श्रीराम जय राम जय जय राम ...
मंगल भवन अमंगल हारी
द्रबहु सुदसरथ अचर बिहारी
जे मंगल घडवणारे आणि अमंगलाचा नाश करणारे आहेत अश्या
दशरथ पुत्र श्री रामाने माझ्यावर कृपा करावी
होइहि सोइ जो राम रचि राखा।
को करि तर्क बढ़ावै साखा॥
जशी प्रभूश्रीरामाची इच्छा आहे त्याच प्रमाणे सर्व
होणार आहे, आपण आपले तर्क लढवून आणि प्रयास करून
त्यात बदल संभवत नाही.
हो, धीरज
धरम मित्र अरु नारी
आपद काल परखिये चारी
आपल्या आयुष्यातील कठीण कालखंडात चार गोष्टींची
नेहमीच परीक्षा होते. त्या चार गोष्टी म्हणजे आपले धैर्य, आपले मित्र, आपली पत्नी आणि आपला धर्म
अर्थात आपली नितीमत्ता आणि धर्मतत्वांच्यावरील आपली अव्यभिचारी अशी निष्ठा.
जेहिके जेहि पर सत्य सनेहू
सो तेहि मिलय न कछु सन्देहू
परंतु या कष्टप्रद कालखंडात एक गोष्ट कायम लक्षात
ठेवली पाहिजे ती म्हणजे सत्याला फार काल असत्य झाकोळू शकत नाही. सत्याचा निश्चित
उदय होतो.
हो, जाकी
रही भावना जैसी
प्रभु मूरति देखी तिन तैसी
ईश्वराच्या स्वरूपाच्या बद्दल तुमच्या मनात जसा भाव
असेल तशीच ईश्वराची प्रतिमा तुम्हाला दृष्टोत्पत्तीस पडेल. अर्थात तुमचा जसा भाव
असेल तसाच तुम्हाला देव दिसेल.
रघुकुल रीत सदा चली आई
प्राण जाए पर वचन न जाई
राघुकुलाची ही परंपरा आहे. दिलेल्या वचनाचे सदापालन
करावे. वचन देताना विचार करावा पण वचनाचे पालन करण्याची वेळ आली आणि त्यासाठी
प्राणार्पण करावे लागले तरी हरकत नाही. प्राण गेले तरी चालतील पण मुखातून निघालेला
शब्द कधी व्यर्थ जाऊ नाही.
हरि अनन्त हरि कथा अनन्ता
कहहि सुनहि बहुविधि सब संता
प्रभू श्रीराम हे आपल्याला ज्ञात असलेले ईश्वराचे एक
रूप आहे. परंतु वास्तवात ईश्वराचे सामर्थ्य अथांग आहे त्याचा पार सामान्य जनांना
लागणे अशक्य आहे. ईश्वराची रूपे सुद्धा त्याच्या सामर्थ्याच्या प्रमाणे अनंत आहेत.
ज्या ज्या संताला त्याने ज्या रुपात दर्शन दिले त्यांनी त्यांच्या शब्दात ईश्वराचे
गुणगान केले आहे. पण आहे तो एकच.
सीता राम चरित अति पावन
मधुर सरस और अति मन भावन
प्रभू श्रीरामचंद्र आणि त्यांची पत्नी सीता यांचे हे
चरित्र अत्यंत दिव्य, ऐकण्यास गोड, सर्व
श्रेष्ठ आणि मनाला मोहवून घेणारे आहे.
ओ, पुनि
पुनि कितनेहू सुने सुनाये
हिय की प्यास भुजत न भुजाये
या रामकथेला सांगणाऱ्याने ते कितीही वेळा सांगितले
आणि ऐकणाऱ्याने ते कितीही वेळा ऐकले तरी ना कथाकाराची तृप्ती होते ना श्रोता तृप्त
होतो.