गणपती अथर्वशीर्ष भावार्थ :
पहिल्या कडव्यात गणेशाची स्तुती केली आहे. तूच सर्व आहे… तुमच्या माझ्यातील तत्व तूच आहेस… कर्ता धर्ता तूच आहेस.
दुसऱ्या कडव्यात मी सत्य तेच बोलत आहे असे म्हटले आहे.
तिसऱ्या कडव्यात माझे, वक्त्याचे (गुरुचे) शिष्यांचे, श्रोत्यांचे, दानी व्यक्तींचे, तू रक्षण कर अशी प्रार्थना आहे. त्या नंतर सर्व दिशांनी आमचे रक्षण करावे अशी विनंती आहे.
सहाव्या कडव्यात तू सत्व-रज-तम गुणांच्या पलीकडे आहेस… तू विविध अवस्था, काळ अशा सर्वांच्या पलीकडे आहेस. तू शरीरातील मूलाधार चक्रात नित्य वास करतोस. जीवनमुक्त योगी तुझे नित्य ध्यान करतात. तूच ब्रम्ह, इंद्र, अग्नी, वायू, सूर्य, चंद्र, पृथ्वी, अंतरीक्ष, स्वर्ग ओंकार आहेस असे म्हटले आहे.
सातवे कडवे वैशिष्ट्यपूर्ण आहे ज्यात ॐ गं गणपतये नमः या गणेश विद्या (मंत्र) मंत्राचा उच्चार कसा करावा. या बाबत मार्गदर्शन आहे.
आठव्या कडव्यात परत गणेशाची स्तुती आहे - आम्ही एकदंताला जाणतो व त्या वक्रतुंडाचे ध्यान करतो. तो आम्हाला प्रेरणा देवो.
नवव्या कडव्यात ध्यान करताना कशाप्रकारे गणेशाचे रूप डोळ्यासमोर आणावे याचे वर्णन आहे. अशा प्रकारे गणपतीचे जो निरंतर (नियमितपणे) ध्यान करतो सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ योगी होय.
दहाव्या कडव्यात ग्रंथ समाप्ती म्हणून गणेशाचे वंदन आहे स्तुती आहे.