Blog Views

आरती प्रदक्षिणा (धन्य धन्य हो प्रदक्षिणा)


आरती प्रदक्षिणा

धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची।
झाली त्वरा सुस्वरां। विमान उतरायाची।। १ ।।

पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी।
सर्वहि तीर्थ घडली आम्हां आदिकरूनि काशी ।।
धन्य धन्य हे प्रदक्षिणा ॥ २ ॥

मृदंग टाळ ढोल भक्त भावार्थे गाती ।
नामसंकीर्तने ब्रह्मानंदे नाचती।।
धन्य धन्य हे प्रदक्षिणा ।। ३।।

कोटि ब्रह्माहत्या हरिती करितां दंडवत।
लोटांगण घालीतां मोक्ष लोळे पायांत ।।
धन्य धन्य हे प्रदक्षिणा ॥ ४ ॥

गुरूभजनाचा महिमा न कळे आगना निगमासी।
अनुभव ते जाणती जे गुरूपदिंचे रहिवासी ।।
धन्य धन्य हे प्रदक्षिणा ........॥ ५॥

प्रदक्षिणा करूनि देह नावें वाहिला|
श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला
धन्य धन्य हे प्रदक्षिणा ॥ ६॥


समर्थ रामदास रचित || श्री नरसिंह पंचक ||

|| श्री नरसिंह पंचक || नरहरी नरपाळें भक्तपाळें भुपाळें। प्रगट रूप विशाळें दाविलें लोकपाळें। खवळत रिपुकाळें काळकाळें कळाळें। तट तट तट स्तंभि ...

Popular Blogs