Blog Views

।। आरती साईबाबांची ।।

।। आरती साईबाबांची ।।

 

आरती साईबाबांची । सौख्यदातारा जीवा । 

चरणरज तळी द्यावा । दासा विसावा, भक्तां विसावा ।।धृ।। 

झाकुनियां अभंग। स्वस्वरूपी राहे दंग। 

मुक्षु जनीं दावी। निज डोळा श्रीरंग ।।डो।। आ ॥१ ।॥ 

जया मनीं जैसा भाव। तया तैसा अनुभव।। 

दाविसी दयाघना । ऐसी तुझी ही माब।। तुआ।।२|| 

तुमचे नाम ध्यातां । हरे संस्मृति व्यथा । 

अगाध तव करणी। मार्ग दाखवी अनोखा। दा। ।अ।३।। 

कलियुगी अवतार। सगुण ब्रह्म समाचार। 

अवतीर्ण झालासे। स्वामी दत्त दिगंबर।।द।।आ।।४ । 

आठां दिवसां गुरुवारी। भक्त करिती वारी। 

प्रभु पद पहावया।। भवभय निवारी। भा|आ।।५।। 

माझा निज द्रव्य ठेवा।। तव चरणाजसेवा। 

मागणे हेचि आता। तुम्हां देवाधिदेव।।आ।।६।। 

इच्छित दीन चातक निर्मल तोय निजसुख पाजावे माधवा या। 

सांभाळ आपुली भाक।। आ।।भा।। आ।।७।।

 

 


समर्थ रामदास रचित || श्री नरसिंह पंचक ||

|| श्री नरसिंह पंचक || नरहरी नरपाळें भक्तपाळें भुपाळें। प्रगट रूप विशाळें दाविलें लोकपाळें। खवळत रिपुकाळें काळकाळें कळाळें। तट तट तट स्तंभि ...

Popular Blogs