ज्याने व्यापियले जगताला ।।धृ।।
निरांजन दीप कर्पूरवात
तुम्हीच झाला राधाकांत ।।1।।
तुम्हीच दीपक तुम्हीच प्रकाशक
तुम्हीच स्वामी तुम्हीच सेवक ।।2।।
तुम्हीच दाता तुम्हीच त्राता
करूनिया करता जग निर्मियता ।।3।।
आता देऊन मी पण मन्मती
दास करीतो मंगल आरती ।।4।।
आरती कशी करू गोपाळा
ज्याने व्यापियले जगताला ।।5।।