हिरादेवी आईची आरती
नमितो तुजला हिरादेवी ठेवितो चरणी माथा, आई ठेवितो चरणी माथा | अजाण आम्ही तुझी बालके तू आमची माता, आई तू आमची माता ।। धृ ।।
मन इच्छिले ते पावले दारी तुझ्या चेऊनी, आई दारी तुझ्या येऊनी । देई आशिर्वाद आम्हा सर्वा प्रसन्न होऊनी, आई सर्वा प्रसन्न होऊनी ।। मन गुंतले तुझ्याच पाथी भान नसे आम्हा, आई भान नसे आम्हा।। अजाण आम्ही तुझी बालके... ।।१।।
टाळ, मृदंग, ढोल बाजुनी गान तुझे गातो, आई गान तुझे गातो। तुझिया नामी रंगुनिया आम्हा आनंद होतो, आई आम्हा आनंद होतो।। शब्द बापुडे असे तरी तू घे मानुनी माता, आई तू घे मानुनी माता ।। अजाण आम्ही तुझी बालके... || २ ||
मंगळवारी आरतीस मन प्रसन्न होते, आई मन प्रसन्न होते लहान थोर सारी जनता मंदिरात जमते, आई मंदिरात जमते ।। भाव त्याचा जानूनी त्यांना इच्छित वर यावा, आई इच्छित वर द्यावा || अजाण आम्ही तुझी बालके... ||३||