ब्राह्मणाची आरती
निगमागम विस्तारक तारक आहेसी
केवळ तु अधिकारी जप तप यज्ञासी
वरिष्ट उत्तम गुरु नाना वर्णासी
सकळांचे द्वीज मन्त्र आहे तुजपासी ॥१॥
जयदेव जयदेव
जयदेव जयदेव जय भूदेवा ब्राह्मण
तुझे दैवत करिती जन सेवा जयदेव जयदेव
श्री विष्णूने धरिले ह्रदयी पदकमळा
म्हणुनीया वैकुंठी भोगिती सोहळा
प्रसाद अवघा हाची स्वामी भूपाळा
आशिर्वचने हरतील भवचिन्ता सकळा ॥२॥
जयदेव जयदेव
जयदेव जयदेव जय भूदेवा ब्राह्मण
तुझे दैवत करिती जन सेवा जयदेव जयदेव
द्विज वदने अर्पिता पावे देवासी
पूजन केल्या हरतील पापांच्या राशी
पदतीर्थांचा महिमा न कळे कोणासी
गोसावी सूत स्वामी वंदे सहितासी॥३॥
जयदेव जयदेव
जयदेव जयदेव जय भूदेवा ब्राह्मण
तुझे दैवत करिती जन सेवा जयदेव जयदेव
ब्राह्मण संस्कृती.