Blog Views

तव नामाच्या जयघोषाने लाभे परमानंद ||सद्गुरु वासुदेवानंद||

तव नामाच्या जयघोषाने लाभे परमानंद  
||सद्गुरु वासुदेवानंद||


धन्य जाहले श्री टेंबेकुल
माणगांव है अती पुण्यस्थल जिभेजनभूमी पसरलास तू.
आपुला किती सुगंध (सद्गुरू)

मानव देहीजणू परमेश्वर
अवतरलासी या भूमीवर 
भक्तांच्या हृदयात रुजवला
आतमानातीचा कंद (सद्गुरु)

तुझे आचरण दिव्य तपोवन 
त्यागी जिवन पवित्र उज्वल
श्रवणी पडता जगमायेच 
तूटूनी जातीबंध (सद्गुरु)

साहित्याची करूनी सेवा
उद्धारास्तव मानवजीवा 
प्रदान केला निजग्रंथातुनी 
अध्यात्मीक मकरंद (सद्गुरू)

सुबोध त्यांतील अमृत वचने 
जागृत करिती आत्म लोचने 
पढता पधला ज्ञानी बनले
कितीक जगी मतीमंद (सद्गुरू)

ग्रुडेश्वर चा अगाध महिमा 
मांगल्याचे जिथे पौर्णिमा
तुझ्या दर्शने पावन होता 
सान थोर जण वृंद (सद्गुरू)

नामस्मरणी चित्त जडावे
जिवा शिवाचे ऐक्य घडावे
सहज सुटावा संसारातील 
आसक्तीचा छंद( सद्गुरू)

मी अज्ञानी अनाथ म्हणुनी 
हीच विनवणी करतो चरणी
कृपा ओघ तो माझ्या वरचा 
कधी न व्हावा बंद (सद्गुरू)

राजाभाऊ कोंडो

श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs