श्रीरामदासस्वामी संस्थान, सज्जनगड
श्रीसमर्थकृत तुळजाभवानी स्तोत्र १
माय तूं बाप तूं बंधु । गण गोत समस्तही ।
तुजविण मला नाही । भवानी भक्तवत्सले ।।
विदेशी येकला आहे । तुजविण निराश्रयो ।
दयेने सर्व सांभाळी । भवानी भक्तवत्सले ।।
संकटे वारिली नाना । वाढविले परोपरि ।
नेणता चुकलो भला । भवानी भक्तवत्सले ।।
इछिले पुर्विले सर्वै । कामना मनकामना ।
संकटी रक्षिले माते । भवानी भक्तवत्सले ।।
वास मी पाहतो तुझी । दास मी कष्टलो बहु ।
आनंदी नाव राखावे । भवानी भक्तवत्सले ।।