Blog Views

दत्तगुरूंची दुर्मिळ आरती | श्रीगुरु दत्तराजमूर्ती, ओवाळितो प्रेमे आरती

श्रीगुरु दत्तराजमूर्ती, ओवाळितो प्रेमे आरती ||धृ || ब्रह्मा-विष्णु-शंकराचा असे अवतार श्रीगुरुचा | कराया उद्धार जगाचा जाहला बाळ अत्रि ऋषिचा, धरिला वेष असे यतिचा, मस्तकी मुकुट शोभे जटीचा | कंठी रुद्राक्ष माळ धरुनी,

हातामध्ये आयुध बहुध धरुनी, तेणे भक्तांचे क्लेश हरुनी त्यासी करुनि नमन अघशमन होइल रिपुदमन गमन असे त्रैलोक्यावरती || १|| ओवाळितो प्रेमे आरती || श्रीगुरु दत्तराजमूर्ती, ओवाळितो प्रेमे आरती || धृ ||

गाणगापुरी वसति ज्याची, प्रीति औदुंबर छायेची, भीमा - अमरसंगमाची भक्ति असे बहुत सुशिष्यांची, वाट दावुनिया योगाची ठेव देतसे निजमुक्तीची, काशीक्षेत्री स्नान करितो, करविरि भिक्षेला जातो माहुरि निद्रेला वरितो तरतरित छाटि, झरझरित नेत्र, गरगरित शोभतो ओवाळितो प्रेमे आरती || श्रीगुरु दत्तराजमूर्ती, ओवाळितो प्रेमे आरती ||धृ||

त्रिशुळ जया हाती || २ ||

अवधुत स्वामि सुखानंदा ओवाळितो सौखकंदा तार हा दास हृदयकंदा सोडवी विषय-मोह-छंदा आलो शरण अत्रिनंदा, दावि सद्गुरु ब्रह्मानंदा, चुकवी चौऱ्याऐशींचा फेरा, घालिति षड्रिपु मज घेरा, गांजिति पुत्र-पौत्र दारा-

वदवी भजन मुखी तव पुजन करितसे सुजन याचे बलवंतावरती ||३|| ओवाळितो प्रेमे आरती || श्रीगुरु दत्तराजमूर्ती, ओवाळितो प्रेमे आरती || धृ ||

दीप ज्योती मंत्र (शुभं करोति कल्याणमारोग्यं)

दीप ज्योती मंत्र  शुभं करोति कल्याणमारोग्यं धनसंपदा। शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते॥ दीपज्योतिः परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः। दीपो...

Popular Blogs