Blog Views

श्रीगुरू नृसिंह सरस्वतींची आरती


श्रीगुरू नृसिंह सरस्वतींची आरती

कृष्णापंचगंगासंगम निजस्थान । चरित्र दाउनि केले गाणगापुरि गमना ॥ धृ. ॥

तेथें भक्तश्रेष्ठ त्रिविक्रमयति जाण । विश्वरूपें तया दिधलें दर्शन
जय देव जय देव जय सद्‌गुरु दत्ता । नृसिंह सरस्वति जय विश्वंभरिता ॥ १ ॥

वंध्या साठी वर्षे पुत्रनीधान । मृत ब्राह्मण उठवीला तीर्थ शिंपून ॥
वांझ महिषी काढवि दुग्ध दोहोन । अंत्यवक्रें वदवी निगमागम पूर्ण ॥ २ ॥

शुक्लाकाष्टीं पल्लव दावुनि लवलाही । कुष्ठी ब्राह्मण केला शुद्ध निजदेही ॥
अभिनव महिमा त्याचा वर्णूं मी कायी । म्लेंच्छराजा येउनि वंदी श्रीपायीं ॥ ३ ॥

दिपवाळींचे दिवशीं भक्त येउनि । आठहि जण ठेवीत मस्तक श्रीचरणीं ॥
आठहि ग्रामीं भिक्षा केली तद्दीनीं । निमिषमात्रे तुंतक नेला शिवस्थानीं ॥ ४ ॥

ऎसे चरित्र दावुनि जडमुढ उद्धरिले । भक्तवत्सल ऎसे ब्रीद मिरविलें ॥
अगाध महिमा म्हणउनि वेदश्रुति बोले । गंगाधरतनय सदा वंदी पाउलें ॥ ५ ॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥


श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs