सूर्यवंदना आणि सूर्यनमस्कार
मुलांनो! लवकर उठण्यामागचा आणखी एक हेतू आहे तो
म्हणजे बलोपासनेचा. ह्या बलोपासनेचा प्रारंभ जो करायचा असतो तो सूर्य
नारायणाच्या ध्यानमंत्राने.
ध्येय: सदा सवितृमण्डलमध्यवर्ती। नारायणः सरसिजासन सन्निविष्टः।
केयूरवान् मकरकुण्डलवान् किरीटी। हारी
हिरण्मयवपुर्धृतशङ्खचक्रः।
सूर्य नारायणाचे ध्यान केल्यावर त्या उगवत्या भास्कराला साक्षी ठेवून सूर्यनमस्काराच्या व्यायामाला सुरुवात करा.
ॐ मित्राय नमः ।
ॐ सूर्याय नमः ।
ॐ खगाय नमः।
ॐ हिरण्यगर्भाय नमः।
ॐ आदित्याय नमः।
ॐ अर्काय नमः।
ॐ रवये नमः।
ॐ भानवे नमः।
ॐ पूष्णे नमः ।
ॐ मरीचये नमः ।
ॐ सवित्रे नमः।
ॐ भास्कराय नमः।
बारा नमस्कार घालून प्रत्येक नामागणिक एक एक असे बारा नमस्कार घालावेत सूर्यनमस्कार हा व्यायाम सर्व अवयवांना होत असल्यामुळे तो मुलांना तसेच मोठ्यांनाही आरोग्यसंपन्न असणारा आहे. नमस्कार घालावयाच्या जागेवर शक्यतो पूर्वेकडे तोंड करून उभे रहावे.
(नमस्कारानंतर)
आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने।
दीर्घमायुर्बलं वीर्यं तेजस्तेषां च जायते ॥१॥
अकालमृत्युहरणं सर्वव्याधिविनाशनम् । सूर्यपादोदकं
तीर्थं जठरे धारयाम्यहम् ॥२॥
अनेन सूर्यनमस्काराख्येन कर्मणा। श्री सवितृ
सूर्यनारायण: प्रीयताम् ।
(रोज निदान १२ नमस्कार तरी घालीत जावे.
त्यावेळी श्वासोच्छ्वास हा फक्त नाकाने करावा.)