Blog Views

॥ श्री सत्यविनायक पूजा ॥

॥ श्री सत्यविनायक पूजा ॥
आपल्या सर्वांना सत्यनारायण पूजा माहित आहेच. त्याप्रमाणे सत्यविनायक पूजा आहे. या कलियुगामध्ये प्रत्येक मनुष्याला अखंड सुखाची प्राप्ती व्हावी असे वाटते म्हणूनच ऋषि, साधुसंतानी परमेश्वराच्या भक्तिसारखे दुसरे साधन नाही असे म्हटले आहे. कलौ “चंडी विनायकौ” या वचनाप्रमाणे कलियुगात देवी, गणपती यांची उपासना जास्त फ़लप्रद आहे. खूप लोकांचे आराध्य दैवत गणपती असून त्याला विघ्नहर्ता सुखकर्ता असे म्हटले आहे म्हणजेच विघ्नांचा नाश करणारा आणि सुखाची प्राप्ती करवून देणारा त्या अनुषंगाने शास्त्रामध्ये हि सत्यविनायक पूजा करण्यास सांगितले आहे. या सत्यविनायक पूजेमध्ये गणेशाचे असे वर्णन आले आहे की गणेशाचे शरीर श्वेत असून श्वेत रंगाची वस्त्रे परिधान केली आहेत कपाळी श्वेत गंध लावले आहे प्रसन्न मुखकमल असून रत्नजडीत सिंहासनावरती विराजमान झाले आहेत. कलशावरती सत्यविनायकाची स्थापना करून परिवार देवता आहेत त्यांचे आवाहन पूजन केले जाते. या पूजेमध्ये विविध प्रकारची पत्री / फ़ुले अर्पण करण्यास सांगितली आहेत. १०८ वेळा गणेशाच्या नावाने दूर्वा समर्पण आहे. नैवेद्यासाठी तूपामध्ये तळलेले मोदक, पंचखाद्य, पेढे इ. सांगितले आहे. पूजा पूर्ण झाल्यावरती विशेष प्रार्थना करावी . सरस्वती पूजन करून ब्राह्मण पूजन करावे कथा श्रवण करून झाल्यावर आरती मंत्रपुष्पाजंली म्हणून सांगता करावी.

*|| सत्य विनायक व्रतकथा ||*

श्रीगणेशाय नम : सूत शौनकादि ऋषींना सांगतात –
पूर्वी सत्यलोकी ब्रह्मदेव स्वस्थ बसलेला असताना त्याचे जवळ देवर्षी नारद येऊन सर्व लोकांचे कल्याण व्हावे या इच्छेने अत्यंत नम्र होऊन ब्रह्मदेवाला नमस्कार करून प्रश्न करते झाले
"नारद म्हणातात,हे भगवान् आपण सर्वज्ञ आहात,
याकरिता ह्या जगात मनुष्यांनी आपल्या कल्याणाकरिता कोणत्या देवाची सेवा करावी ? ब्रह्मदेव म्हणतात..
नारदा सर्व वेदाच्या पूर्वी प्रतिष्ठा पावलेला म्हणजे ज्याच्यापासून वेद झाले तो जो ॐ काररुपी भगवान् तोच या कलियुगामधे प्रत्यक्ष फल देणारा सत्यविनायक नावाचा देव होय .
सुदामा नावाचा एक ब्राह्मण उत्तम आचारसंपन्न व मोठा उदार असून अगदी दरिद्री होता.तो एकदा कुटुंबपोषणाच्या चिंतेने व्याकूळ होऊन, आपल्या आश्रमात बसला असता त्याच्या स्त्रीने,
’महाराज.आपला बाळमित्र व गुरुबंधु श्रीकृष्ण
ऐश्र्वर्यसंपन्न असा व्दारकेत नांदत असून तो दिन व ब्राह्मण याचेविषयी अमर्याद दयाळू आहे त्याला भेटलात तर तो
तुमचे दारिद्र्य दु:ख दूर करील असे सुचविल्यानंतर तो ब्राह्मण (सुदामा) व्दारकेस जाण्यास निघाला जाताना कृष्णाला
भेट देण्याकरिता म्हणून,मोठ्या प्रयत्नाने साठविलेले दोनतीन मुठी पोहे फाटक्या चिंध्यात बांधून घेऊन, तो जुन्या मित्राला
भेटण्याकरिता व्दारकेस गेला.
तेव्हा तो आलेला पाहून, कृष्णाने त्याचा मोठा सत्कार केला.
प्रथम मधुपर्कपूजा केली.
नंतर सुगंधी तेल लावून स्नान घातले व मिष्टान्न भोजन घालून ताम्बूल दिले. नंतर उभयता एकांती गोष्टी करिता बसले,तेव्हा श्रीकृष्णांनी त्याच्या चर्ये वरून त्याचे मनोगत जाणले. श्रीकृष्ण सुदाम्याला म्हणतात,
”मित्रा, मला भेट काय आणलीस ती दे ”
असे म्हणून त्याच्याकडची चिंध्याची पुरचुडी घेतली,आनी त्यातील मुठभर पोहे भक्षण करुन श्रीकृष्ण तृप्त झाले,आणि मनात म्हणाले,
” हाय हाय! माझ्या मित्राला काय हे दारिद्र्य राजामध्ये व या ब्राह्मणा मध्ये कितीसे अंतर राहते ते पाहतो सत्यविनायकाच्या संतोषाने याचे दारिद्र्य नाहीसे करतो,” असा विचार करून, त्याने त्याला प्रश्र्न केला की तुझी मुले -माणसे क्षेम आहेत ना ? तू आपल्या कुटुंबाचे पालन व पोषण  कसे करतोस ? ” अशी कृष्णाची
प्रेमवाणी ऐकताच,सुदामा लज्जित होऊन कृष्णाला म्हणाला देवां, तू नाथ असल्यामुळे सर्व जगाचे कल्याण आहे,मग तुझ्या मित्राचे घरी कुशल आहे यात काय विचारावे ? हे यदुकुलश्रेष्ठा,मी आपल्या  वर्गाचे परिपालन अयाचित वृत्तीने करीत असतो. तथापि ती नित्यकर्मामधे गणली असल्याने ती ईश्र्वरार्पण बुद्धीने नित्य चालवून भुक्तिमुक्ति देणारा जो सत्यविनायक त्याचे
आराधन कर ”
सत्यविनायक कोण हे सांगा श्रीकृष्ण म्हणतात – ”
हे मित्रा जो सर्वाचा आदि असून सर्वानी पूजा करण्यास योग्य व जो साक्षात् परब्रहस्वरुपी आणि ब्रह्मा,विष्णु, महेश्र्वर इत्यादि आम्ही ज्याचे सेवकगण आहोत .त्याची पूजा करावी

पुष्टीपति ( पालनकर्ता ) जो विनायक याचा जन्म वैशाख महिन्यातील पौर्णिमा ला झाला .
त्या दिवशी किंवा वरद चतुर्थीस अथवा मंगळवार किंवा शुक्रवार हे व्रत करावे.
विनायकाचे यंत्र ठेवावे. विनायकाच्या यंत्रावर लक्ष्मीनारायण पार्वतीमहेश्र्वर;पर्थिवीवराह आणि शक्तिमदन या चार देवतांची कोपऱ्यात क्रमाने स्थापना करावी .  गर्गामुनिकडून तू या व्रताची बरोबर अचूक माहिती घे,प्रसाद घेऊन मग घरी जा हे कृष्णाचे भाषण ऐकून सुदामा मोठ्या आनंदाने तेथे राहिला.
गर्गाचार्याकडून त्याने या व्रताची सर्व माहिती घेतली आणि संध्याकाळी मी सत्यविनायक याची पूजा करीन . खवा साखर ह्याचे मैदात मोदक करून तळून प्रसाद करीन असा संकल्प केला .

*अशोककाका कुलकर्णी*

श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs