🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*आजपासून आदरणीय श्री श्रीधर कुलकर्णी स्वयं लिखित व्यंकटेश विजय*लेखमाला..सुरु करतोय,!!!!
वेदव्यासांनी भविष्योत्तर पुराणात वेंकटगिरीचा महिमा सांगितला आहे. या कलियुगात जे कोणी त्यांची भक्ती करतात, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.अश्या पवित्र ग्रंथाचा रोज एक अध्याय देण्याचा मानस आहे...सर्वजण याचा लाभ घेतील अशी आशा करतो...!!!!
=====================
*🌺..श्री व्यंकटेश विजय..🌺*
____________🔺____________
*अध्याय १...*
या *'व्यंकटेश विजय'* ग्रंथाची सुरवात करताना लेखकाने प्रथमतः गणपती, सरस्वती, कुलदेवता, सदगुरु वेदव्यास इत्यादि थोर पुरुषांना वंदन करून नंतर सरस्वतीचे स्तवन केले आहे. ही कथा वेदव्यासांनी भविष्योत्तर पुराणामध्ये सांगितली आहे. ती संस्कृतमध्ये असल्याने ती सामान्य लोकांकरिता म्हणून मी प्राकृत भाषेत तुम्हाला सांगतो-
एकदा नैमिष अरण्यामध्ये शौनकादिक ऋषींने सूतांना प्रश्न केला. इंदिरापति जो व्यंकटेश त्याचे चरित्र आम्हाला सांगा. त्यावर सूतांनी सांगण्यास आरंभ केला. तेच तुम्हाला मी सांगणार आहे.
पूर्वी मिथिला नावाच्या नगरीमध्ये राजा जनक राज्य करीत होता. त्याच्या वागण्याने लोक त्याला राजर्षी म्हणत असत. तो नेहमी ईश्वराची भक्ती करीत असे. त्याला कुशकेत नावाचा भाऊ होता. त्याच्यावर सर्व कारभार सोपवून तो ईश्वर भजन करण्यात मग्न होता. कुशकेतुला तीन मुलगे आणि तीन मुली होत्या. जनक राजाला जानकी नावाची एक सुंदर मुलगी होती. राजा जनक अत्यंत सुखाने काल घालवत होता. आपण फार सुखी आहोत असे हा राजा मानीत होता. विद्वान माणसाने सुख किंवा दुःख याचा विचार न करता सर्वदा शांतपणाने रहावे. राजाला आपल्या गुणांचा फार अभिमान झाला. पुढे त्याचा परिणाम असा झाला की त्याचा बंध जो कुशकेतु तो एकाएकी मरण पावला. कुशकेतुच्या पत्नीने अग्निप्रवेश केला. यामुळे राजाला फार त्रास झाला, वृद्धापकालामध्ये त्याची चिंता वाढू लागली. त्याने खाणे पिणे सर्व सोडून दिले. असा तो दुःखी असताना एक दिवस त्यांच्या पुरोहिताचा मुलगा शतानंद त्यांच्याकडे आले. राजाने जाऊन त्यांचा सन्मान केला. त्यांची पूजा वगैरे केली आणि आपली सर्व हकिकत त्याला सांगितली. माझ्या व माझ्या बंधूच्या मुलीकरिता चौघे भाऊ गुणवान माझे जामात असावेत अशी माझी इच्छा आहे. याला मी काय करू? यावर शतानंदाने सांगण्यास सुरुवात केली. शतानंद म्हणाले.
राजा या पृथ्वीवर वेंकटगिरीचा महिमा फार मोठा आहे. वेदव्यासांनी भविष्योत्तर पुराणात त्याचे महत्त्व सांगितले आहे. या कलियुगात जे कोणी त्यांची भक्ती करतात, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. शतानंदाच्या मुखातून राजाने वेंकटगिरीचे महत्त्व ऐकण्यास सुरुवात केली.
राजा कृतयुगामध्ये ज्याला *वृषभाद्री* असे म्हणतात. त्रेतायुगामध्ये *अंजनाद्री* म्हणतात, द्वापारयुगात *शेषाचल* आणि कलीयुगामध्ये *वेंकटाद्री* म्हणतात. यावर राजाने प्रश्न केला की, एकाच पर्वताला निरनिराळ्या युगात निरनिराळी नावे का प्राप्त झाली? *असा प्रश्न केला असताना शतानंद सांगू लागले तो कथाभाग द्वितीया अध्यायापासून सुरू झाला आहे.*
〰〰〰〰〰〰
*सं - श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच ग्रुप*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩