Blog Views

श्रीसप्तशृंगीमातेचे पद.

श्रीसप्तशृंगीमातेचे पद.

तेजातूनी प्रकटली ती मुलांबिका ।
मर्दिन्याशी दानव स्तविली त्रिदेवांनी जी का।
अष्टदश भुजा सहित प्रकटली महामाया।
प्रार्थीतो मी तुजला  सप्तशृंगी रणचंडिका।।१। l

   विष्णूच्या बाहुतून तेज जे निघाले।
तैसेचि तेज ब्रह्मा, शिवाचे कायी स्फुरले।
सर्व देवे तेजे संभव जिचा जाहला।
प्रार्थीतो मी तुजला  सप्तशृंगी रणचंडिका।।२।।

  रणकंदनी वधुनी महिषासुरा।
विसावली जी वणी डोंगरी सारा।
महर्षी मार्कंडेयास जिथे जीने उपदेशीला।
प्रार्थीतो मी तुजला सप्तशृंगी रणचंडिका।।३।।

मार्कंडेयासी ज्ञान तिने दिधले।
नर्मदा परिक्रमेत तयासी  आख्यान हे स्फुरले।
" सप्तशती " हा ग्रंथ त्यांनी निर्मिला।
प्रार्थीतो मी तुजला सप्तशृंगी रणचंडिका।।४।।

  तेच आख्यान अजुनी करी श्रवणी।
मान वाकडी करुनि जरा वाम बाजूनी।
करू साष्टांग प्रणिपात मार्कंडेयाला।
प्रार्थीतो मी तुजला सप्तशृंगी रणचंडिका।।५।।

पुन्हा बघ आई हा दानव मातला।
करतो अदृश्य होऊनि छळवणूक लेकरांना।
करी मर्दन सत्वर तयाचे, सोडवी बालकांना।
प्रार्थीतो मी तुजला सप्तशृंगी रणचंडिका।।६।।

तुझी लेकरे आम्ही अजाण आई।
ना भजले तुज, शरण आलो 
नाही।
पदर तुझा सोडूनि जाऊ कुठे आता सांग ना।
प्रार्थीतो मी तुजला सप्तशृंगी रणचंडिका।।७।।

जय जगदंब...जय जगदंब....

श्रीगुरुदेव दत्त

श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs