आरती रामाची
त्रिभुवन मंडीतमाळ शोभतो गळा (२)
आरती ओवाळू पाहू ब्रम्ह पुतळा (२)
बोलो श्रीराम जयराम जयजय राम (२)
आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम (२)
ठकारांचे ठाण करी धनुष्य बाण (२)
मारूती सन्मुख उभा कर जोडून (२)
भरत शत्रूघन दोघे चौऱ्या ढाळीती (२)
स्वर्गीहून देव पुष्पवृष्टी करीता (२)
रत्नखचित माणिक वर्ण काय मुकूटी (२)
आरती ओवाळू चौदा भुवनाच्या पोटी (२)
विष्णुदास नामा म्हणे मागतो तू दे (२)
आरती ओवाळू पाहू सितापतीते (२)