Blog Views

आरती नारायणाची


आरती नारायणाची

विडा घ्या हो नारायण| कृष्ण जगत जीवना।
विनवते रखुमाई दासी होवून मी काना।
विडा घ्या हो नारायणा

वासना फोडूनिया चुर्ण केली सुपारी ।
भावार्थ कापुराने धोलीयेली निर्धारी ।।
विडा घ्या हो नारायणा

शांती हे नागवेल, पाने घेवूनिया करी।
मी पणा जाळूनिया, चूना लावीला वरी ।।
विडा घ्या हो नारायणा

विवेकहा कात रंग रंगी रंगिला सुरंग।
वैराग्य जायफळ, मिळविळे सकळ ॥
विडा घ्या हो नारायणा ॥

दया हे जायपत्री, क्षमा लवंग आणिल्या
सुबुदधी बेलहोडे शिवाराने अर्पिथेली।
विडा घ्या हो नारायणा


श्री गणपती स्थापना प्राणप्रतिष्ठा पूजाविधी अभिषेक सह

🟠🚩पुजा साहित्य यादी : हळद, कुंकु, गुलाल, शेंदूर, गूळ-खोबरे, समई, नीरंजन, अष्टगंध, अक्षदा, रांगोळी, फुलवात वात, तेलवात, काडे पेटी, पळी भांड...

Popular Blogs