Blog Views

मागणी आणि प्रार्थना उत्तम गुण मज दे रामा

मागणी आणि प्रार्थना

 

उत्तम गुण मज दे रामा

पावन भिक्षा दे रामा । दीनदयाळा दे रामा ॥१॥

अभेद भक्ती दे रामा। अश्वारोहण दे रामा ॥२ ॥ 

तद्रुपता मज देरामा। आत्मनिवेदन दे रामा ॥३ ॥ 

सजनसंगति दे रामा अलिप्तपण मज दे रामा ॥४॥ 

अंतरपारख दे राम । बहुजनमैत्री देरामा॥८॥

ब्रह्मानुभव मज देरामा। अनन्यसेवा दे रामा ॥५॥ 

कोमल वाचा दे रामा। विमल करणी दे रामा ॥६॥

प्रसंगवोळखी देरामा। धूर्तकळा मज देरामा॥७॥

हितकारक ते देरामा। जनसुखकारी दे रामा ॥९ ॥

विद्यावैभव दे रामा। उदासीनता दे रामा ॥१० ॥

मागो नेणे दे रामा। मज न कळे ते देरामा ॥११॥ 

सावधपण मज दे रामा । बहु पाठांतर दे रामा ॥१२॥

दास म्हणे रे गुणाधामा । उत्तम गुण मज दे रामा ॥१३

 


श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs