Blog Views

श्रीरामस्तुति

श्रीरामस्तुति

 

संसारसंगे बहु शीणलों मी। कृपा करी रे रघुराजस्वामी। प्रारब्ध माझें सहसा टळेना। तुजवीण रामा मज कंठवेना ॥१॥ मन हे विकारी स्थिरता न ये रे। त्याचेनि संगें भ्रमतें भलें रे । अपूर्व कार्या मन हैं विटेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥२॥ माया प्रपंच बहु गुंतलों रे। विशाळ व्याधीमध्ये बांधलों रे। देहाभिमानें अति राहवेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥३॥ दारिद्र्यदुःखें बहु कष्टलों मी । संसारमायेंतचि गुंतलों मी।संगीत माझे मजला कळेना। तुजवीण रामा मज कंठवेना ॥४ ॥ लक्ष्मीविलासी बहु सौख्य वाटे। श्रीराम ध्यातांमनिं कष्ट मोठे। प्रपंचवार्ता वदतां विटेना। तुजवीण रामा मज कंठवेना ॥५॥ अहोरात्र धंदा करिता पुराना। प्रारब्धयोगें मज राहवेना। भवदुःख माझे कधिंही टळेना। तुजवीण रामा मज कंठवेना॥६॥ तीर्थासी जातां बहु दुःख वाटे। विषयांतर राहुनि सौख्य वाटे। स्वहित माझें मजला कळेना। तुजवीण रामा मज कंठवेना ।॥७॥ मी कोठुनी कोण आलों कसा स्त्रीपुत्रस्वप्नांतचि गुंतलो हो। ऐसें कळोनी मन हें विटेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥८॥ असत्य वाक्यांनि मुकाच झालों। अदत्तदोषें दुःखीं बुडालों। अपूर्व करणी कशी आठवेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥९॥ब्रह्ममूर्ती भजन रामसिंधू। चैतन्य स्वामी दीनबंधु । अभ्यंतरी प्रेम मनी ठसेना। तुजवीण रामा मज कंठवेना ॥१०॥ विश्रांति देहीं अणुमात्र नाही। कुलाभिमान पडलों प्रवाहीं। अशांतुनी दूर कधीं कळेना। तुजवीण रामा मज कंठवेना ॥११॥ विषयी जनांनीं मज आळवीलें। प्रपंचपाशांतचि बूडवीलें। स्वहित माझें मजला दिसेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥१२॥नरदेहदोषां वर्णू किती रे। उच्चाट माझे मनिं वाटती रे। लल्लाटरेषा कधिं पालटेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥१३॥ मजला अनाथा प्रभु तूंचि दाता। मी मूढ की जाण असेंचि आतां । दासा मनीं आठव वीसरेना। तुजवीण रामा मज कंठवेना ॥१४॥

 


श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs