Blog Views

श्री व्यंकटेश विजय भाग 7

*🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩*
*ॐ नमो व्यंकटेश्वराय नम :🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩*
*🌺.. व्यंकटेश विजय ..🌺*
___________🔺__________

अध्याय :-  ७ ..

मागील अध्यायाच्या शेवटी सांगितल्याप्रमाणे बकुला नारायणपुरास आली. तेथे तिला पद्मावतीच्या सखी भेटल्या. बकुलेने त्यांना विचारले असता त्या बकुलेला म्हणू लागल्या-

'सोमवंशात आकाश नावाचा राजा आहे. त्याची पद्मावती नावाची मुलगी आमची सखी आहे. तिच्याबरोबर आम्ही उद्यानात खेळत असतो. एके दिवशी आम्ही उद्यानात फुले आणावयास गेलो असता घोड्यावरून त्या ठिकाणी आलेला एक अतिशय सुंदर कुमार आमच्या सखीने पाहिला; तो तिच्या मनात फारच भरला आहे.'

पद्मावतीने आम्हास त्याची चौकशी करण्यास सांगितले. आम्ही विचारले असता आम्हास काही न सांगता तो थेट पद्मावतीकडे जाऊन त्याने तिला आपली हकीकत सांगितली. 'मी क्षत्रिय आहे. वेंकटगिरीवर मी राहतो. माझे नाव श्रीनिवास आहे. चंद्रवंशात माझा जन्म झाला आहे. माझे आई वडील देवकी व वसुदेव असून बलिराम माझा भाऊ आहे.'

नंतर त्याने पद्मावतीकडे तिच्या कुळगोत्राची चौकशी केली. तिने ही आपली हकीकत त्यास सांगितली. 'मी क्षत्रिय आहे. वेंकटगिरीवर मी राहतो. माझे नाव श्रीनिवास आहे. चंद्रवंशात माझा जन्म झाला आहे. माझे आई वडील देवकी व वसुदेव असून बलिराम माझा भाऊ आहे.'

नंतर त्याने पद्मावतीकडे तिच्या कुळगोत्राची चौकशी केली. तिने ही आपली हकीकत त्यास सांगितली.

पुढे भिल्लाचा वेष घेतलेल्या श्रीनिवासाने 'आपली लग्न करण्याची इच्छा असून तू वरावेस' असे म्हणता पद्मावतीस फार राग आला व त्या सख्यांसह ती नगराकडे निघाली असता त्याच्या मागून तो पुरुष जाऊ लागला. तेव्हा त्यांनी त्यास दगडाने मारण्यास सुरुवात केली. त्याचा घोडा वाटेत मरण पावला व तो पुरुष उत्तर दिशेकडे निघून गेला. आम्ही आमच्या मंदिराकडे आलो. तेव्हापासून आमची सखी पद्मावती त्याच्या विरहज्वराने व्याकूळ झाली आहे. तिच्या आजारीपणाने सर्व घाबरून गेले आहेत. वैद्य ज्योतिषी इत्यादिकांचे उपचार चालू आहेत; पण गुण नाही. नंतर राजाने आपल्या कन्येची हकीकत त्यांना सांगितली. त्यांनी श्रीशिवास अभिषेक करावयास सांगितले. राजाने कुलगुरूंच्या विचाराप्रमाणे उत्तम प्रकारची साधनसामग्री जमा करून अनुष्ठान सुरू केले आहे. आम्ही तिच्या सर्व सखी देवदर्शनास आलो आहोत.

नंतर त्या मुलींनी बकुलेला हकीकत विचारली. तिने 'मी वेंकटेशाची दासी आहे. काही काम मनात योजून आले आहे. मला राजमातेचे दर्शन घडवाल काय असे विचारताच मुली म्हणाल्या, 'मुलीच्या आजारीपणामुळे धरणीदेवी दुःखी आहे. आता भेटण्यास वेळ मिळणार नाही. गावातील स्त्रिया जातील त्यांचेबरोबर जा व राणीची गाठ घे' बकुला वेळेची वाट पहात थांबली.

इकडे वेंकटेशांनी विचार केला की, बकुला स्त्री आहे तिज एकटीकडून कार्य होणार नाही. आपण आणखी काही प्रयत्न केला पाहिजे. म्हणून स्वतः भिल्लीणीचा वेष घ्यावयाचे ठरवून ब्रह्मदेवास बोलावून लहान मुलाचा वेष घेण्याची आज्ञा केली. मलिन वस्त्रे धारण करून ओट्यात लहान मुलास बांधून घेऊन नाचत नाचत नारायणपुरास आली. तिने गावातील लोकांना ओरडून सांगण्यास सुरुवात केली. 'मी भूतभविष्य जाणणारी आहे. कोणास कशाची इच्छा असेल तर ती मजकडून पूर्ण करून घ्या. तुमचे सर्व मनोरथ मी पूर्ण करीन.'

हे तिचे भाषण ऐकून सर्व स्त्रिया आश्चर्यचकित झाल्या व त्यांनी राजमाता धरणीदेवीस तिची हकीकत सांगितली. राणी धरणीने तिला राजवाड्यात आणण्यास सांगितले. स्त्रियांनी जाऊन राणीची व राजकन्येची सर्व हकीकत तिला सांगताच ती म्हणाली, 'माझे हे मलीन कपडे पाहून राजवाड्यातील लोक मला हसतील. मी दरिद्री आहे. त्या धर्मदेवीस अनेक प्रकारे समजावून स्त्रियांनी तिला राजवाड्यात नेले. राणीने तिची सर्व चौकशी केली. तिने आपली हकीकत सांगताच राणीने आपल्या मुलीचा आजार तिच्या कानावर घातला.

तिने राणीस शुभ्र वस्त्र नेसून आपणास वायन देण्यास सांगितले. आपल्या मुलास पिण्यास दूध मागून घेतले. भोजन करून तांबूल वगैरे खाऊन झाल्यावर तिने सर्व देवतांचे स्मरण केले व ती म्हणाली, 'तुझ्या मुलीस भूतबाधा वगैरे काही नाही. तिने बागेत एक सुंदर पुरुष पाहिला असून त्याच्यावर तिचे मन बसले आहे. तिला विचारून खात्री करुन घे!'

तसेच तो तिच्या मागून येत असता मुलींनी त्यास दगड मारून परत पाठविले; व तो उत्तरेकडे गेला. राणीने आपल्या मुलीस विचारता ही सर्व हकीकत खरी असल्याचे तिला समजून आले. राणीने भिल्लीणीस परत येऊन सर्व खरे असल्याचे सांगितले. तिने त्या पुरुषास कोणताही विचार न करता मुलगी देण्यास सांगितले. न दिल्यास मुलगी वाचणार नाही असे सांगताच राणी घाबरली. राजाचा सल्ला घेऊन त्या पुरुषाचा शोध करण्यास तिने सांगितले. इतक्यात अभिषेकाचा प्रसाद घेऊन ब्राह्मण आले. त्यांना राजाने भोजन-दक्षिणा वगैरे देऊन निरोप दिला. वेंकटेशाकडून एक दासी आल्याचे त्यावेळी राजास समजले. तिला राजवाड्यात बोलावून आणून सर्व स्त्रियांनी तिची चौकशी केली. तिने आपली व वेंकटेशाची सर्व माहिती सांगितली. राजाने वेंकटेशाचे कुलगोत्र वगैरे आपल्या मुलीच्या गणगोत्राशी जुळवून पाहता ३६ गुण उतरले. त्यावेळी राजाच्या मनात एक शंका आली. असा हा सर्व गुणसंपन्न मुलगा असता याचे लग्न अद्याप का झाले नाही. त्यावेळी बकुलेने संततीकरिता हा दुसरे लग्न करतो आहे असे सांगताच राजाचा संशय दूर झाला.

देवगुरु बृहस्पतीनीही वेंकटेशाचे वर्णन 'तुझ्या मुलीस हा वर मिळाल्यास मुलीचे भाग्य थोर आहे असे समज' असे सांगताच राजास फार आनंद झाला. आणि देवगुरु म्हणाले, 'येथुन जवळच अरण्यात शुक्राचार्य नावाचे थोर ऋषि राहतात त्यांना आणून सर्व हकीकत विचार. वेंकटेशावर त्यांचे फार प्रेम आहे. राजाने रथ पाठवून त्यांना बोलावून आणविले. सर्व हकीकत राजास सांगितली. राजा म्हणाला असा थोर जावई आम्हास कसा मिळणार तेव्हा शुकाचार्य म्हणाले- 'राजा तू एक पत्र लिहून दे.' राजाने पत्र लिहून दिले. *महामुनी शुकाचार्यांनी पत्र दिल्यानंतरचा इतिहास पुढील अध्याय पाहू.*
〰〰〰〰〰〰📕
*सं - श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच ग्रुप*

श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs