आद्य शंकराचार्य विरचित निर्वाण षटकाचा मराठी अनुवाद ....
-----------------------------------------
मन चित्त बुद्धी अहंकार नाही
मी कान डोळे जीभ नाक नाही
आकाश पृथ्वी न वायू न तेज
चिदानंदरूपी शिव तो मी आहे ।।
न मी पंचप्राण न मी पंचवायु
न मी सप्तधातु न मी पंचकोष
न वाणी न पदहस्त कर्मेंद्रिये मी
चिदानंदरूपी शिव तो मी आहे ।।
न मी राग द्वेष न मी लोभ मोह
मदमत्सरादी रिपु तो मी नाही
धर्मार्थ कामादि पुरुषार्थ नाही
चिदानंदरूपी शिव तो मी आहे ।।
न मी पुण्यपाप न सुखदुःखही मी
न मी मंत्र तीर्थ न मी वेद यज्ञ
न भोजन न भोज्य न भोक्ता असे मी
चिदानंदरूपी शिव तो मी आहे ।।
न मृत्यू न शंका न मज जातीभेद
न माता पिता ना मज जन्म नाही
न बंधू न मित्र न गुरु शिष्य कोणी
चिदानंदरूपी शिव तो मी आहे ।।
मी निर्विकल्प निराकार रूप
मी सर्वव्यापी मी सर्वज्ञानी
न मुक्ती न बंधन असे मी अमेय
चिदानंदरूपी शिव तो मी आहे ।।
भाषांतरकार- कवी अनिल शेंडे।