Blog Views

बाप्पा निरोपपर गीत

बाप्पा निरोपपर गीत

जाहलें भजन आम्ही नमितों तव चरणां । नमितो तव चरणां । वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दीना || धृ ||

दास तुझे आम्ही देवा तुजलचि ध्यातों। देवा तुजलाचर ध्यातों।

प्रेमें करुनियां देवा गुण तुझे गातो ।। १ ।।

तरी न्यावी सिध्दि देवा हेचि वासना | देवा हेचि वासना । रक्षुनियां सर्वा द्यावी आम्हांसी आज्ञा || २ ||

मागणें तें देवा आतां एकची आहे। आतां एकची आहे। तारुनियां सकळां आम्हां कृपा दृष्टी पाहें ||३||

जेव्हां सर्व आम्ही मिळ ऐशा या ठाया। ऐशा या ठाया

प्रेमानंदें लागूं तूझी कीर्ती गावया || ४ ||

सदां ऐशी भक्ती राहो आमुच्या मनीं आमुच्या मनीं हेचि देवा तुम्हां असे नित्य विनवणी || ५ ||

वारुनियां संकटे आतां आमुची सारीं आता आमुची सारी । कृपेची साऊली देवा दीनावरिक करीं ।। जाहले... ||६||

निरंतर आमुची चिंता तुम्हां असावी। चिंता तुम्हा असावी । सर्वाची लज्जा देवा तुम्ही रक्षावी । जहले ।।७।।

निरोप घेतो आता आज्ञा असावी चुकलें आमर्चे काहीं त्याची क्षमा असावी || जाहलें

समर्थ रामदास रचित || श्री नरसिंह पंचक ||

|| श्री नरसिंह पंचक || नरहरी नरपाळें भक्तपाळें भुपाळें। प्रगट रूप विशाळें दाविलें लोकपाळें। खवळत रिपुकाळें काळकाळें कळाळें। तट तट तट स्तंभि ...

Popular Blogs