माणसाची सर्व धावपळ ही दुपार अन् रात्रीच्या
भोजनासाठीच असते. हे भोजन करण्यापूर्वी हात-पाय धुऊन पानावर बसावे. जेवणाला
सुरुवात करण्यापूर्वी भरल्या ताटाला नमस्कार करावा
भोजनापूर्वीची प्रार्थना
वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे।सहज हवन होते नाम
घेता फुकाचे । जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म । उदरभरण नोहे जाणिजे यज्ञ
कर्म ॥१॥
जनी भोजनी नाम वाचे वदावे। अति आदरे गद्य घोषे
म्हणावे। हरि चिंतने अन्न सेवीत जावे। तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे ॥२॥
उपासनेला दृढ चालवावे । भूदेव संतासि सदा नमावे।
सत्कर्मयोगेवयघालवावे। सर्वांमुखी मंगल बोलवावे॥३॥
सह नाववतु । सह नौ भुनक्तु ।
सहवीर्यं करवावहै। तेजस्विनावधीतमस्तु । मा विद्विषावहै ॥ ॐ शांति:शांति:शांतिः॥