*🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩*
*ॐ नमो व्यंकटेश्वराय नम :🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩*
*ॐ नमो श्री वेंकटेश्वराय नम :!!!*
*.. श्री.व्यंकटेश विजय ..*
___________🔺__________
अध्याय :- ८..
मागील अध्यायात श्री शुकाचार्य आकाशराजाचे पत्र घेऊन श्रीवेंकटेशाकडे निघाले असे वृत्त आले आहे. श्री शुकाचार्य वेंकटगिरीवर येताना श्रीनिवासाने पाहिले. श्रीशुकाचार्यांना त्यांनी वंदन करून क्षेमकुशल विचारले. त्यांनी क्षेमकुशल सांगून राजाचे पत्र त्यास दिले. पत्र वाचून त्यांना आनंद झाला. शुकाचार्यांनी उत्तर मागताच श्रीवेंकटेशाने त्या पत्राखालीच उत्तर लिहिले. 'राजा आपणास आमचा नमस्कार. ऋषींच्याकडून पाठविलेले पत्र मिळाले. आम्हास आनंद जाहला आहे. वैशाख शुद्ध दशमीस आपण मुहुर्त निश्चय केला आहे. विवाहास येऊन कार्यसांग करावे. माझी मुलगी मी आपणास अर्पण केली आहे हा मजकूर समजला. आम्ही आपल्या म्हणण्याचा स्वीकार केला आहे.' असे उत्तर देऊन ते शुकाचार्यांच्या मार्फत पाठवून दिले.
इकडे आकाशराजा पत्रोत्तराची वाट पहातच होता. तोच शुकाचार्य आले व त्यांनी श्री वेंकटेशाचे पत्र राजास दिले. राजास फार आनंद झाला. इतक्यात बकुलाही आपले कार्य करून आली. बकुलेला श्रीनिवासांनी अनेक अलंकार देऊन संतुष्ट केले व तिची स्तुती करून संतुष्ट केले.
नंतर बकुलेने लग्नाचे दिवस जवळ आले, आपली अद्याप काहीच तयारी नाही असे सांगताच श्री नारायणांनी तयारीस आरंभ केला. गरुडाचे स्मरण करताच ते आले. त्यांच्याकडून सर्वांना निमंत्रणाची व्यवस्था करविली. सर्व देवदेवता, उपदेवता, राजेरजवाडे यांनाही निमंत्रणे गेली. योग्यवेळी ब्रह्मदेव, शंकर, विष्णु, देव, गंधर्व, किन्नर वगैरे आकाश मार्गाने येऊ लागले असता आकाश भरून गेले. बकुळा विचारू लागली. 'नारायणा हे काय आहे?' भगवान म्हणाले, ' हे लग्नाचे वर्हाड येत आहे.' यात इंद्र, ब्रह्मदेव मुख्य होते. सर्व मंडळी जमली. श्री नारायणास सर्व देव भेटले. त्यांनी त्यांनी वंदन केले. विश्वकर्म्यास बोलावून भगवंतांनी मंडपाची व्यवस्था व सर्वांना राहण्यास जागा उत्तम तयार करवून घेतल्या. त्या जागा उत्तम असून रत्नखचित जमिनी व शृंगारलेल्या होत्या. प्रत्येक ठिकाणी त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे स्नान, भोजन, राहणे, झोपणे, बसणे, उठणे इ० व्यवस्था फार सुरेख केली होती. भिंतीवर सर्व देवतांची चित्रे काढली होती. मंडप पाहिला की, सर्व विश्व पाहिल्याचा भास होतसे. समोर बगीचे. त्यात कारंजी. कमळांनी सुशोभित सरोवरे इ० ते स्थान पाहून कोणाचीही तृप्ति होत नसे. अशी व्यवस्था करून विश्वकर्म्याने भगवंतास येऊन वंदन केले. त्यांनी त्याचा सत्कार केला..
〰〰〰〰〰〰📕
सं - श्रीधर कुलकर्णी
*ज्ञानामृत मंच ग्रुप*
*🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩*
*ॐ नमो श्री व्यंकटेश्वराय नम :🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩*