग । सेज केली अति निगुतीं ॥ ३५ ॥ वरतीं लोबती मोतियांचे घड | चांदवा करीत फडफड | समया जळती धडधड । चतुष्कोणीं चार पैं ।। ३६ । ऐसें पाहूनि राव झाला चकित । म्हणे न कळे काय आहे वृत्तान्त । हा कोण देश कोणती गत । होईल ती कळेना ॥ ३७ । कर्माच्या गति असती गहना । जें जें होणार तें कदा चुकेना । तें तें भोगिल्यावीण सुटेना । देवादिकां स्वासी ॥ ३८ ॥ तरी हैं शनिदेवाचें छळण । तेणें ही माया रचिली जाण | आतां होणार तें होय आपण | जो सर्वांसी पीहीतसे ॥ ३९ ॥ ऐसा मनीं करोनि विचार । मग निद्रा करी राजेश्वर | तया पलंग समाचार | सावधान निजे अंतरी ।। १४० ।। नाना परींचे करी विचार | बुद्धीचे तरंग अपार । म्हणोनि निद्रा न ये साचार | परी मुख आच्छादन केलेसे ॥ ४१ ॥ राये केली ऐसी परी । मग वैश्यकन्यका काय करी | पंचारती घेऊनि करीं । आली रंगमहालाकारणें ॥ ४२ ॥ तिने केला सर्व शृंगार । गळां शोभती मोतियांचे हार | केशर कस्तुरी कर्पूर । सुगंधद्रव्ये आणिली पै । ४३ ।। पायीं पैंजण नुपूरें । में झणत्कार करितीगजरें । पदकांसी जडिले दिव्य हिरे । त्यांचें तेज फांकतसे ॥ ४४ ॥ ती जैसी पुतळीच केवळ । बत्तीसलक्षणी वेल्हाळ । मृगनयनी विशाल भाळ । येऊनि उभी ठाकली ॥ ४५ ॥ राव निद्रेचें मिष करून पलंगीं पहुडलासे जाण । तो न उठे ऐसे जाणोन ।। मग कुमारी काय करी || ४६ ॥ चंदनपात्र घेऊनि हातीं । अलोलिका होय शिंपिती | तरी जागा न होय नृपती । कोणेही प्रकारे करोनी ॥ ४७ ॥ ऐसी एक प्रहर झाली कष्टी । = जागा न होय मग झाली हिंपुटी ॥ मुक्ताहार ठेवूनि खुंटी । निद्रा करी सचिंत ।। ४८ ॥ तंब निद्रा आली कामिनीसी । मग राव उघडितां मुखासी । विचार करीं निजमानसीं । मी सत्त्वधीर म्हणवितो ॥ ४९ ॥ परोपकारी माझें मन | पापास भितों रात्रंदिन । ही तंब कन्या असे जाण । कैसें भाषण करावें ॥ १५० । ऐसा विचार करी निजमानसीं । तब तो निद्रा भर कामिनीसी । मग पाहतां झाला चित्रांसी । तेथें अपूर्व वर्तलें ॥ ५१ ।। चित्रींचा हंस निर्जीव | परी तो काय करिता झाला लाघव | खाली उतरोनि सावयव । हारांचीं मोत्यें भक्षीतसे ॥ ५२ ॥ राव पाहूनि झाला चकित । मनी म्हणें हें आश्चर्यम । परी ही गोष्ट अनुचित दुःखदायक आपणासी ॥ ५३ । जरी हार घ्यावा काढूनी | तरी ब्रीद जातसे निरसूनी । परासी दुःख न द्यावें म्हणोनी । ब्रीद असे माझें हें ॥ ५४ ॥ परंतु गोष्टी हे अघटित । आपणासी दुःख होईल प्राप्त । ग्रहदशेचे मान सत्य । परी हार न काढावा ॥ ५५ ॥ ऐसा निश्चय रायें केला । इकडे सर्व हार हंसें गिळिला । तें पाहूनि राव निजला | कुमारकेशेजारी ॥ ५६ ॥ तंव उगवला असेदिन । कुमारी उठोनी खडबडोन । म्हणे हा पित्याने वर आणिला जाण । अतिमूर्ख नपुंसक ।। ५७ ॥ मनीं क्रोध आला भारी । उठोनि चालली झडकरी । तंब ती हार पाहे खुंटीवरी । तेथें काही दिसेना ॥ ५८ ॥ हार न देखे कुमारिका | ती म्हणे पांथिका अविवेका । हार घेबोनि महाठका । निद्रा केली सुखरूप ।। ५९ ॥ तरी हार देई माझा झडकरी | तुज पचणार नाहीं चोरी । ऐसिया गोष्टीने तुझी थोरी । राहणार नाहीं तत्त्वतां ।। १६० ॥ तरी हार दे माझा मजप्रती । मग त्वां जावें आपुल्या पंथीं । याची चर्चा झालिया निक्चितीं । नाश होईल शरीराचा ॥ ६१ ॥ तंव पांथस्थ म्हणे कुमारिका । हार नाहीं आम्हांसी ठाउका । येथे निद्रा केली म्हणोनी देखा । आळ घालिसी आम्हांवरी ॥ ६२ ॥ तंव ती कुमारी संतप्त मनीं । पित्यासी सांगे तत्क्षणीं म्हणे इच्छावर आणिला मजलागूनी । त्याचे लक्षण अति उत्तम ।। ६३ ॥ तुम्हीं ठक चोर आणिला घरा | तो तस्करविद्येमाजी पुरा । तेणें चोरिलें माझिया हारा । तरी तो मागूनि घेईजे ॥ ६४ ॥ तेव्हां वैश्य म्हणे पंथिकासीं । तुज विश्राम दिधला कासयासी । तरी तूं कां हार घेऊनि बैसलासी । बरा झालासी उतराई ॥ ६५ ॥ उत्तम भोजन दिधले देखा । आणि ही अर्पिली निजकन्यका । ऐसे असतां महामूर्खा । हें काय आचरलासी ॥ ६६ ॥ बराच फेडिला उपकार | देई माझे कन्येचा हार । मग त्वां जावें सत्वर । आलिया गंथें ॥ ६७ ॥ तंव राव म्हणे सावकारासी । तुमचा हार नहीं मजपाशीं । हा कर्मभोग ओढवला सायासीं । नसतेस विघ्न हैं ॥ ६८ ॥ तेव्हां सावकारासी क्रोध आला ।तेणें सेवकासी हुकूम केला । बंधन करावें या तस्कराला | मार द्यावा निष्ठुरपणे ॥ ६९ ॥ यासी मारिल्यावांचून । हार हस्तगत न होय जाण । हा पक्का चोर म्हणोन ऐसें लक्षण पैं याचें ॥ १७० ।। मग त्या सेवकी धावुनी सत्वर | बांधिला तो मुशाफर | अतिशय दिधला मार | दया नाहीं अंतरी । ७१ ॥ ते मारिती निष्ठुरी होऊनी । दया नाहीं अंत:करणीं मारा मारा ऐशा वचन । वैश्य तेव्हां बोलत ॥ ७२॥ मार मारूनि केला जर्जर । म्हणती हार देई गा सत्वर । महानिर्दय निष्ठुर । दया न ये कोणासी । ७३ ॥ मग राव म्हणे वैश्यासी | हार नाहीं गा आम्हांपाशीं । कष्टवितोसी शरीरासी । वृथाचि जाण कासया ।। ७४ ॥ तैं वैश्य म्हणे सेवकांला । हा पक्का तस्कर नव्हे भला | अद्यापि नाहीं कबूल झाला | मार खातो निःशंक ॥ ७५ ॥ मग तो व्यवहारी काय करी । जाऊनि रायाचे दरबारी । राया चंद्रसेना श्रुत करी ॥ सांगे सकळ वर्तमान ॥ ७६ ॥ तें ऐकोनि राजेश्वर ॥ म्हणे आणावा तो तस्कर । ऐसें वचन ऐकोनि सत्वर । सेवकांची मांदी सांवली ॥ ७७ ॥ त्यांनी बंधन करोनि विक्रमासी । आणिते जाहले रायापाशीं । मग प्रणिपात केला वेगेसीं । सन्मुख उभा राहिला ॥ ७८ ॥ मग राव बोले पांथिकासी | हार आहे की तुजपाशीं । तो देई आतां सावकारासी । प्राण पांचवीं आपुला ॥ ७९ ॥ तंव विक्रम बोले वचना । ऐक राया चंद्रसेना । हार घेतला नाहीं जाणा । असत्य न बोलें कदाही ॥ १८० ॥ हाराचा सांगावा विचार । तरी वृथा म्हणाल तुम्ही सर्व । न घडे तोचि विचार । घडला असे समर्था ॥ ८१ ॥ आम्हांसी ग्रह नाहीं सानुकूलनसतीच उत्पन्न होते कळ । त्याची काय करूनि हळहळ । होणार तें होतसे ॥ ८२ ॥ बरें चोरी न करावी परंतु केली । परी आतां पाहिजे क्षमा केली । सर्व अपराध पोटीं घार्ली । कृपा करो महाराजा ॥ ८३ ॥ ऐसें वचन ऐकतां राजेश्वर । क्रोधे संतप्त जैसा खदिरांगार । गर्जना करोनि सत्वर । काय बोलतां जाहला ।। ८४ ॥ सेवकांसी म्हणे उठा सत्वर । तोडा याचे चरण कर । टाकूनि द्या नगराबाहेर | अन्न उदक न द्यावें ॥ ८५ ॥ ऐसा रायाचा अविवेक । मूढमती ते सकळिक। नाहीं कोणीही भाविक । यथा राजा तथा प्रजा ॥ ८६ ॥ तरी रायाचे मुखीं शनैश्चर । सुचूं न दे काही विचार । तोचि पीडा करी बारंबार । दुःख देत रायातें ॥ ८७ ॥ ऐसें चंद्रसेनाचें उत्तर ऐकोनी । सेवक उठले झडकरोनी । राया विक्रमासी चालिले घेऊनी । तया नगराबाहेरी ॥८८ ॥ नेऊनिया नगरप्रदेशीं । तोडिते झाले करचरणांसी । अश्रु येती जनांच्या नयनांसी । महासंकट ओढवलें ॥ ८९ ॥ तेव्हां हात पाय चारी | तोडिले त्याचे निष्ठुरीं । टाकोनि ग्रामाबाहेरी सेवक गेले सांगावया ॥ १९० ॥ मग राजा पुसे सेवकांला । तो मेला किंबा बांचला । त्याचा प्राण कोठे उरला । ऐसे बोले उत्तर ॥ ९१ ॥ मग सेवक म्हणती महाराज । सत्वरचि प्राण जाईल सहज | करचरणांवीण आत्मराज । कैसें सुख पावेल ।। ९२ ॥ खाण्यावीण हैराण । शरीरे पीडा अतिदारुण | तळमळ करी रात्रंदिन । महादुःख होतसे ॥ ९३ ॥ इकडे राजा विक्रम काय करी | हातपायांचे दुःख भारी । जैसा मत्स्य तळमळ करी | उदकावीण जाण पां ॥ ९४ । कोणी येताती बाटसरू | त्यांसीपाहतां येत गहिँबरू । ते म्हणती हे परमेश्वरू । कोण कष्ट या प्राणियासी ॥ ९५ ॥ जरी अन्न उदक कोणी द्यावें । तरी रायें त्यांसी दंडावें । ताडन बंधन करावें । ऐसा धाक जनांसी ॥ ९६ ॥ ऐसें असतां जाहला एक मास । अति दुःख होतसे विक्रमास । परी दया न ये कोणास । ग्रहदशा म्हणवोनी ॥ ९७ ।। राव विक्रम शोक करी । म्हणे ग्रहा समर्था कृपा करी । निष्ठुर न व्हावें निजांतरीं । दया करीं दीनासी ॥ ९८॥ ऐसी करुणा भाकितां तये वेळी । मग शनैश्चरासी कृपा आली । म्हणे याच्या सत्त्वाची न कळे खोली । सीमा झाली तत्त्वतां ॥ ९९ ॥ तरी आतां पीडूं नये तत्त्वतां । केली रायाच्या मनीं प्रेरकता | चंद्रसेन द्रवला चित्ता । म्हणे अन्नउदक देत जावें ॥ २०० ॥ अन्नउदकाची आज्ञा जाहली । नगरजनांसी दया आली । ते आणोनि देती नित्यकाळीं । कनवाळू कृपाळू जन ॥ १ ॥ अन्नउदकाचा होतसे सुकाळ । परंतु करचरणांवीण पांगुळ | त्या अतिदुःखें होतसे विकळ । चैन न पडे क्षणभरी ॥ २ ॥ ऐसी मिली वर्षे दोन । तोंबरी दुःख सोसले अति दारुण । ऐसें कर्माचें विंदान । भोगिल्यावीण सुटेना ॥ ३ ॥ तंब कोणे एके दिवशीं । तेलीण बैसोनि शिबिकेसी । जात होती सासुऱ्यासी । तया मार्गनें ॥ ४ ॥ त्या तेलिणींचे माहेर । होतें मैं उज्जयिनीनगर | सासरें तामलिंदापुर नगर । ऐसें श्रोती जाणावें ॥ ५ ॥ तेथील तेलियाने उज्जयिनीहूनी । स्नुषा आणिली मूळ करोनी । तंव तीं त्या मार्गावरोनी । येत होती उभयतां ॥ ६ ॥ तेव्हा त्या तेलिणीने । पाहिलें विक्रमाकारणें । मनी म्हणे राजा कोणें आणिलासे या स्थानीं ॥ ७ ॥ मग ती खाली उतरोनी कामिनी । लागली विक्रमाच्या चरणीं । म्हणे हातापायांवांचोनी । कोण अवस्था शरीराची ॥८ ॥ राजा अवलोकी तेलिणीकडे । बाई विजयी असोत तुझे चुडे । काय वृत्तान्त ग्रामाकडे | तो सर्व सांग मज ॥ ९ ॥ मग कामिनी म्हणे आहो राया । सर्व सुखी आहेत करुणालया | परी हे अवस्था तुमच्या देहा । काय म्हणोनी जाहली ॥ २१० ॥ राव म्हणे ऐक पतिव्रते । हा कर्मभोग जाण निरुतें । ग्रह दशा फिरली मातें । हैं कर्तृत्व देवाचें ॥ ११ ।। मग सर्व सांगितले तियेसी । जें जें वर्तल क्या समयासी । तें ऐकोनि म्हणे विक्रमासी । धन्य धन्य रे विधातिया ॥ १२ ॥ मग ती तेलीण काय करीत | रायासी शिबिकेमाजी बैसवीत । आपुल्या गृहासी घेऊनि जात । अत्यादरेंकरोनिया ॥ १३ ॥ तंव तो तेली कांपे थरथरां । म्हणे हैं विघ्न आणिलें घरा । जरी श्रुत होईल राजेश्वरा । मग कैसें करावें आपण ॥ १४ ॥ तेव्हां सून म्हणे श्वशुरासी । हा विक्रमादित्य निश्चयों | धर्मनीती राज्य करी उज्जयिनीसी । परि हे दशा ग्रहाची ॥ १५ ॥ हा माळवा देशींचा धनी | जैसा उकिरड्यांत पडिला चिंतामणी । दैवें लाधला आपणालागूनी । म्हणोनि आला गृहातें । १६ ।। मग तो तेली काय करी | राया चंद्रसेना श्रुत करी । आपण तस्कर टाकिला जो बाहेरी हस्तपाद खंडोनी ॥ १७ ॥ जरी आज्ञा होईल राजेश्वरा । तरी आणीन तया तस्करा । दया उपजली मम अंतरा । दीन अनाथ म्हणवोनी ॥ १८ ।। मग राव म्हणे भला रे भला । आणावें तया तस्कराला । प्रतिपाळ करी वहिला । अन्न वस्त्र देऊनी ॥ १९ ॥ ऐसा हुकूम केला रायानेंमग तेली आला घराकारणें । तेव्हां तेलियासी विक्रम म्हणे । गोष्ट सांगतों ऐका ते ॥ २२० ॥ मग राव म्हणे मेहतरासी । तुम्हीं श्रुत न करावें कोणासी । विक्रम आहे मम गृहासी । ऐसें कोठे न वदावें ॥ २१ ॥ मग तो तेली म्हणे राजेश्वरा । घाणा हांकावा माझिया घरा । देईन मी अन्न आणि वस्त्रा ऐसा नेम पैं माझा ॥ २२ ॥ मग विक्रम म्हणे तेलियासी । धन्य तुझी बुद्धि ऐसी । तुझा उपकार न फिटे आम्हांसी । महासंकटी रक्षिलें ॥ २३ ॥ ऐसें करितां कांहीएक दिवस । होते झाले विक्रमास । तया तेलियाचे घरी रात्रंदिवस | घाणा हांकीतसे ॥ २४ ॥ तंव सात वर्षे परिपूर्ण झालीं । पुढें कथा कैसी बरेली । ते पहिजे श्रवण केली । एकाग्रचित्तें कहानियां ॥ २५ ॥ मग कोणे एके दिवशीं । सायंकाळ जाहली निशी । घाण्यावर असतां विक्रमासी । बुद्धि कैसी आठवली ॥ २६ ॥ तो दीप रंगाचा अवसर । ध्यानांत आणी राजेश्वर । राग आळवीतसे मधुर । सुस्वर कंठेंकरोनी ॥ २७ ॥ रागोद्धार करितां प्रत्यक्ष । दीप लागले लक्षण लक्ष । जैसी दीपावलीच देख । प्रकाशमान नगरांत ॥ २८ ॥ तंव एकस्तंभाच्या माडींत । राजकन्या अतिरूपवंत । नामें पद्मसेना निश्चित । बैसलीसे आनंदें ॥ २९ ॥ तेव्हां तिनें अवलोकिला प्रकाश । मग पाचारिलें परिचारिकेस । म्हणे कोणे केलें दीपोत्सबास । शोध करोनि मज सांगा ॥ २३० ॥ दीपावली तों आज नाहीं। आणि लग्नही नसे कोठेही । तरी हें आश्चर्य दिसतें कांहीं । पाहूनि यावें सत्वरी ॥ ॥ इकडे दीपराग झाला संपूर्ण । तेव्हां दीप मावळले मुळीहून । मग दुसरा श्रीराग नामेंकरून । तेथें राय आळवीतसे ॥ ३२ ॥ पद्मसेना पुसे परिचारिकेसी ॥ हा पुरुष रागज्ञानी विशेषीं । राग आळवितो अति सुरसीं । कोण्या स्थळी पहा गे ॥ ३३ ॥ याचा आणावा समाचार । धुंडाळावे सकळ नगर | जेथें असेल तो नर । येथें आणा वेगेंसी ॥ ३४ । तेव्हां परिचारिका चौधीजणी । नगरीं शोध करिती तत्क्षणी । तंव तो तेलियाच्या घरी घाणी । हांकीतसे चौरंगा ॥ ३५ ॥ त्या परतोनि राजकन्येसी सांगती । की चौरंगा केला जो निश्चितीं तो तस्कर तेलियाच्या गृहाप्रती | घाणा हांकीत बैसला ॥ ३६ ॥ तोचि करीत आहे रागरंग परी स्वरूप दिसताहे बेढंग । जैसें कां शिमग्याचे सोंग । ऐसियापरी दिसताहे ।। ३७ ॥ मग पद्मसेना म्हणे साचार । तरी घेऊनि या तो तस्कर । जीवें भावें करीन भ्रतार । वेध लागला अंतरीं ॥ ३८ ॥ परिचारिका म्हणती प्रमाण । परी राया श्रुत करावें जाण । म्हणजे न लागे दूषण । शब्द न ये आम्हांवरी ।। ३९ ॥ तेव्हां पद्मसेना म्हणे तुम्हांसी कायी । तयासी येथें आणावें पाहीं मग रायासी श्रुत करीन लवलाहीं । तुम्ही मनीं भिऊं नका || २४० ॥ तेव्हां परिचारिका निघाल्या तेथुनी । येत्या झाल्या तेल्याचे दुकानीं मग त्या तेलियासी पुसोनी तयासी घेऊनि चालिल्या ॥ ४१ ॥ एकस्तंभाच्या माडीवरी । तयासी नेलें पैं सत्वरीं | मग त्यातें अवलोकूनि राजकुमारी | परम अंतिम संतोषली ॥ ४२ ॥ मग ती वंदे चौरंगासी । तुम्ही रागज्ञानी अतिविशेषीं परी आतां रागोद्धार करावा वेगेसीं । जेणें तृप्त होती श्रवण हे ॥ ४३ । मग तो करी रागोद्धार । यथान्याय गातसे स्वर । कंठ त्याचा अति मधुर । जैसा गंधर्व दूसरा ॥ ४४ ॥ ऐसा राजकन्येच्या माडीवर | रागरंग होतसे अपार । तंव चंद्रसेन आपल्या माडीवर । ऐकता जाहला ॥ ४५ ॥ मग राव पुसे परिचारिकेसी । आजि कुमारिकेच्या महालासी । रंग होतो दिवसांनीं कोणे कार्यासी सांग पां ॥ ४६ । मग दासी म्हणती समर्था । हा अन्याय आम्हांसी लावितां । परी हे निजकन्येची अवस्था । आम्हांकडे काय शब्द ॥ ४७ ॥ परंतु आमुची एक विनवणी । येऊनि पाहावें निजनयनीं । मग येईल कळोनी । सर्व अवस्था तेथील ॥ ४८ ॥ पद्मसेनेचा विचार | आम्हां सांगतां न ये समाचार । म्हणोनि तेथें चलावें सत्वर । मग जे करणें तें करावें ॥ ४९ ॥ तंव त्या रायासी निद्रा आली । पुढें कथा कैसी वर्तली । ती पाहिजे श्रवण केली । एकाग्रचित्तेकरोनिया ॥ २५० ॥ राजा विक्रम त्या माडीवर । बैसलासे चिन्तातुर । तंव साडेसात वर्षे समाचार | भरलीं शनिदेवाची ॥ ५१ ॥ राजा मनी चिन्ता करीत । म्हणे केव्हां उज्जयिनी होईल प्राप्त । क्लेश भोगिले अत्यंत । परी कृपा न करी ग्रहस्वामी ॥ ५२ ॥ ऐसा राव चिंता करीत । तंब तेथें काय वर्तली मात । शनिदेव होऊनि कृपावंत । सन्मुख उभा ठाकला ॥ ५३ ॥ म्हणे ऐक राया विक्रमसेना । मज न ओळखसी अज्ञाना । अद्यापि अनुभव तव मना । आला किंवा नाहीं ॥ ५४ ॥ मग राव उठूं पाहे झडकरोन । परी ते नाहीत करचरण । तेव्हां तैसाचि भूमिशयन । लोटांगण घालीतसे ॥ ५५ ॥ तेव्हां शनि म्हणे राया विक्रमा । धन्य धन्य तुझा महिमा । आतां मी प्रसन्न राजोत्तमा | इच्छा असेल तें माग ॥ ५६ ॥ तंव विक्रम सद्गद बोले वचन । म्हणे मनुष्यदेहा न पीडी जाण । हेचि द्या मज दान । कृपाळुवा शनिदेवा ।। ५७ ॥ म्यां दुःख सोशिलें शनिवार । ऐसें प्राण्यांसी नाहीं सोडवणार । तरी तूं कोणासी न डी समाचार । हें चि मागणी शनिदेवा ॥ ५८ ॥ ऐसें ऐकोनि शनिदेव । म्हणे धन्य धन्य तूं विक्रमराव । परपीडेचा अनुभव । जाणतोसी निजांतरी ॥ ५९ ॥ तूं न मागसी हातपाय । राजछत्रादि सुखोपाय | तरी तुज ईश्वर म्हणों ये । परमदुःख निवारिसी ॥ २६० ॥ मग कृपा उपजली शनिदेवासी । रावीं करचरणादि रूपासी । पहिल्याहूनी अति विशेषीं । सुंदर काया पैं केली ॥ ६१ ॥ मग राव शनिदेवाचे चरण धरी । म्हणे कृपाळुवा कृपा करीं । हेंचि मागणें सापाची । न करीं पीडा कोणासी ।। ६२॥ मग रायाते शनिदेव बोले । म्या काय तुज दुःख दिधलें । दुःख गुरुनाथ पाहिलें । ते कष्ट कोणे रीती ॥ ६३ ॥ तुज दुःख दाविलें किंचित । म्यां कैसे त्रासिले देव-दैत्य । तें श्रवण करें निश्चित । गुरुपीडा अवधारी ॥ ६४ ।। एके दिवशी प्रातःकाळीं ।। नमन केलें गुरुमाउली | मग हस्त जोडोनि ते वेळीं । विनंती करी तयासी ॥ ६५ ॥ अहो जी श्रीगुरुनाथा । मी तुमच्या राशीसी येतों आतां। तरी मान्य करी कृपावंता साडेसात वर्षांते ॥ ६६ ॥ मग गुरु म्हणे गा मजसी । तुम्हीं कृपा करावी आम्हांसी । न यावें आमुच्या राशि । घड़ी एक जाण पां ।। ६ ७ ॥ मग मी वदलों तें वेळां । तुम्ही करितां माझा कंटाळा | तरी मज थारा नाहीं दयाळा | कोणी न करी मान्य मज ॥ ६८ ॥ तरी पांच वर्षे मान्य करीं । अथवा अडीच वर्षे पदरीं धरीं । अडीचा वर्षांची परी | थोडकीच असे ।। ६९ ॥ परी तें न मानीच गुरू । मग मी म्हणे न घडे निर्धारू | पुन्हां मनीं केला विचारू । कीं गुरुसी न गांजावें ॥ २७० ।। गुरु केवळ माउली । सदा कृपेची करी साउली । गुरुवचन न मानितां ये वेळी । अधःपात प्राप्त होय ॥ ७१ ॥ ते वेळां मी लागलों चरणीं बिनंती करीत विनीत वचनीं । मी प्रसन्न तुज ग्रह शनी । माग माग गुरुनाथा ॥ ७२ ॥ तेव्हां गुरु म्हणे शनैश्चरा । आम्हांवरी कृपा करा । न यावे आमुच्या शरीरा । हेंचि आतां मागतसे ।। ७३ ।। मग मी प्रसन्न जाहलों ते क्षणीं साडेसात प्रहर येतो म्हणोनी । तुम्हीं मान्य न केल्या सर्व प्राणी । न मानिती मजलागीं ॥ ७४ ॥ मग गुरुदेव महणे प्रमाण । तरी सवा प्रहर येणे जाण । तें म्या मान्य केलें वचन । मग आज्ञा दिधली गुरूनें ॥ ७५ ॥ गुरु विचार करी निज मानसीं । स्नानसंध्या स्वकर्मा । करितां दवडीन सव्वा प्रहरासी । मग तो शनि कार्य करील || ७६ ॥ ऐसा गर्व धरिला मनांत । तो मज कळला वृत्तांत । मग म्यां विचारिले चित्तांत । काही चमत्कार दाखवा ॥ ७७ ॥ तंव ते आली ग्रहाची वेळ । तेव्हां गुरु जाहला उतावेळ ॥ म्हणे मृत्युलोकी गंगाजळ | तरी स्रानालागीं पैं जावें ॥ ७८ ॥ शनिग्रहाची पडता छाया || तेव्हां पालटली गुरूची काया ॥ मग फकीर वेषे तया ठाया शनैश्चर पातला ॥ ७९ ॥ तयापासीं खरबुजें होतीं दोन । ती केली गुरुसी अर्पण । मग गुरु हर्षयुक्त होऊन । दोन पैसे देत तया ।॥ २८० ।। मग स्रान करोनि ते बेळी । धोतरांत फळें बांधिली । झारी शोभे करकमळी | चालिले ते मार्गाने ॥ ८१ ॥ तंव पुढें दिसे एक नगरी । तेथें काय झाली परी | राव प्रधान समसरी | दोन पुत्र दोघांसी ॥ ८२ ॥ ते उभयतां त्या दिवशीं । गेले होते शिकारीसी । दोन प्रहर झाले तयांसी । वाट पाहे राजेंद्र ॥ ८३ ॥ तंव ते येतां दिसेना | इकडे उशीर जाहला भोजना । तेव्हां सेवकांसी केली आज्ञा | धुंडूनि आणा दोघांसी । ८४ ॥ मग ते सेवक निघाले सत्वर । लगबगा आले गांवाबाहेर | तंव तो पुढें देखिला विप्र । हात झोळी खरबुजांची ॥ ८५ ।। तंव शनैश्चर केली माव । फळांची मस्ती जाहली सावयव । सेवकी ओळखिला ब्रह्मदेव । म्हणती तुम्हांपासीं काय आहे ॥ ८६ ।। ब्राह्मण म्हणे सेवकांसी । खरबुर्जें घेतलीं फराळासी । सेवक म्हणती रुधिरासी । स्राव होते दिसताहे ।। ८७ ॥ तूं ब्राह्मण किंवा शूद्र | वस्त्रांतून गळे रुधिर | काय आहे तें सत्वर । दाविजे मैं आम्हासी ॥ ८८ ॥ मग गुरु झाला भयभीत । म्हणे हे अघटित काय वदत | अधोदृष्टि झोळी पाहात । तंब तें रुधिर प्रत्यक्ष ॥ ८९ ॥ सेवक झोळी घेती हिरोन | मग ते पाहती सोडोन । तंव शिरकमळें निघालीं दोन । प्रधान राजपुत्रांची ॥ २९० ॥ सेवक म्हणती रे चांडाळा | महादुष्टा पतिता खळा । ब्रह्मवंशी अमंगळा । दया नाहीं तुज अंतरी ॥ ९१ ॥ मग ते क्रोधयुक्त मानसीं । बंधन करिती ब्राह्मणासी | मारीत मारीत तयासी । रायापाशी आणिला ॥ ९२ ॥ राया सन्मुख उभा करून । सेवक सांगती वर्तमान | हा बाळहत्यारी ब्राह्मण । यानें उभयतांसी मारिलें ॥ ९३ ॥ ऐकतांचि रायासी आली मूर्च्छना । मनी म्हणें कैसें केलें नारायणा | एक पुत्र होता तोही मना । नाहीं आला तुझ्या की ॥ ९४ ॥ ब्राह्मण नोहे हा काळ । यानें गिळिला माझा बाळ तरी यासी नेऊनि तत्काळ | सुळावरी देईजे ॥ ९५ ॥ ऐसा होतां रायाचा । सूळ करविला लोखंडाचा । नेऊनि रोविला पैं साचा । नगराबाहेरी ॥९६ ॥ तंब भृगूचिया मंदिरांत । वर्तमान झालें श्रुत । तेव्हां एकचि वर्तला आकांत । तो लिहितां ग्रंथ विस्तार ॥ ९७ ॥ परि राजपुत्राची कामिनी | पतिव्रता लावण्यखाणी । वार्ता ऐकतां तत्क्षणीं | सती जावया सिद्ध जाहली ॥ ९८ ॥ आतां इकडे गुरुनाथासी । घेऊनि गेले बाळापाशीं । तेव्हां न सुचे कांहीं गुरूसी । ग्रहदशेने बेष्टिलें ॥ ९९ ॥ मग गुरु वदे सेवकांला । आतां सुळीं न द्यावें आम्हांला | दहा सहस्र रुपये तुम्हांला । देतों क्षणभरी थांबावे । ३०० ॥ दोन घटिका आम्हांसी । सुळीं न द्यावे निश्चयों । मग अवलोकावें नेत्रेंसी । जैसें होईल तें ॥१॥ ऐसे करुणाशब्द बोलतां तयां । मग त्या सेवकांसी आली दया । तेव्हां ते म्हणती दोन घटिका थांबोनियां मग देऊं सुळावरी ॥ २ ॥ ऐसें बोलतां बोलतां जाण । सव्वा प्रहर झाला परिपूर्ण । प्रधान राजपुत्र दोघेजण | वारूंसहित पातले ॥ ३ ॥ जेणें रायासी जाणविलें । त्याचे दरिद्र दूर केलें । मग सेवकांसी आज्ञापिलें । सुळीं न द्यावें ब्राह्मणा ॥ ४ ॥ तेव्हां सेवक थांबले सत्वर । येऊनि नगराबाहेर | सांगितला समाचार | सुळी न द्यावे ब्राह्मणा ।। ५ ॥ मग तो आणिला रायापाशीं । उभा राहिला सन्मुखेंसी । आशीर्वाद देऊनियां रायासी । आपुला वृत्तान्त निवेदिला ॥ ६ ॥ ऐकोनि राव झाला सद्गदित । म्हणे मज नव्हतें विदित । मी दूषण लावोनि वधीत । होतो तुम्हां गुरुराया ॥ ७ ॥ धिक् धिक् हा संसार । मी महापापी अनिवार । केवढा केला अविचार राज्यम देकरोनियां ॥ ८ ॥ तेव्हां सद्गदित झाला नृपती । गुरुचरण धरिलें प्रितं । स्फुंद स्फुंदून रडे निश्चितीं । मी अपराधी गुरुराया । ९ ॥ नेणतपणें जाहला अविचार । तो क्षमा करीं साचार | मग हात धरोनि सत्वर । सिंहासनीं बैसविला ।॥ ३१० ।। मग गुरु म्हणे ऐक भूपाळा । हा अन्याय नाहीं तुजला । ही शनैश्चराची कळा । दुःख दाविलें तयानें ॥ ११ ॥ मग झोळी आणोनि पाहती । तव तीं खरबुजेंच दिसतीं शिरकमळांची आकृती अदृश्य जाहल तत्काळ ॥ १२ ।। असो रायें करविलें भोजन । गुरुपंक्तीस बैसला आपण । आणखीही दिव्य ब्राह्मण । सर्वही तृप्ति पावले ॥ १३ ।। मग गुरूसी वस्त्रे भूषणें । दिधलीं राया भृगूनें । तेव्हां आज्ञा घेऊनि गुरूनें । प्रयाण केलें तेथोनी ॥ १४ ॥मग शनिदेव आले गुरूपाशी । नमन केलें साष्टांगेंसीं म्हणे वर्तणूक जाहली कैसी ती सांगाबीं गुरुनाथा ॥ १५ ॥ गुरु म्हणे बापा शनैश्चरा | सव्वा प्रहर केला माझा मातेरा । साडेसात वर्ष येतासी खरा तर मग काय होतें कळेना ॥ १६ । तूं ग्रहों माजीं ग्रह श्रेष्ठ । जीवांसी देसी बहु कष्ट । मी गुरु तुज अति श्रेष्ठ | बरा उपकार फेडिला ।। १७ ॥ असो जें जाहलें तें बरें झालें । परी ऐसें कोणा न कष्टवीं वहिलें । तुज शपथ माझी ये बेळे शनिग्रहा समर्था ॥ १८ ॥ मग शनिदेव म्हणे गुरूसी । गर्व न धरावा मानसीं । गर्व धरील त्या पुरुषासी । ऐसेंच मी गांजीन ॥-१९ ॥ गुरुजी तुम्हांसी गर्व जाहला । म्हणोनि हा अपराध घडला । तरी क्षमा करा बाळकाला अपराधी पार्टी घालिजे ॥ ३२० ॥ मग शनि गेला शिवापाशीं म्हणे आतां येतों तुम्हांसी । तंव शंभु म्हणे आम्हांसी । काय करिसी येऊनियां ॥ २१ ॥ परी येशील तेव्हां सांगून येणें ऐसें उभयतां झालें बोलणें ॥ मग दुसरे दिवशीं शनीनें । येतो म्हणोनि सुचविलें ॥ २२ ॥ शंकरें ऐकोनि बचना । क्षण एक लपला कैलासीं | मग वदता झाला शनीशी। तुवां आमुचे काय केलें ॥ २३ ।। मग शनि म्हणे महादेवा | तुमचा धाक त्रिभुवनीं सर्वा मजभेणें लपलेती देवाधिदेवा हें काय थोडे असे ॥ २४ ।। ऐकोनि हास्य करी कैलासराज । म्हणे धन्य तुझें उग्र तेज || मग कृपा करून सहज | आज्ञा देत शनीला ॥ २५ ॥ मग ग्रह आला रामचंद्रासी ॥ वनवास भोगविला तयासी । आणि ग्रह येतां सीता से । रावण चोरून पै नेलें ॥ २६ ॥ रावणाच्या मंचकाखालते । नवग्रह होते पालथे । त्यावर मंचक ठेवूनि निरुतें । रावण पहुडे नित्यकाळीं ॥ २७ ॥ तंव तेथें आले नारदमुनी । ते वदते झाले मजलागूनी । तूं ग्रह श्रेष्ठ महाअभिमानी । ऐसी दशा तुमची ॥ २८ ॥ तरी येथें तुमचें कांहीं न चाले । गरिबांस कष्टवितां बळें । हे सामर्थ्य नव्हे आगळें । उगाची पुरुषार्थ भोगितां ॥ २९ ॥ मग शनि वदे नारदासी । आम्ही पालथे ते सोयींचे करविसी । मग पाहें पराक्रमासी । कैसा आहे तो दावीन ॥ ३३० ॥ नारद म्हणे मी ऐसें करीन । ऐसें बोलोनिया वचन । मग रावणापाशी जाऊन । सांगे तयासी विचार । ३१ ॥ म्हणे ग्रह पालथे घालून । मंचकी निद्रा करिसी रात्रंदिन । तरी हें अनुचित असे जाण । वैरियांच्या उरावरी पाय द्यावा । ३२ ।॥ तें बचन रावणा मानलें । मग पालथे ते सोयीचे केले तंब तेथें काय वर्तलें । तें परिसावें सज्जनीं ॥ ३३ ॥ दृष्टि फिरवितां शनैश्चर । षण्मासांत सहपरिवार । निर्दाळी श्रीरामचंद्र | पुत्रपौत्रांसहित पैं ॥ ३४ ॥ हरिक्षंद्रासी आला शनी । बारावा अतिक्रूर स्थानीं । पीडिता झाला कौशिकमुनि । राज्यभ्रष्ट तो केला ।। ३५ ॥ पुढें अति | दिधलें तयासी । स्त्रीपत्रादि घातले विक्रयासी । सवे विकला डोंबासी । तेथेंहि जाचिलें बहुत ॥ ३६ ॥ ऐसें कष्टविले राजोत्तमा दमयंतीप्राणमनोरमा दुःख दिधलें हे विक्रमोत्तमा । पीडियेली दमयंती ॥ ३७ ॥ ग्रह आला इंद्रराया ।। भोगिली गौतमाची जाया । भगांकित झाली सर्व काया | ऋषीशापेंकरोनिया ॥ ३८ ॥ ग्रह आला चंद्रासी । स्पर्श केला और पत्नी । कलंक लागला चंद्रासी । ऐसें झालें जाण पां ॥ ३९ ॥ ग्रह आला वसिष्ठासी । क्षय झाला शत पुत्रांसी | तैसेंचि पिलें पराशर की । मत्स्यगंधा भोगिली ॥ ३४० ।। पांडव ग्रह दशा भोग्य | राज्य हरोनि गेले वनात | कौरवांचा क्षय केला क्षणांत | ग्रह येतांचि तत्काळीं ॥ ४१ ॥ तैसाचि श्रीकृष्णासी ग्रह आला | स्यमंतकाचा डाग लागला । तो कोणत्या कारणें निघाला । हरिविजयीं ती कथा ॥ ४२ ॥ मग कृष्ण म्हणे शनैश्चराय । तूं महासमर्थ होसी खरा । सर्वत्रांसी तुझा दरारा । देवदानवांदिकांसी ॥ ४३ ॥ ऐसें देवादिकांसी त्रासिलें । त्यांत तुजला कांहीसे दुःख दिधलें । किंचित् चमत्कारासी दाविलें । समजावया तुजलागीं ॥ ४४ ॥ मग विक्रम उठे झडकरी | साष्टांग नमस्कार करी । धन्य शनैश्चरा अवधारी । पावन केलें मजलागीं ॥ ४५ ।। आतां मी अनन्य शरण। कृपा करीं तुज अनाथा लागून हेचि द्यावे वरदान । न पीडीं प्राणिमात्रासी ॥ ४६ ॥ मग शनि म्हणे विक्रमासी | धन्य तूं परोपकारी होसी । परपीडा निवारितोसी । उपमा नाहीं तुजलागीं ॥४७॥ तेव्हा प्रसन्न झाला शनैश्चर । रायासी देता झाला निजवर । हा ग्रंथ श्रवण पठण करी जो नर । तयासी पीडा न करी मी ॥ ४८ ॥ भावें करितां श्रवण पठण | आदरें ग्रंथसंरक्षण । त्यासी रक्षीन मी रात्रंदिन । कृपा करीन सर्वथा ॥४९ ॥ जो कां श्रवण पठण न करी | आणि ग्रंथांची हेळणा करी । तया नराच्या शरीरी । पीडा फार करीन मी ॥ ३५० ॥ श्रवणपठणाचा ऐका विचार । नित्य अथवा शनिवार | श्रवण पठण करी जो नर । उपोषणे अति संतोषी । ५१ ॥ जरी न करवे उपोषणासी । तरी श्रवण करावें अहर्निशी । तेणें संतोष मम मानसीं । मग पीडा न करी तत्त्वतां ॥ ५२ ॥ हें वचन माझें नेमस्त । विक्रमासी भाष देत । त्या नरासी मी भाग्यवंत । करीन जाण निर्धारें ॥ ५३ ॥ ऐसा वर देऊनि रायासी । शनिदेव गेले निजस्थानासी । पुढें कथा वर्तनी कैसी । ती श्रवण करावी श्रोतेहो ॥ ५४ ॥ राजकन्येच्या माडीवर विक्रमी भेटले शनैश्वर । तेव्हा रायाची दिव्य झालें शरीर | जैसा सूर्य प्रकटला ॥ ५५ ॥ तंव चंद्रसेन राव आला । पाहे तंव देखे विक्रमाला । जैसा मदनाचा पुतळा । तटस्थ जाहला मानसीं ॥ ५६ ॥ मग ते पद्मसेना राजकुमारी | राया विक्रमातें वरी | राव पुसे ते अवसरी । आपण कोण महाराज ॥ ५७ ॥ विक्रम वदे साचार | मी तुमचा असे चोर ।श्रीपति वैश्य ५० संपूर्ण घातमास सावकारी । बोलवा आधी तयासी ॥ ५८ ॥ तंव ते थांबली सेवकांची मांदी। वैश्य बसला होता गादी। म्हणती बोलाविलें रायें आधी । सत्वर तेथें चलावें ॥ ५९ ॥ वैश्य उठला झडकरोन । येऊनि रायासी करी नमन । राव म्हणे वैश्यालागून | हाचि तस्कर होय कीं ॥ ३६० ॥ वैश्य म्हणे रायासी । आतां चला मम मंदिरासी । अवश्य म्हणोनि वेगेंसी । चित्रशाळेसी पातले ॥ ६१ ॥ तंव चित्रींचा निर्जीव हंस । जेणें गिळिलें होतें हारास । तो पुनः उगाळी सावकाश । जैसा होता तैसाचि ॥ ६२ ॥ हार उगाळितां हंसाने । तो पाहिला सर्वजणी । हैं आक्षर्य सकळांकारणें । म्हणती हैं अघटित ।। ६३ ॥ मग तो वैश्य वाणी । बहु संतोषला जमना । कन्या अर्पूनि चरणीं । विक्रमाच्या लागला ॥ ६४ ॥ जन म्हणती अघटित कला । निर्जीव ले हार गिळिला दोष लाविला महापुरुषाला । तें आजि कळों आलें ॥ ६५ ।। चंद्रसेन पुसे विक्रमासी । आपण राहतां कोणे देशीं कोण नाम कोणे वंशीं । जन्म तुमचा सांगावा ॥ ६६ ॥ तंव विक्रम म्हणे चंद्रसेना । काय पुससी विचक्षणा | मी असें उज्जयिनीचा राणा | नाम माझें विक्रम || ६७ ॥ ऐसे ऐकतां राजेश्वर । घाली साष्टांग नमस्कार । म्हणे अन्याय घडला थोर । कृपा करीं दयाळा ॥ ६८ ॥ तेव्हांच की असतें श्रुत । तरी कष्ट कां होते प्राप्त । न कळतां झालें अनुचित । त्यासी उपाय कायसा ।। ६९ ॥ बिक्रम म्हणे राजेश्वरा । हा आमुच्या ग्रहदशेचा फेरा । पूजन न केलें शनैश्वरा । म्हणोनि कष्ट पावलों ॥ ३७० ॥ व ग्रह नव्हता सानुकूळ । म्हणोनि तव बुद्धि विकला । आतां ग्रह झाला सानुकूळ । म्हणोनि ऐसे बदलीसी ॥ ७१ ।। असो रायाने सोहळा केला फार । फोडिलें द्रव्याचें भांडार धर्म केला अपार । याचकजन संतोषती ॥ ७२॥ मग तो तेली बोलाविला विक्रमें तयासी नमस्कार केला एक देश तया देवविला सुखी केला तये बेळीं ॥ ७३ ॥ चंद्रसेन हर्षभरित म्हणे मम भाग्यासी नाहीं अंत बिक्रम जोडला 1. जामात | धन्य मी एक संसारी ।। ७४ । ऐसें करितां एक मास | झाला राया विक्रमास । मग पुसोनियां चंद्रसेनास । आज्ञा मागतसे नृपती ॥ ७५ ॥ मग चतुरंग दळ सिद्ध करून । हत्ती घोडे दासदासी जाण । देश पट्टणे ग्राम देऊन । जामातासी बोळविलें ॥ ७६ ॥ तंव त्या सावकारें आपण । नाना वस्तु अनर्घ्य रत्न । विक्रमासी देऊन । बोळवण केली कन्येची ॥ ७७ ॥ असो सवे घेऊनि दळभार । उज्जयिनीसीं आला राजेश्वर । नगर शृंगारिलें सत्वर । अति आनंद होतसे ॥ ७८ ॥ मग सुमुहूर्त पाहूनी । विक्रम बैसविला सिंहासनीं । याचक तृप्त केले दानीं । चिंता चित्ता असेना ॥ ७९ ॥ मग हैं शनैश्वर व्रत । राजा विक्रम आचरित । पीडा गेली समस्त । शनिप्रसादेकरोनी ॥ ३८० ॥ ही महाराष्ट्र भाषेची कथा | परी अर्थाविषयी नाहीं न्यूनता | यथामति वर्णिली तत्त्तां । श्रवण करा भाविक हो ।। ८१ ।। हा ग्रंथ करितां श्रवण | सकळ विघ्ने जाती निरसून | ग्रहपीडा अति दारुण | न बाधे कदा कल्पांती ॥ ८२ ॥ ऐकतां कथा नवग्रहांची । येणे पीडा निवारे क्लेशांची । वार्ताही नुरे दुःखाची । कृपा करिती ग्रह सर्व ॥ ८३ ॥ श्रवण पैठणी निदिध्यास । लेखक पाठक सर्वांस । ग्रंथ संरक्षी तयास । क्लेश विघ्ने न बाधती कदा ।। ८४ ॥ ही शनैश्वराची ख्याती । केवळ शनैश्षराची मूर्ती। अहर्निशीं जे कां ध्याती । त्यांसी संरक्षी शनिदेव | ८५ ॥ सकळ दुःख दरिद्र । येणें निरसेल समग्र | भावें श्रवण करितां साचार | फळ प्राप्त तयासी ॥ ८६ ॥ म्हणे तात्याजी महिपती । हे प्रीति पावो शनैश्चरा पती । कृपाळू तो उग्रमूर्ती । निर्विघ्न करी सर्वांसी ॥ ८७ ॥ इति श्रीशनैश्चराची कथा । त्याचा तोचि बदविता । आपुली तो मायिक वार्ता । करविता श्रीपांडुरंग ।। ३८८ ॥ । इति श्री शनैश्चर माहात्म्य संपूर्णम् । श्री शनैश्चर अर्पणमस्तु ।।

 

 


श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs